अंबाजोगाई (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक करून कडक शासन करण्यात यावे अशी मागणी अंबाजोगाई शहरातील मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की
हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णिवाल यांच्यावर 23 आक्टोम्बरच्या रात्री साडेआठच्या सुमारास तीन आज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला असून त्यांना
नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या आम्ही सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध करत असून नंदकिशोर तोष्णिवाल यांच्या मारेकर्यास त्वरित अटक करून कडक शासन करावे या मागणीसह हल्लेखोर तातडीने पकडले गेले नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक आणि सरचिटणीस अनिल महाजन यांच्या आदेशा नुसार तीव्र आंदोलन करण्यात येईल असा या निवेनाच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरातील पत्रकारांनी प्रशासनास दिला आहे. या निवेदनावर मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर, जिल्हा सहसंघटक प्रदीप तरकसे, जिल्हा सह सचिवपरमेश्वर गित्ते, तालुका समनव्यक गजानन मुडेगावकर, अंबाजोगाई पत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश लखेरा, अंबाजोगाई पत्रकार संघ सचिव विरेंद्र गुप्ता, अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ अध्यक्ष
दादासाहेब कसबे, आदर्श ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष सालम पठाण
जेष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी, रमाकांत उडानशिव, रमाकांत पाटील, गोविंद खरटमोल, हनुमंत पोखरकर, दत्ता दमकोंडवर, जगनसरवदे, श्रावण चौधरी, सुदर्शन रापतवार, रणजित डांगे, नंदकुमार पांचाळ, पूनम परदेशी, मुशीर बाबा, शंकर चव्हाण, राहुल देशपांडे, विश्वनाथ कांबळे यांच्या सह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
या निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई व अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद मुंबई यांना पाठवण्यात आल्या आहेत.