कर्जत – दि. ( संजय गायकवाड )
आपण सतत आजारी असल्याने एका मांत्रिकाने चार वर्षापूर्वी घरात रक्त टाक अस सांगितल्याने एक बकरा आणि कोंबडा कापून घरात खड्डा खोदणाऱ्या एका इसमा सह इतर तीन जनना कर्जत पोलिसांनी अटक केली असून ,खोदलेला खड्डा नरबळी साठी होता अशा दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.
कर्जत पोलीस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवारी दि. २८ जुन रोजी रात्री ११.३० वाजता कर्जत दहिवली ब्राम्हण आळीत राहणारे आणि सध्या मुंबईत राहणारे व एअर इंडियात कामाला असलेले मुकेश विष्णू आरेकर व त्यांचे घरातील भाडेकरु सुभाष केशव सारवे व त्यांच्या सोबत मुंबई येथुन आलेले ८ ते ९ जण हे कर्जत दहिवली येथील आरेकर यांच्या घरात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा अर्चा करत आहेत. अशी माहिती येथील स्थानिक माजी नगरसेवक निलेश बाळू घरत यांना मिळाल्याने त्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावले असता एका रूम मध्ये खोदलेला खड्डा आणि कापलेला बकरा,कोंबडा दिसला, त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता आरेकर यांनी माहिती दिली कि मी मुंबई येथे नोकरीस आहे, मी सतत आजारी असतो चार वर्षापुर्वी मला एका मांत्रिकाने सांगितले की तुझ्या गावाकडील घरामध्ये कोंबडा आणि बकरा याचे रक्त टाक त्यावेळी आजार बरा होईल त्यामुळे हा मान दिल्याचे सांगितले.
त्यावरून निलेश घरत यांनी पोलिसात तक्रार दिला असून कर्जत पोलिसांनी क़ॉ. गुन्हा रजि. नंबर ०९ / २०१४ महाराष्ट्र नरबळी आणि एतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटन अँक्ट २०१३ चे कलम ३(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पोलीसांनी घरमालक मुकेश विष्णू आरेकर, भाडेकरु सुभाष सारवे,संजय गुरव आणि दिलीप गुरव ( रा. सांताक्रुज मुंबई) अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज रविवार दि.२९ जुन रोजी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आर. आर. पाटील यांनी घटना स्थळाची पाहणी केली त्यांच्या समवेत पोलीस उपनिरिक्षक एम.व्ही. पवार, पोलीस उपनिरिक्षक एस. डी. पलांडे, पोलीस हवालदार जी. आर. मदगे, बाळा जाधव, पी. की. वाघमोडे हे उपस्थित होते.