कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.आर.अंतुले यांनी रायगडातील शेकापच्या उमेदवारांना आशीर्वाद दिल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.85 वर्षांच्या अंतुले यांनी असा निर्णय का घेतला ?, शेकाप बरोबर असलेले पन्नास वर्षांचे वैर अंतुले एका रात्रीत कसे विसरले ?,त्यांनी आशीर्वाद दिल्याने जिल्हयातील कॉग्रेसचे नेते त्याचा शब्द पाळतील काय? त्यानी आशीर्वाद दिल्याने त्याचा फायदा शेकापला होईल काय? या प्रश्नांची चर्चा करणारा एक कार्यक्रम मंगळवारी रात्री झी-24 तासवर झाला.त्याची व्हिडिओ क्लीप ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला नाही त्यांच्यासाठी…