अंजली दमानिया अडचणीत

    0
    690

     आपच्या लोकसभेच्या उमेदवार अंजली दमानिया यांच्यावर शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप होत आहे. कोंढाणे धरण परिसर विकास मंचच्या शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.दमानियांनी कोंढाणे परिसरात ३१ एकर जमीन विकत घेतली होती. त्यात शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला नव्हता, त्यामुळं दमानियांनी तो पैसा शेतकऱ्यांना परत करावा अशी मागणी विकास मंचनं केली आहे दरम्यान, नागपुरात आज सकाळी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होत असतानाच, आपचे नेते अजय संघी यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.यावेळी संघी आणि किशोर तिवारी यांच्यात बाचाबाचीही झाली. त्यामुळं काही काळ वातावरणात तणाव होता.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here