टीव्हीवर ऑनएअर शो सुरू असताना दोन अँकरमध्ये कडाक्याचे लागलेले भांडण,एका अँकरने आपल्या लहान मुलीला घेऊन केलेले अ‍ॅकरिंगच्या घटना ताज्या असतानाच आता अशीच एक भन्नाट घटना घडली आहे.अँकरच्या डोक्यावर चक्क एक पक्षी येऊन बसला.कॅलिफोर्नियाच्या सेन डियागोच्या केएफएमबी या वाहिनीवर हा प्रकार घडला.हा पक्षी बंदिस्त खोलीत कसा आला,कुठून आला याचा उल्लेख मात्र बातमीत नाही.योगायोग असा की,जो शो सुरू होता त्या शो चं नाव पक्ष्यांच्या घरट्यांचा दिवस असं होतं.त्यामुळं डोक्यावर पक्षी येऊन बसणे हा शो चाच एक भाग असावा असंही प्रेक्षकांना वाटलं असावं.मात्र अचानक उद्दभवलेल्या या प्रसंगाचा सामना दोन्ही अँकरनं मोठ्या हिकमतीनं केला.

सेन डियागोच्या केएफएमबी टीव्हीवर सकाळचा शो सुरु होता. या शोचं नाव ‘पक्ष्यांच्या घरट्यांचा दिवस’ असं होतं. हा शो निकेल मेडिया आणि एरिक कानहर्ट हे दोन अँकर सादर करत होते. तेवढ्यात एक परदेशी पक्षी निकेल मेडिया यांच्या डोक्यावर येऊन बसला. ही घटना पाहून प्रेक्षकांसह त्या निकेलसोबत अँकरिंग करणाऱ्या एरिक यांनाही हसू आवरत नव्हते. तर निकेल यांनी अतिशय शांतपणे या घटनेचा सामना केला. अजिबात न डगमगता त्या शांत बसून राहिल्या. लाईव्ह कार्यक्रमावेळी झालेल्या या घटनेचा व्हिडीओ तत्काळ व्हायरल झाला आहे.

 या व्हिडीओतील निकेल यांच्या डोक्यावर बसलेला पक्षी स्कारलेट बर्ड आहे. हा पक्षी कॅलिफोर्नियाच्या सॅन डियागो पक्षी अभयारण्याचा निवासी आहे. आता लाईव्ह बुलेटीन सुरु असताना हा पक्षी अचानत कसा आला हे मात्र समजू शकले नाही. पण अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रसंगाला अँकरने दिलेला प्रतिसाद खऱ्या अर्थाने कौतुकास्पद होता. नुकताच लाहोरमधील ‘सिटी ४२’ या चॅनलचे दोन अँकर एकमेकांशी भांडत असल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याआधीही अँकरिंग करत असताना अचानक स्टुडिओमध्ये कुत्रा किंवा मांजर आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अँकरिंग करणे हे ग्लॅमरस आहे असे वाटत असले तरीही त्यामध्ये अशाप्रकारची आव्हानेही येऊ शकतात.
लोकसत्ता ऑनलाईनच्या आधारे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here