एस.एम.देशमुख यांचा 25 जानेवारीला माजलगावमध्ये
अजित पवार यांच्या हस्ते सत्कार

मुंबई : पत्रकार संरक्षण कायदा ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सरकारला करावा लागला त्या एस. एम.देशमुख यांचा भव्य सत्कार 25 जानेवारी रोजी माजलगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे.. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, आमदार प़काश सोळंके तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे माजलगाव तालुका पत्रकार संघाच्या प़सिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे..
महाराषटात सातत्यानं पत्रकारावर हल्ले होत असत.. त्यापासून संरक्षण मिळावे यासाठी एसेम देशमुख यांनी प्रथम २००५ मध्ये सरकारकडे मागणी केली.. त्यानंतर सतत बारा वर्षे हा विषय लावून धरला.. अखेर देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आले आणि डिसेंबर 2019 मध्ये हा कायदा राज्यात लागू झाला.हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे.. . राज्यातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी देशमुख यांनी जे योगदान दिले आहे त्याबद्दल माजलगाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने देशमुख यांचा गौरव करण्यात येत आहे..
एसेम देशमुख यांचे महाविद्यालयीन शिक्षण माजलगावमध्ये झाले. एसेम यांच्या पत्रकारितेला सुरूवात देखील माजलगाव मधूनच झालेली असल्याने माजलगाव मधील पत्रकारांच्यावतीने होणारया एसेम यांच्या सत्कारास विशेष महत्व आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here