डोंबिवली मध्ये सोमवारी SM यांचा सत्कार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पत्रकारांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या कल्याण डोंबिवली पत्रकार संघाने पत्रकार संरक्षण कायदा मंजुर करण्यासाठी लढा देणारे एस.एम. देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार तसेच पत्रकार संरक्षण कायदा व पत्रकारांसाठी असलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिबीराचे आयोजन केले आहे.

सोमवार दि. २९ मे रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह , कल्याण डोबिवली महापालिका , डोंबिवली विभागीय कार्यालय ,डोंबिवली पूर्व येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महापौर राजेंद्र देवळेकर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते एस .एम .देशमुख यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. यासमयी पत्रकार लढा कृती समितीचे अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचेे अध्यक्ष एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तुषार राजे प्रमुख वक्ते असणार आहेत.

या समारोहास विशेष उपस्थिती म्हणून उपमहापौर मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी अनिरुध्द अष्टपुत्रे, सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरास व सत्कार सोहळयास कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी तसेच पत्रकार मित्रांनी उपस्थित राहावे , असे आवाहन कल्याण डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here