सीएम यांना कळवा  …आपल्या ‘मन की बात’…  एसएमएस व्दारे…

मित्रांनो,

आपल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आपण यापुर्वी किमान तीन वेळा एसएमएस भडीमार आंदोलन करून मुक्यमंत्र्यांना 15,000 च्यावर  एसएमएस पाठविले.त्याचा चांगला परिणाम झाला.पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भात आपल्या भावना किती तीव्र आहेत याची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली आणि कायदा झाला.आता पुन्हा एकदा पेन्शन,संरक्षण,मजिठिया आणि छोटया वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांकडं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी एसएमएस व्दारे आपल्या ‘मन की बात’ मुख्यमंंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत.देशात अशा पध्दतीचं अनोखं आंदोलन आपणच प्रथम केलेलं आहे.मागच्या प्रमाणंच यावेळेसही मुख्यमंत्र्यांना जास्तीत जास्त एसएमएस पाठवून आपल्या भावना व्यक्त कराव्यात ही विनंती.

मुख्यमंत्र्यांना पाठवायाच्या मजकुराचा नमुना खाली दिला आहे.हा मजकुर टाइप करून त्याखाली प्रत्येकाने आपले नाव आणि पत्ता लिहावा आणि तो सीएम आणि महासंचालक माहिती आणि जनसंपर्क .यांना पाठवावा.दोन्ही मान्यवरांचे मोबाईल क्रमांक खाली दिले आहेत.गुरूवारी सकाळपासून हे एसएमएस पाठवायला सुरूवात करावी ही विनंती.सर्व एसएमएस एकाच दिवसी गेले पाहिजेत.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातलं हे अनोख एसएमएस आंदोलन यशस्वी करावं ही विनंती.हा मसेज ट्विटरवरूनही पाठविता येईल.

एसएमएस साठीचा मजकूर 

सीएम सर,

आम्हाला हवंय पेन्शन,

संरक्षण, आणि मजिठिया !

छोटया वृत्तपत्रांच्या प्रश्‍नांकडंही आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो.

कृपया आश्‍वासनाची पूर्तता त्वरित  व्हावी ही विनंती .

(एसएमएसच्या खाली प्रत्येकानं आपलं नाव,आणि गावाचं नाव लिहावं.)

(उदाहरणार्थ)

एस.एम.देशमुख

निमंत्रक,

पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मुंबई

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा मोबाईल नंबर 9373107881    Twitter       (@Dev_Fadnavis )
महासंचालक श्री. ब्रिजेश सिंग यांचा मोबाईल नंबर 8451802266    Twitter        (@Brijeshbsingh )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here