2014
पत्रकारांवरील हल्ले,धमक्यांच्या घटना
————————————
3 जानेवारी –
पौड-मुळशी येथील पुढारीचे पत्रकार किसन बाणेकर यांना स्थानिक पोलिस निरिक्षक मोरे यांना बेकायेशीरपणे डाबले अजित पवार यांना मोरे यांच्या विरोधात निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता त्याला वेडा ठरवून सहा तास डांबून ठेवले.
4 जानेवारी- नादेड जिल्हयातील मालेगाव येथील लावणी महोत्सवात पत्रकारासाठी राखीव ठेवलेल्या जागांवर पुढारी बसले.त्याला पत्रकारांनी आक्षेप घेतल्यावर जि.प.अध्यक्षांचे पीए मिलिंद व्यवहारे आणि मोकल शेळके यांनी पत्रकाराशी असभ्य वागणूक.धक्काबुक्की.
7 जानेवारी– माजलगाव येथील पत्रकार जहागिरदार यांनी रस्तयातील कामात झालेल्या गैरकारभाराची बातमी छापल्याबद्दल स्थानिक आमदार प्रकाश सोळंके यांच्या पीएची जिवे मारण्याची धमकी.
8 फेब्रुवारी– नवी मुंबई येेथील पत्रकार सागर मेघे याच्यावर हल्ला
9 फेब्रुवारी- लातूर येथील पत्रकार रवींद्र जगताप यांच्यावर मेडिकलच्या विद्यार्थ्यांा ल्ल्ला,जगताप गंभीर जखमी.
13 फेब्रुवारी- अलिबाग येथील पुढारीचे पत्रकार रमेश कांबळे यांच्यावर महिला कार्यकर्त्यांकूडन हल्ला.एका कार्यकमात काही महिलांनी डान्स केला.त्याची बातमी छापल्यामुळे हा हल्ला झाला
17 फेब्रुवारी- खोपोली येथील समाज वैबव साप्ताहिकाचे संपादक गोकुळदास येशीकर यांना कॉग्रेस पुढारी अय्युब पटेल यांची मारहाण
18 फेब्रुवारी- मुंबई येथील परळ भागात असलेल्या आदिती हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या मिड-डेच्या चार महिला पत्रकारांबरोबर असभ्यवर्तन.सहा आरोपींना अटक.
23 फेब्रुवारी – नांदेड जिल्हयातील सावभैौम जनता चे संपादक विवेक केरूरकर यांना पोलिसांची बेदम मारहाण.पोलिसांच्या विरोधातील बातम्यांच्या कारणांवरून ही मारहाण झाली.
1 मार्च– पिंपरी येथील साप्ताहिक मर्द महाराष्ट्रचे संपादक राम गायकवाड यांना संजय चव्हाण याकडू मारहाण
2 मार्च- इंदापूर येथील प्रभातचे पत्रकार निळकंठ मोहिते यांना कॉग्रेसवाल्यांक डून मारहाण.यात्रेची बातमी दिल्यामुळे ही मारहाण झाली.आरोपी वकिलाला अटक नाही.
2 मार्च- शिरूर येथील पत्रकार मुकुंद मनोहर ढोबळे यांच्यावर पोलिसांकडून एका महिलेचा विनयभंग केल्याचा खोट्या आरोपाखाली ्र354 चा गुन्हा दाखल.
3 मार्च- सागली येथील पत्रकार रवींद्र कांबळे यांच्या जय महाराष्ट्र वाहिनीचा लाईव्ह शो बंद पाडला.कांबळे यांना धक्काबुक्की.दमदाटी
17 मार्च- मुंबई येथील जिया न्यूजची महिला पत्रकाराची होळीच्या दिवशी झेडछाड.कॅमेरामनला मारहाण.चार अटकेत.अंधेरीत घडली घटना.
19 मार्च- परभणी जिल्हयातील सोनपेठ येथील पत्रकार भागवत शंकराप्पा पोपडे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण.एका कार्यक्रमाची सेना उमेदवाराची बातमी दिल्याने ही मारहाण झाली.
30 मार्च
नगर जिल्हयातील जामखेड येथील पत्रकार सांताराम सुळ आणि राहता येथील पत्रकार अशोक सदाफळे यांना बातम्या दिल्यामुळे जिवे मारण्याच्या धमक्या.
3 एप्रिल –
मुंबई येथील जय महाराष्ट्र वाहिनीचे कॅमेरामन दिलीप राय यांना शिवसेना-मनसे दंगलीच्या वेळेस मारहाण त्यांच्या डोक्यात सोडा वॉटरच्या बाटल्या फोडल्या.ते गंभीर जखमी झाले.
१३ एप्रिल २०१४
पनवेल येथील साप्ताहिक आदिवासी सम्राटचे संपादक गणपत जाणू वरगडा यांनी वनविभागाच्या भ्रष्टाचाराची बातमी छापल्याबद्दल वनपाल ठाकूर यांची पत्नी आणि मुलाने संपादकांना जिवे मारण्याची धमकी दिली तसेच जातीयवाचक शिविगाळ केली.याची तक्रार पनवेल पोलिसात दिली गेली आहे.
15 एप्रिल 2014
मुर्तीजापूर येथील पत्रकार निलेश पिंजरकर आणि अन्वरखान यांना संस्थाचालक डॉ.राजेश कांबे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.कांबे यांच्या पॉलिटिकल कॉलेजमधील एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची बातमी छापल्याबद्दल ही धमकी दिली गेली.तक्रार दाखल.गुन्हा नोंदविलाय
17 एप्रिल 2014
सकाळचे पत्रकार तुषार खरात यांना आमदार जयकुम गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी माण तालुक्यातील पांढरवाडी येथील मतदान केंद्रात 17 एप्रिल रोजी मारहाण केली.गोरे आपल्या पन्नास कार्यकर्त्यासह मतदान केंद्रात घुसले आणि मुलाणी नावाच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीला मारहाण करू लागले.त्यावेळी तेथे कव्हरेजसाठी उपस्थित असलेल्या तुषार खरात यांनी मध्यस्थी करण्याचा प्रय़त्न केला असता त्यांनाही बेदम मारहाण केली गेल
२५ एप्रिल २०१५
पुणे जिल्हयातील वालचंदनगर येथील सकाळचे बातमीदार सचिन लोंढे यांच्यावर आज एका मटका चालकाने हल्ला केला आहे.त्यात ते आणि त्यांचा भाऊ जखमी झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. मारहाणीत सचिन लोढे यांचा हात फ्र्रक्चर झाला आहे. मटका आणि अन्य बेकायदा धंद्याच्धा त सचिन लोंढे बातम्या देत असल्याच्या रागातून यापूर्वी देखील त्यांच्यावर हल्ला केला गेला होता.
27 एप्रिल 2014
मुंबई येथील एका वाहिनीचे पत्रकार संजय प्रसाद यांना मालाड भागात काही गुंडांनी मारहाण केली.संजय प्रसाद आपल्या पत्नी सोबत बाजारात गेले असता गुंडांनी पत्रकाराच्या पत्नीची छेड काढली.संजय प्रसाद यांनी जाब विचारला असता पाच-सहा गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली.सहा जणाच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केले आहे.
30 एप्रिल 2014
कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा यांना काल सायंकाळी दोन युवकांनी बस स्थानकावर बेदम मारहाण केली त्यात बोरा यांचे डोके फुटले आहे.बोरा हे पुण्यनगरी तसेच एका वृत्तवाहिनीचे काम करतात.बोरा.त् डोके फुटले असून त्यांच्या तोंडाला,छातीला मार लागला आहे.त्यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.
30 April 2014
30 एप्रिल रोजी मलकापूर नगरपालिकेवर नेण्यात आलेल्या तोडफोड मार्चाची बातमी देताना खबरे शामतक या दैनिकाने आमदार संचेती यांचे बंधू सुरेश संचेती यांचे नाव मनसे कार्यकर्त्यांच्या नंतर छापले होते.त्यामुळे चिडलेल्या सुरेश संचेती यांनी फोन करून पत्रकार विरसिंह राजपूत यांना जिवे मारण्याची धमकी दिली.या घटनेचा शहर आणि तालुका पत्रकार संघाने निषेध केला आहे.तसेच एक निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे
7 may 2014
सातारा जिल्हयातील फलटण येथील एेक्य आणि सकाळच्या कायार्लयावर हिंदुस्थान प्रजा पक्षाच्या
गुंडांनी हल्ला केला,तोंडाला रूमाल बांधून आलेल्या या गुंडांनी लोखंडी सळयांनी दारे,खुच्यार् टेबल तोडले.त्यांची बातमी दिली नाही असा त्यांचा आक्षेप होता.त्यामुळं हा हल्ला झाल्याचं सागणयात येतंं
18 मे 2014
जळगाव येथील गणपती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यानं एका अपघातात जखमी झालेले सकाळचे बातमीदार गणेश खाबेटे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसात केली आहे.
19 मे 2014
बीड जिल्हयातील अंबाजोगाई येथील दैनिक विविकसिंधूचे संपादक नानासाहेब गाठाळ यांना आमदार पृथ्वीराज साठे यांनी अवार्च्चा शिविगाळ करून धमक्या दिल्या आहेत.तुमच्या मुलाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्ही कसे वतर्मानपत्र चालवता ते बघतो अशीही धमकी त्यांनी गाठाळ यांना दिली आहे.विविकसिंधूचे वृत्तसंपादक अभिजित गाठाळ यांनी निवडणूक निकालाचे विशलण करणारा एक लेख लिहिला होता.त्यात साठे यांच्यावर कसलीही व्यक्तीगत टीका केलेली नव्हती.तरीही त्यांनी धमक्या दिल्या आहेत.या प्रकरणी नानासाहेब गाठाळ यांनी पोलिसात तक्रार दिली
22 मे 2014
जालना येथील साप्ताहिक विश्वप्रतापचे संपादक विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूत ( वय 35) यांची 22 मे 2014 रोजी निर्घृण हत्त्या करण्यात आली.पाच तरूणांनी ही हत्त्या केल्याचे समोर आले असून ते सर्व 19 ते21 वयोगटातील आहेत.पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
30 मे 2014
भंडारा येथील आमदार अनिल बावनकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नवनिर्वाचित खासदार नाना पटोले यांच्यावर काही आरोप केले होते.तसेच नाना पटोले खोटारडे आहेत असा शब्दप्रयोगही त्यांनी केला होता.यासंबंधिची बातमी आणि वृत्तविश्लेषण देशोन्नतीच्या 30 मे च्या भंडारा आवृत्तीत प्रसिध्द झाले होते.त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी 30 मे रोजी देशोन्नतीच्या भंडारा जिल्हा कार्यालयावर हल्ला चढवत जिल्हा प्रतिनिधी चेतन भैराव यांच्या नावाने शिविगाळ केली.भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले.तसेच देशोन्नतीच्या अंकाची होळी केली
11 जून 2014
सामनाच्या 11 जून 2014च्या अंकात शरद पवारांवर टीका कऱणारा बेताल बडबड या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिध्द झाला आहे.त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या लोकांनी सामनावर मोर्चा काढला,दगडफेक केली,अंकाच्या प्रती जाळल्या.यावेळी शिवसेना- राष्ट्रवादी कार्यकर्त्यात मोठा राडा झाला
16 june 2014
दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद कळस्कर यांच्यावर अकोला तालुक्यातील वडद बुद्रूक येथे शनिवारी रात्री ११ वाजता वाळूमाफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दहिहांडा पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून, इतर दहा ते बारा हल्लेखोर फरार झाले आहेत.
26 june 2014
चिकणघर / म्हारळ : ‘लोकमत’चे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबुलाल ठाकूर (४४) यांची काल राहत्या घरी निर्घृण हत्या झाली. ठाकूर यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह उघड्यावर जाळून व खून झाला त्या खोलीची फरशी धुऊन पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला असून, या प्रकरणी ठाकूर यांची भावजय आणि पुतण्या यांना टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले
26 जून 2014
माजलगाव येथील दैनिक सुराज्यचे प्रतिनिधी उमेश जेथलिया यांच्यावर गुरूवारी ( दिनांक 26-06-14 रोजी ) हल्ला कऱण्यात आला.यापुर्वी देखील जेथलिया यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.जेथलिया यांनी याची तक्रार माजलगाव पोलिसात दाखल केली आहे.
28जून2014
पुणे जिल्हयातील देवगाव येथील घोडनदीच्या पात्रात वाळू उपसा कऱणाऱ्या वाळूमाफियाकडून झी-24 तासचे साईदीप ढोबळे यांना मारहाण,धक्काबुक्की
10 जुलै 2014
अभिनेता सलमानखान याच्या किक चित्रपटाच्या निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात सलमानच्या बॉडीगार्डची छायाचित्रकारांना धक्काबुक्की.सलमानवर छाय़ाचित्रकारांचा बहिष्कार.त्यानंतर सलमानची नोकरी घालविण्याची धमकी.
25 जुलै 2014
साहसिकचे संपादक रवी कोटंबकर यांच्यावर एका मंत्र्यांचे पीए पवन गोसेवाडे यांनी हल्ला केला.संपादक जखमी झाली आहेत.
27 जुलै 2014
शेगाव ( टीम बातमीदार ) अकोला जिल्हयातील शेगाव येथील मातृभूमीचे वातार्हर देवानंद उमाले ायंच्यावर काल शेगाव येथे जीवघेणा हल्ला झाला.काही दिवसांपूवीर् उमाले यांनी स्थानिक काही पुढाऱ्यांच्या विरोधात बातमी छापली होती.त्यातून हा हल्ला झाल्याचा आरोप उमाले यांनी केला आहे.सात-आठ हल्लेखोऱ आले आणि त्यांनी अचानक हल्ला केला.हा हल्ला झाला तेव्हा स्थानिक पत्रकार कृष्णा म्हस्के,दिनशे महाजन,मंगेश ढोले आदि पत्रकार होते.हल्ल्यात उमाले यांच्या डोक्याला .मानेला मार लागला असून त्यांच्यावर रूगण्लायत उपचार करण्यात आले आहेत.
18 August 2014
वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीच्या बिलाची वारंवार मागणी करूनही ती न देणाऱ्या कॉग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याने वैजापूर तालुक्यातील गारज येथील पत्रकार बाबासाहेब पवार यांना यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.धमकी देणाऱ्या पुढाऱ्याचं नाव निवृत्ती मच्छिंद्र बारसे असे असून तो कॉग्रेस सेवा दलाचा माजी अध्यक्ष होता
22 August
पनवेल येथील दैनिक कर्नाळा मध्ये बातमी छापल्याच्या आरोपावरून संपादक प्रफुल्ल फडके यांच्या विरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल कऱण्यात आला.स्थानिक कॉग्रेस नेते प्रकाश बिनेदार यांनी ही तक्रार केली होती.
24 August
शेगाव येथील स्थानिक जेष्ठ पत्रकार विजय मिश्रा यांना काल ( २१ ऑगस्ट ) एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने मारहाण केली. प्रवीण बोदडे आणि एका युवकाने मिश्र यांना विनाकारण मारहाण केली आहे. एका महिन्यात पत्रकारांना मारहाण होण्याची दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी शेगावच्या पत्रकार देवानंद उमाले आणि एकाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
30 August14
धानोरा येथील पत्रकार अल्लऊद्दीन लालानी यांना पोलिस निरिक्षक वैभव माळी यांनी बेदम मारहाण करीत जनावारांसारखे गाडीत कोंबले आणि त्यानां पोलिस ठाण्यात घेऊन गेले.एका मुख्याध्यापकाने लालानी यांनी आपल्या विरोधात वर्तमानपत्रात बदनामी करून पैश्याचा तगादा लावला अशी तक्रार केली होती.या तक्रारीनंतर माळी लालानी यांच्या दुकानात गेले.त्यांना गाडीत कोंबले.याचा विरोध करण्यासाठी मग जनता रस्तयावर आली.त्यामुळं त्यांची बदली केली गेली.
09 0ct 2014
डियन एक्प्रेसचे छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांना काल पोलिसांनी धक्काबुक्की केली.सोनिया गांधी यांच्या सभेच्या वेळेस कोल्हापुरात ही घटना घडली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत आहे
12 ऑक्टोबर 2014
लोणी काळभोर येथील पत्रकार सीताराम लांडगे यांना पोलिस निरिक्षक अभिमान पवार यांनी अऱेरावीची भाषा करून खुनाची धमकी दिली.
7nov2014
पनवेलमध्ये महिला पत्रकारावर प्राणघातक हल्ला
पनवेल येथील कर्नाळा टीव्हीच्या महिला पत्रकार चेतना वावेकर यांयावर आज सकाळी पनवेल येथे काही गुंडांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात वावेकर यांना गंभीर दुखापत झाली असून एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या संबंधिची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतल्याचे समजते.
8 Novembr 2014
पनवेल येथील महिला पत्रकार चेतना वावेकर याच्यावर झालेल्या हल्ल्याने महाराष्टा्रातील मिडिया जगत संतप्त असतानाच काल रात्री पुणे येथील पुण्यनगरीच्या पत्रकार अश्विनी सातव-डोके यांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला क रून दङशत निर्माण करण्याचा प्रय़त्न केला आहे.या हल्ल्यात अश्विनीच्या आई आणि 75 वर्षांच्या आजींना धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते.हल्ला झाला तेव्हा या दोघीच घरात होत्या.या प्रकरणी तक्रारीत आरोपींची नावे दिली असली तरी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.घरगुती वादातून हा हल्ला झाला असला तरी सभ्य समाजात अशा हल्ल्यानंा स्थान नसल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत आहे.
8 नोव्हेंबर 2014
कोल्हापूरमधील पत्रकार सुखदेव श्यामराव गिरी,बाळासाहेब मारोती पाटोळे,शशी बिडकर,आणि अमोल माळी यांना पल्स पॉलिसीच्या संदर्भात बातमी दिल्यामुळे एजंटांची जिवेमारण्याची धमकी.अजामिनपात्र गुन्हा दाखल
12 नोव्हेंबर 2014
नागपूर येथील हिंदी दैनिक भास्करच्या कार्यालयावर दिनांक 12 नोव्हेबंर 14 रोजी हल्ला करण्यात आला.ख्रिश्चन समाजाच्या 50-60 जणांच्या टोळक्यानं हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.या हल्ल्यात कार्यालयातील साहित्याची मोठी हानी झाली तसेच पत्रकारांना मारहाण केली गेली.
17नोव्हेंबर 2014
खामगा-बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील दैनिक लोकोपचारचे संपादक काका रूपारेल यांच्याघरावर 17च्या रात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रय़त्न् केला.
काका रूपारेल यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली असून अवैध्य धंद्यावाले किंवा कॉग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी आपल्या घरावर हल्ला केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.रूपारेल यांनी अवैद्य धंद्याचय विरोधात सातत्यानं लिखाण केल्याने त्यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झाला होता.
18 नोव्हेंबर2014
परभणी येथील गावकरीचे प्रतिनिधी मोहसिन खान यांच्यावर अज्ञात गुडांनी हल्ला केला.पोलिसाच्या प्रेस नोटच्या आधारे तडीपार केल्या गेलेल्या गुडांची नावं छापली गेल्याच्या रागातून हा हल्ला केला गेला आहे.मोहसिन खान याच्या पायाला,डोक्याला मार लागला आहे.
21 नोव्हेंबर 2014
नंादेड जिल्हयातील लोहा -कुंडलवाडी येथील पत्रकार आणि कुंडलवाडी अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष,लोकमत समाचार या हिंदी दैनिकाचे प्रथिनिधी संतोष मेहकर यांच्यावर 20 रोजी हल्ला केला गेला.
29-11-2014
जीवन न्यूज वाहिनीचे श्रीगोंदा येथील प्रतिनिधी संतोष भागवत यांच्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी हल्ला केला.भागवत जाहिरातीचे पैसे मागायला गेले असता हा हल्ला केला गेला.पोलिसांत तक्रार दाखल केली गेली आहे.
29-11-2014
मेरा भारत समाचार या वाहिनीच्या रत्नागिरी येथील ब्युरो चीफ मयुरी सुपल यांच्या घरावर हल्ला.रत्नागिरी जवळच्या नाचणे गावातील ग्रामपंचायतीने त्यांचा गडगा तोडला होता.त्याची तक्रार त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केल्यामुळे संतापून काही हितसंबंंधियांनी हा हल्ला केला आहे.तक्रार दाखल
अपहरण 29-11-14
मुंबई येथील पत्रकार अनिल जोशी यांचे अपहरण.49 हजार लुटून चेंबुरला निर्जन टिकाणी सोडला.दोघांंंंंना अटक .माटुंगा पोलिसात तक्रार
30 Nov 2014
ABP माझा चे प्रतिनिधी सागर वैद्य यांच्या वर प्राणघातक हल्ला ..मुजोर रिक्षाचालका सह मद्यपींचा भरचौकात धुडगूस,वाहातुक पोलिसला धक्का बुक्की..मध्यस्थी करणाऱ्या IBN लोकसमतचे कँमरामन हेमंत बागुल यांनाही मारहाण करीत त्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट घेऊन टोळक्याने हिसकावू पलायन केले .
05-12-14
बीड येथील पत्रकार दिनेश लिंबकर यांना पोलिसांची मारहाण
08-12-14
आज आणखी एका पत्रकारावर राज्यात हल्ला झाला तर अन्य एका ठिकाणी पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली.पहिली घटना रायगड जिल्हयातील खोपोलीतली आहे.पत्री सरकार या साप्ताहिकाचे संपादक सचिन यादव यांना सुरभी ज्वेलर्स चे मालक महेंद्र थोरवे आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी मारहाण केली
08-12-14
दुसरा प्रकार बीड जिल्हयातील वडवणीत घडला.पत्रकार भैय्यासाहेब तागडे अतिक्रमण विरोधी मोहिमेची छायाचित्रं काढत असताना त्यांना पोलिसांनी दमदाटी केली.त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.
12-12-14
पवईतील आयआयटीच्या कार्यक्रमाच्या वेळेस आयोजक आणि विद्यार्थ्यांची माध्यमांच्या प्रतिनिधीना धक्काबुक्की.या कार्यक्रमास सचिन तेंडूलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता.
१३-१२-१२
बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी अमिर शेख यांच्यावर गावगुंडानं भ्याड हल्ला केला आहे.त्यात शेख गंभीर जखमी झाले आहेत.हल्लेखोर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचं समजतं.
13-12-14
औरंगाबाद येथील आयबीएन-लोकमतचे सिध्दार्थ गोदाम यांच्यावर सिद्दीकी नावाच्या पीएसआयने शासकीय कामात अडथळा आणला या कलमाखाली खोटा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल.
13-12-14
मिड-डे चे पत्रकार शिरीष वाकटानिया यांच्यावर काल रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केला.शिरीष आपल्या कुटुंबासमवेत गाडीतून जात असताना एक गाडी अचानक त्याच्या गाडीसमोर लावली गेली.आणि त्यांना शिविगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केला गेला.तसेच जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या संदर्भात कांदिवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 डिसेंबर 2014
बीड जिल्हयातील पाटोदा येथील पुण्यनगरीचे वार्ताहर अमिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला.पाटोद्यावरून जामखेडकडे दुचाकीवरून जात असताना विक्रम गर्जे यांनी हा हल्ला केला.बातम्या देतोस काय भडव्या अशा शिव्या देत हा हल्ला झाल्याचे शेख यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
24 डिसेंबर 2014
सोलापूर जिल्हयातील टेंभुर्णीत घडली.टेंभुर्णीचे एकमतचे वार्ताहर प्रवीण तुपसौंदर यांच्यावर आज गावातील एका जुगार किंगने भरचौकात हल्ला केला.या घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली असून आरोपी फरारी आहेत.
24 डिसेंबर 2014
गोकुळनीती दैनिकाचे संपादक अर्पण गोयल यांच्यावर काल रात्री तीन व्यक्तिंनी हॉकीस्टिकने हल्ला केला.त्यात ते गंभीर जखमी झाले असून या प्रकराणाची फिर्याद कदीम पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.आरोपी फरार आहेत.गेल्या दोन दिवसातला हा दुसरा हल्ला असून भाजप युती सरकार सत्तेवर आल्यानंतरचा 23 वा हल्ला आहे.
———————————————————————————————————————————————–
पत्रकारितेतील अन्य महत्वाच्या घटना-घडामोडी
3 जानेवारी
मजिठिया आयोगाच्या शिफारशीना विरोध कऱणारी मालकांची याचिका सर्वोच्च उच्च न्यायालयाने फेटाळून लावत मजिठिया आयोगाच्या शिफाऱशींची अमंलबजावणी कऱण्याचा आदेश दिला.
5 जानेवारी
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या एका शिष्टमंडळाने राळेगण येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली.पत्रकारांच्या लढ्यास आणि 17 फेब्रुवारीच्या डीआयओ कार्यालयास घेराव आंदोलनास अण्णांनी पाठिंबा जाहीर केला.
5 जानेवारी
– सासवड येथील साहित्य संमेलनात कुमार केतकर यांनी मोदीच्या उदयानंतर फॅसिस्टवृत्ती वाढल्या आणि नरेद्र दाभोळकर यांची हत्तया अशाच वृत्तींनी केली असे मत व्यक्त केले.त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेद्र फडणवीस यांनी एळाद्या संपादकास वेड लागल्यानंतर त्याला आम्ही इ ग्नोर करतो असे मत व्यक्त करीत केतकरांची तुलना प्राण्यांबरोबर केली.त्याचा सर्वत्र निषेध केला गेला. यचवर 6 जानेवारी रोजी आबीएन -लोकमतवर च र्चा
7 जानेवारी ( आत्महत्त्या )
– जय महाराष्ट्रमधून काढून टाकल्याने नैराश्येच्या गर्देत सापडलेल्या कॅमेरामन विकास चव्हाण यांचा ह्रद्यविकाराने मृत्यू झाला.ते अवघे 32 वर्षांचे होते.पत्नी आणि कुटुंबिय उघडयावर
—निधन –
– भंडारा लोकमत कार्यालयातील ऍापरेटर अंकुश विनायकराव वानखेडे यांचे अपघाती निधन ते 26 वषार्ंचे होेते.-
10 जानेवारी
निवृत्त प्रशासकीय अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मराठी माध्यमाना जातीयवादी ठरविले.दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत त्यांना आदर्श बद्दल विचारताच ते चिडले आणि मराठी मिडिया जातीयवादी असल्याचा आरोप केला.तसेच त्यांनी मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींशी मराठीत बोलायलाही नकार दिला.
–
30 जानेवारी
दृवाभिमान संघठनेचे निलेश राणे यांचा गुंडांची दुसरी पिढी असा उल्लेख केल्याबद्दल निलेश राणे यांनी आय़बीएन-लोकमतचे निखिल वागळे यांच्यावर
50 कोटी रूपयांचा अबु्रनुकासानीचा दावा दाखल केला आहे.
–
31 जानेवारी
द्वारकापिढाचे शंकराचार्य सरस्वती यांनी जबलपूर येथील एका पत्रकाराच्या श्रीमुखात भडकाविली.नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील काय असा प्रश्न त्यानं विचारला होता.
03 – फेब्रुवारी
औरंगाबाद येथील पत्रकार बासिद मोहसिन यांचे ह्रदयविकाराने निधन ते 59 वर्षांचे होते.
5 फे ब्रुवारी
पाकिस्तान आणि इंडियाचे कलाकार असलेल्या एका बॅन्ड पथकाचा कार्यक्रम काळा घोडा महोत्सवात होणार होता.त्यासंबंधीची पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लबमध्ये सुरू असताना शिवसेनेच्या कार्यकत्यार्ंनी तेथे गोंधळ घालून पत्रकार परिषद बंद पाडली.या घटनेचा प्रेस क्लबवर हल्ला म्हणत प्रेस क्लबने निषेध केला आहे.
4 एप्रिल 2014
मुंबईतील शक्ती मिल परिसरात एका फोटो जर्नालिस्टवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या प्रकरणात कासीम बंगाली,सलिम अन्सारी आणि विजय जाधव या तीन आरोपींना फाशीची तर सिराज शेख याला जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायालायने ठोठावली.
09 एप्रिल 2014
मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू कऱण्यास स्थगिती मिळावी यासाठी माध्यमांच्या मालकांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका मुख्यन्यायाधीशांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.मालकांना हा मोठा दणका समजला जात असून आता सर्व मार्ग बंद झाले आहेत
10 एप्रिल 2014
लडके है गलती होती है,असे अकलेचे तारे तोडून मुबईच्या शक्तीमिल बलात्काराच्या प्रकरणातील दोषींची समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी पाठराखण केलीय.बलात्काराच्या खटल्यात दोषी असलेल्यांना फासावर लटकविण्याची गरज नाही असे वक्तव्यही मुलायमसिंग यांनी केले.
14 एप्रिल 2014
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे विश्वंभरनाथ तिवारी यांची गोळ्या घालून हत्या केली गेली.जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचं सांगितलं जातयं.
05-05-2014
पेड न्यज प्रकरणी निणर्य घेण्याचा अधिकार निवडणूक आयाेगाला असल्याचा महत्वपूणर् निणर्य सुप्रिम कोटार्नं आज दिला.असा निणर्य घेण्याचा अधिकार आयोगाला नाही म्हणून अशोक चव्हाण यांनी सुप्रिम कोटार्त याचिका दाखल केली होती.उमेदवारांनी आपला निवडणूक काळातील हिशोब ३० दिवसांच्या आत दिला पाहिजे.अशोक चव्हाण यांनी तो दिला पण त्यात प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती दिली.असा आक्षेप घेत माधव किन्हाळकर यांनी आयोगाकडे तक्रार दिली होती.अायोगानं त्यासंबंधीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सुनावणी सुरू केली होती.मात्र त्याच वेळेस चव्हाण यांनी अगोदर हायकोटार्त धाव घेतली.तेथे याचिका फेटाळल्यावर ते सुप्रिम कोटार्त गेले.सुप्रिम कोटार्च्य निणर्यामुळं आता अशोक चव्हाण अडचणीत आलेत.त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.कायद्यानं त्यांना तीन वषेर् निवडणूकही लढविता येणार नाही.
07-05-2014
अलिबागला छायाचित्रकार अमित शिंगरूतची आत्महत्या
13 मे 2014
मध्यप्रदेशातील बैतूल जिल्हयातील जनमत बैतूलचे संपादक प्रदीप उर्फ मोनू रैकवार यांना कामावरून काढून टाकल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आणि शेवटी अन्नान्नदशा झाली.याच अवस्थेत त्याचं निधन झालंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं.पत्रकारांची अवस्था देशभर कठिण होत आहे.गुरूनाथ नाईक,गृहलक्ष्मीच्या माजी संपादिका राऊत यांच्या संदर्भातल्या बातम्या आलेल्या आहेत.सातारा येथील पत्रकार बापू आफळे यांचेही बेकारी आणि गरिबीने काही दिवसांपूर्वी निधन झाले.
पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा देशपातळीवर लागू करण्याच्या दृष्टीनं सरकार विचार करीत आहे.माध्यमांची स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचा निर्वाळा जावडेकर यांनी दिला आहे,
15 जुलै 2014
16 जुलै 2014
16 जुलै 2014
हरियाणा सरकारने पत्रकारांना पेन्शन विमा,टोल मुक्त प्रवासाची सोय आदि सुविधा लागू केल्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारनेही पत्रकारांसाठी कल्याणकारी याेजना राबवायला सुरूवात केलीय.त्यासाठी मिडिया समन्वय समिती गठित केली असून ही समिती पत्रकारांवरील हल्ले,निवास योजना,पेन्शन आणि पत्रकारांच्या अन्य प्रश्नांबाबत निणर्य घेणार आहे.या समितीत विविध विभागाच्या तीन सदस्यांसह प्रिन्ट मिडियातील तीन पत्रकार आणि इलेक्टा्रनिक मिडियाचे दोन पत्रकार या समितीत पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून काम करतील.
सातार- एक सुखद बातमी आहे.अजित पवार यांनी पत्रकारांवर होत असलेले हल्ले चुकीचे आहेत असे म्हटले आहे.अजितदादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर पत्रकार संरक्षण कायद्याबाबतचा आपण मुंबईस गेल्यावर तातडीने मुख्यमंत्र्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा घडवून आणू आणि धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला.एवढेच नव्हे दादा आज साताऱ्यात पत्रकारांवर एवढे मेहरबान होते की,त्यांनी साताऱ्यात सुसज्ज आणि भव्य पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण प्रय़त्न करू असेही आश्वासन दिले आहे.
अधिस्वीकृती समिती अस्तित्वात नाही त्याबाबत देखील माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही पवार यांनी स्पष्ट केले.हरियाणा तसेच अन्य राज्यातील पत्रकारांसाठी ज्या योजना तेथील सरकारानी राबविल्या आहेत त्या मागवून घेऊ आणि त्यावर चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले.एकूण काय आज साताऱ्यात पत्रकारांनी जे जे मागितले ते ते देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.अजित पवारांनी पत्रकारांच्या मागण्यांबद्दल पहिल्यांदाच एवढी सकारात्मक भूमिका दाखविली आहे.
22 जुलै 2014
हरियाणा,उत्तर प्रदेश सरकारच्या पाठोपाठ आता झारखंड सरकारनेही पत्रकारांसाठी काही घोषणा केल्या आहेत.मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज हजारीबागला भेट देऊन या महसुली विभागातील 950 पत्रकारांना विमा पत्रांचे वितारण केले.विभागातील सात जिल्हयातील प्रत्येकी दोन पत्रकारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमा पत्र दिले गेले.यानुसार पाच लाख रूपयांपर्यत पत्रकारांना विमा संरक्षण मिळणार आहे.या शिवाय प्रत्येक जिल्हयात पत्रकार वसाहतीसाठी पत्रकारांना भूखंड उपलब्ध करून देण्याची महत्वाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
22 जुलै 2014
New Delhi, 16 July: The National Crime Records Bureau (NCRB) has begun collecting and maintaining specific data relating to attacks on media since January this year, the government said today.
“National Crime Records Bureau (NCRB), an attached office of Ministry of Home Affairs, has started collection of data under ‘attack on media’ through Monthly Crime Statistics since January, 2014,” Information and Broadcasting Minister Prakash Javadekar said in a written reply in the Lok Sabha.
“Prior to this, the specific data regarding attacks on media was not centrally maintained,” he added.
Mr Javadekar said that the Press Council of India (PCI) has conveyed that it has set up a committee to examine the larger issue of safety of journalists in discharge of their duty with a view to gathering facts and evidences. He said the government has not received yet the report of the committee set up by PCI.
He also gave provisional details of such cases registered during 2014. According to the government, two such cases had been registered in Maharashtra till March 2014.
The government, he said, has a scheme ~ ‘Journalists Welfare Scheme’ ~ which provides for one-time ex-gratia relief on urgent basis to the family of a working journalist in the event of his death.
जुलै 2014
The Election Commission of India now says that the paid news is not an illegal activity. “First of all paid news is not an illegal activity. Secondly, laws related to paid news are very weak and mostly importantly, there is no law to deal with political parties in cases of paid news,” V.S. Sampath, chief elections commissioner said. (Deccan Chronicle)
जगभरातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यात चिंताजनक वाढ झालेली आहे.पत्रकारांना ठार मारणे,त्यांचे अपहरण करून त्यांना ओलिस ठेवणे,पत्रकारांवर हल्ले करणे अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्यानं जगभरातील पत्रकार दहशतीखाली आहेत.सोबतची आकडेवारी अंगावर शहारे आणणारी आणि विषयांचे गांभीर्य नजरेस आणून देणारी आहे.याविरोधात एकत्रित आवाज उठविण्याची गरज आहे.
जगभरात पत्रकारांवरील हल्ल्लयाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे.खालील आकडेवारी व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी आहे.
2014मध्ये जगभरात 46 पत्रकारांना ठार करण्यात आलं,
यातल्या बारा जणांच्या मृत्यूचं गुढ अजून उकललेले नाही
मिडियातील 8 सहाय्यकांचाही मृत्यू
आखाती देशात सर्वाधिक पत्रकारांचा मृत्यू
याशिवाय अनेक पत्रकार बेपत्ता
जगभरात आजपर्यत मारले गेलेले पत्रकार
—————————-
इराक-151
फिलिपिन्स 59
सोमालिया-42
रशिया -17
श्रीलंका -16
सिरिया- 67
पाकिस्तान-45
मेक्सिको -22
ब्राझील – 16
श्रीलंका -15
महाराष्ट (भारत) -19
————————————————
महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात 2 पत्रकारांचे खून झाले,दैनिकांच्या 5 कार्यालयांवर हल्ले केले गेले,39 पत्रकारांवर हल्ले झाले.आरोपी मोकाट सुटले आहेत कारण पत्रकारांना कायदेशीर संरक्षण नाही.म्हणूनच आम्ही पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मागतो आहोत.पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा असला पाहिजे आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या केसेस फास्ट टॅ्रक कोर्टामार्फत चालविल्या पाहिजेत.
त्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने तेरा वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.आमरण उपोषण केले,मोर्चे काढले,लॉंगमार्च काढले,निदर्शने केली,घेराव घातले,पण प्रत्येक वेळी खोटी आश्वासनं दिली गेली.सरकार काही करीत नाही म्हणून पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.दर पाच -सहा दिवसाला महाराष्ट्रात एक पत्रकार बदडला जात आहे
28 sep.2014
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिनांक 28 सप्टेंबर2014 रोजी न्यूयॉक मर्ध्ये धक्काबुक्की कऱण्यात आली.मोदी भक्तांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते.
माध्यमांबद्दल कोण काय बोलले ?
देवेंद्र फडणवीस ( भाजप प्रदेशाध्यक्ष )
————————–
सासवड येथील साहित्य संमेलनात एका परिसंवादात बोलतान कुमार केतकर यांनी नरेंद्र दाभोळकर यांची हत्तया ज्या पध्दतीनं झालीय ते बघता नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर महाराष्ट्रात फॅसिस्टवृत्तींचा उदय झालाय असं मत व्यक्त केल्यावर देवंद्र फडणवीस यांनी एखादया संपादकाला वेड लागल्यावर आम्ही त्याला इग्नोर करतो असे मत व्यक्त करीत त्यांची तुलना प्राण्यांशी केली ( 5 जानेवारी 2014)
उत्तम खोब्रागडे ( माजी आयएएस अधिकारी )
——————————–
दिल्लीत एका पत्रकार परिषदेत आदर्शबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता मराठी मिडिया जातीयवादी असल्याचा आरोप त्यांनी केला आणि मराठी माध्यमांना मराठीत बोलण्यासही नकार दिला ( 10 जानेवारी 2014)
सोमनाथ भारती( भूतपूर्व कायदा मंत्री)
—————————
मोदीने आपको कितने पैसे दिये असा थेट सवाल एका पत्रकारास केला.मिडिया विकावू असल्याचा त्यांचा आक्षेप होता( जानेवारी-2014)
शरद यादव
———-
एका महिला पत्रकारास उद्देशून आप बहोत सुंदर हो ( जानेवारी 14 )
सुशीलकुमार शिंंदे ( केंदीय गृहमंत्री )
—————————
सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना इलेक्टॉनिक मिडियाला ठेचून काढूची धणकी दिली.नंतर मी हे सोशल मिडियाबद्दल बोलल्याचं त्यांनी सागितलं ( 8 फेब्रुवारी 2014 )
चंद्रकांत खैरे ( शिवसेना खासदार औरंगाबाद)
——————————–
औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत खैरे यांनी निवडणुकानंतर पत्रकाराना बघून घेतो अशी धमकी दिली.केंडे या पत्रकाराचा त्यांनी नावासह उल्लेख केला.( फेब्रुवारी 2014)
अरविंद केजरीवाल ( आपचे नेते )
————————
नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्ता आल्यास मिडियाला जेलमध्ये टाकूची धमकी दिली( 12 मार्च 2014)
संजय सिंह आणि आशूतोष ( आपचे नेते )
—————————–
मिडिया बिकावू है ( दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत 13 मार्च 14)
आ.प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी आमदार माजलगाव)
———————————-
वर्तमानपत्र वाचू नका,डोकं गरगरायला होतं,प्रकाश सोळंके यांचा माजलगाव तालुक्यातील एका सभेत फतवा ( 23 मार्च 14 )
शरद पवार
आजवर पंडित नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी यासारख्या नेत्यांची संपूर्ण भाषणे मीडियाने कधी ‘लाईव्ह’ केल्याचे पाहण्यात नाही. पण एका राजकीय पक्षाचे भाषण संपूर्ण टीव्ही मीडिया पूर्ण वेळ ‘लाईव्ह’ करीत आहे. याचा अर्थ वेगळा आहे. यातून वृत्तवाहिन्यांतही थैलीशाहीची संस्कृती रुजत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.(2 April 14)
एच.एस.ब्रम्हा( निवडणूक आयुक्त )
————————
मुंबई पेड न्यूजची राजधानी आहे.( मुूंबईतील एका पत्रकार परिषदेत-28 मार्च14)
–आजम खांन
———————
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि सपा नेता आजम खांन यांनी आज पुन्हा तारे तोडले.ते आता माध्यमांवर घसरले.मिडियापासून देशाला मोठा धोका असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.मिडियाला मोदीने खरेदी केलेले असल्यानेच चॅनल उघडले की,जिकडे तिकडे मोदीच दिसतात.इलेक्टॉनिक मिडियाची कातिल अशा शब्दात संभावना करीत ते म्ङणाले,समजावादी सरकारला समुद्रात बुडविण्याची माध्यमाचा डाव आहे.(10 एप्रिल 2014)
नारायण राणे
——————
नारायण राणे यांनी कुडाळ येथील जाहीर सभेत बोलताना 17 तारखेपर्यत वृत्तपत्र वाचू नका असा सल्ला मतदारांना दिलाय.गेली सहा महिने वृत्तपत्रे आपल्या विरोधात बातम्या देत असल्याचा आरोपही त्यांंनी केलाय ( 15-04-2014)
राज ठाकरे
सीएनएन-आयबीएनचे संपादक राजदीप सरदेसाई यांना राज ठाकरेंनी आवाज वाढवू नका,मागं सरकून बसा,भौकना हो गया क्या असे अपशब्द वापरले दिनांक 19 एप्रिल रोजी ही मुलाखत प्रक्षेपित झाली.( 19-04-14 )
शरद पवार
अजित पवार यांनी मतदारांना पाणी तोडण्याची धमकी दिली . त्याबाबतची प्रतिक्रिया शरद पवार यांना विचारली असता ते पत्रकारावर भडकले, हे राजकीय षडंयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले.त्यावर पोलिसात तक्रार दाखल केली गेलीय असं विचारता तुम्हाला मराठीत समजत नाही काय असे त्यांनी पत्रकारांना पुण्यात दर्डावले ( 18-04-14 )
राज ठाकरेंनी तीन दिवसात चार पत्रकारंाना असभ्य वागणूक दिली.
यांचा काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न त्यांनी अर्णव गोस्वामी यांना केला,भौकना हो गया क्या असे वक्तव्य राजदीप सरदेसाई यांच्या बाबतीत केले,नीट बसा,आवाज वाढवू नका अशी दमाची भाषा देखील त्यांनी केली.टीव्ही-9 चे विलास आठवले यांनी टोल आंदोलनात काही मांडवली झाली काय असे विचारता तुम्हाला असा प्रश्न विचारायला लाज नाही का वाटत अशा भाषेत त्यांची निर्भत्सना केली( 20-04-14
मुरली मनोहर जोशी
भाजपचे नेते मुरली मनोहर जोशीही झी न्यूजच्या सुमित अवस्थी यांच्यावर भडकले.नरेद्र मोदींच्या संदर्भात अवस्थी यांनी प्रश्न विचारताच मुरली मनोहर भडकले या विषयावर प्रश्न विचारायचा नाही असे सांगत झालेले सारे रेकॉर्डिंग डिलीट कऱण्याचे आदेश सुमित अवस्थी यांना दिले.परंतू अवस्थी यांनी त्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पत्रकारास धमकावले आणि घराच्या बाहेर कसे पडता ते बघतो अशी सरळ धमकीच दिली.( 22 एप्रिल 2014)
छत्तीसगढच्या मंत्री रमशिला साहू
माध्यमकर्मी मानव नव्हेत ते दानव आहेत असे तारे तोडले आहेत छत्तीसगढच्या मंत्री रमशिला साहू आणि आरोग्य मंत्री अमर अग्रवाल यांनी.दुर्गमध्ये काविळीची जोरात साथ सुरू आहे.त्याची पाहणी कऱण्यासाठी मंत्री साहू आल्या होत्या.पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्या चिडल्या आणि पत्रकार मानव नसून दानव आहेत असे तारे त्यंानी तोडले.( 07-05-2014)
अमिताभला कॅन्सर झाल्याच्या वावड्या उठत आहेत.त्यासंबंधीचा प्रश्न एका महिला पत्रकाराने जया बच्चन यांना विचारला असता त्या संबंधित महिला पत्रकारावर भडकल्या आणि त्यांनी पत्रकार तरूणीची कॉलर पकडली.तुम्हाला कोठे,काय प्रश्न विचारायचे याबद्दल काही समजते की नाही असा सवाल विचारत तंबीही दिली ( 07-05-2014)
उदयनराजे भोसले
सातारा येथे निवडणुकीच्या निकालावर हा विजय आपला आहे की,पक्षाचा असा प्रश्न पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना विचारला असता कार्ट्यानो हा घाणेरडा पक्ष आपण मला विचारणार हे मला माहिती होते अशी टिप्पणी त्यांनी केली.( 16 मे 2014)
शरद यादव
शरद यादव पत्रकारांवर भडकले.पत्रकार बंधक असल्याचा आरोप त्यांनी केला.पत्रकारांना काही समजत नाही असेही ते म्हणाले ( १९ मे २०१४)
अखिलेष,मुलायमसिंह यादव
मुंबईतील महिला पत्रकारावर झालेल्या बलात्काऱ्यांना फाशी दिली गेली तेव्हा मुलायमसिंहनी त्यास विरोध करीत बच्चे है असं म्हणत त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला.तर युपीत एका महिला पत्रकारावर झालेल्या बलात्काराबाबत प्रश्न महिला पत्रकाराने विचारला तेव्हा मुख्यमंत्री अखिलेष यादव म्हणाले,आप पर तो रेप नही हुआ है ना.( जून 2014)
सुप्रिया सुळे ( नेत्या राष्ट्रवादी)
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आजची पत्रकारिता बिघडलेली आहे.पेडन्यूज दिल्याशिवाय बातम्या येत नाहीत,मी वर्तमानपत्र वाचतच नाही,कारण त्यातील बातम्या खऱ्या नसतात,अशी टीका केली.जेजुरी येथील नाझरे-पुरंदर जलसिंचन योजनेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.( 27 जून 2014
नरेंद्र मोदी
उरण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना चांगलाच चिमटा काढला.माध्यमं सकारात्मक बातम्या देत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय.पुर्वी कॉग्रेसवाले असे आरोप करायचे आता भाजप नेते तसा आरोप करू लागले आहेत.( 26 august 2014)
अखिलेश यादव
मागच्या आठवड्यात अमर उजालाच्या एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलतााना मुख्यमंत्र्यांनी मुलांना अभ्यास करण्याचा सल्ला देताना पत्रकारांची टर उडविली.ते म्हणाले,मुलांनो कॉपी करून तुम्हाला फार तर पत्रकार होता येईल पण आय़एएस,आयपीएस होता येणार नाही.त्यामुळं चांगला अभ्यास करा ( 24 august 2104)
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
‘राज्यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी गरज पडल्यास हिटलरपेक्षाही वाईट वागेन’ अशी धमकी काही दिवसांपूर्वी देणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आता मीडियाला धमकी दिली आहे. ‘मीडियावाल्यांनी नव्या तेलंगण राज्याच्या विरोधात काही अपमानास्पद प्रसिद्ध केल्यास त्यांना जमिनीत १० फूट खाली गाडून टाकेन,’ असे राव यांनी ठणकावले आहे. ( 09-09-14)
अण्णा हजारे
अलीकडच्या काळात पत्रकारितेतील सामाजिक, राष्ट्रीय दृष्टिकोन कमी होत असून, व्यापारी दृष्टिकोन वाढत असल्याचे दिसून येत आहे. हे धोरण संबंधित मालकाचे असते की, बातमीदार, संपादक वर्गाचे असते ते माहीत नाही. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सनसनाटी निर्माण करण्याची स्पर्धाच सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना कानपिचक्या दिल्या.(09-09-14)
———————————————————————————————————————————-
महिला पत्रकारांच्या हत्त्या,त्यांच्यावरील बलात्कार,विनयभंगाच्या घटना
22 ऑगस्ट 2013
मुंबईतील शक्तीमील परिसरात एका फोटो जर्नालिस्ट महिलेवर बलात्कार
( या प्रकरणात 4 मार्च 2014 रोजी तीन आरोपींना फाशीची शिक्षा झाली.
24 फेब्रुवारी
मुंबई येथील परळ भागातील हॉटेल आदितीमध्ये मिड-डेच्या चार महिला पत्रकार आणि त्यांच्याबरोबर एक पुरूष पत्रकार जेवण्यासाठी आले असता बसण्यावरून एका टोळक्याबरोबर वादावादी झाल्यानंतर या टोळक्यानं संबंधित मह्लिा पत्रकारांशी असभ्यवर्तवणूक केली.याची तक्रार पोलिसात दिली गेली.मात्र पोलिसांनी आरोपीना सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली.
16मार्च 2014
मुंबईतील जिया न्यूजच्या महिला पत्रकाराची होळीच्या दिवशी छेडछाड केली.तिच्याशी लगट कऱण्याचा प्रय़त्न झाला.तिच्या बरोबरच्या कॅमेरामनला मारहाण केली गेली.अंधेरी भागात ही घटना घडली.
8 मार्च
कर्नाटकचे मंत्री डी.के.शिवकुमार यांचे स्टींग ऑपरेशन करायला गेलेल्या टीव्ही-9 आणि न्यूज 9 च्या एका महिला पत्रकाराच्या शर्टला पकडून आपल्या सहकाऱ्याला तिची बटनं काढायला लावून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला.तिच्याबरोबरचा श्रेयेस नावाच्या अन्य एका पत्रकारास लाथाबुक्कयांनी मारहाण केली गेली.
12 मार्च
पंजाबचे मुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या सभेेचे कव्हरेज करणयासाठी गेलेल्या महिला पत्रकार प्रोमिला क ौशल यांच्याबरोबर पोलिसांनी दुर्वव्यबहार केल्याची आमि त्यांना महिलापोलिसांकरवी धक्काबुक्की केल्याची तक्रार कौशल यांनी पोलिस महासंचालकांकडे केली
26 मार्च 20134
उत्तराखंडमधील एक महिला पत्रकार युपीतील मिर्झापूर येथे रिपोर्टिंगसाठी गेली असताना काही तरूणांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवून जंगलात नेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केले
28 मार्च 2014
छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थीनीवर तिच्याबरोबर शिकणाऱ्या एका तरूणाने बलात्कार केल्याचा आरोप संबंधित तरूणीने केला आहे.
3 एप्रिल 2014
मध्यप्रदेशात इंदोरमधील संयोगितगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका क्रर्दीय विद्यालयात महिला पत्रकार श्रुती माहवाह यांना तासभर शाळेत डांबून ठेवण्यात आले नंतर पोलिसांनी येऊन त्यांची सुटका केली.
3 एप्रिल 2014
असोसिएट प्रेसच्या छायाचित्रकार आणि पत्रकार अंजा नाईद्रिगॉस आणि कॅथी गॅनन याच्यावर अफगाणीस्थानच्या तानी जिल्हयातील खोश्ट शहरात एका पोलिस कमांडरने गोळ्या झाडल्या.त्यात अंजा जागीच ठार झाल्या.गॅनन जखमी झाल्या आहेत.
6 एप्रिल 2014
फिलिपाईन्समधील के्रव्हिएट प्रांतातल्या बॅकोर शहरातील महिला पत्रकार रूबिलिटा गार्सिया यांची रविवार दिनंाक 6 एप्रिल 14 रोजी त्यांच्या घरात गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली.त्यांचे नंतर रूग्णालयात निधन झाले.विद्यमान सरकारच्या काळात पत्रकाराच्या हत्तयेची ही विसावी घटना आहे तर 1986नंतरची ही 160 वी घटना आहे.
21-04-14
रूसच्या लोअर हाऊसचे डेप्युटी स्पिकर ब्लादिमीर जिरिनोवोस्की यांनी एका पत्रकार परिषदेतच मर्भवती महिला पत्रकार स्टेला दुबोवित्सकाया हिने युक्रेनबाबतचा प्रश्न विचारल्यामुळे तिच्यावर रेप कऱण्याचा आदेश पुढारी महाशयांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला.
20 एप्रिल 2014
छत्तीसगढमधील रायपूरनजिक असलेल्या अकलतरा येथील एका महिला पत्रकारावर तेथील आमदाराच्या पुतण्यानं बलात्कार केला.या प्रकरणी करनसिंह सिसोदिया याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अठकही करण्यात आली आहे.
( 22 एप्रिल 2014)
युक्रेनच्या स्लेवियास्क शहरात रूस समर्थक अतिरेकी संघटनांनी इरमा क्रांत या महिला पत्रकाराचे अपहरण केलंय.गेल्या बुधवारीच सर्ही लेटर या बावीस वर्षीय पत्रकाराचेही अपहरण करण्यात आलं होतं.या अतिरेक्यांनी आणखीही काही पत्रकारांचे अपहरण केलं असल्याची शक्यता आहे.रूसी इंटरनेट चॅनल लाईफ न्यूजवर या अपहरणाचे व्हिडीयो टाकली गेली आहे.
( 6 जून 2014 )
मुंबईतील एका मराठी वृत्तपत्रात काम करणाऱ्या एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे की,आपल्याशी लग्न कऱण्याचा वायदा करीत एका पत्रकार संघटनेच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका तरूणाने बलात्कार केला.गेल्या वर्षी सदर पत्रकार तरूणीशी संबंध ठेऊन लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला.या संदर्भात पार्कसाईट पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे.आरोपी फरार असून तो अटकपूर्व जामिन घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
13 जून 2014 )
युपीच्या बलरामपूर येथील एका महिला पत्रकाराशी डीस्ट्रीक मॅजिस्ट्रेट मुकेश चन्द यांनी असभ्यपणे वागल्याची तक्रार पिडित तरूण महिला पत्रकाराने केली आहे.महिला पत्रकाराने मुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडे पत्राव्दारे ही लेखी तक्रार केली आहे.महिला पत्रकाराने तक्रारीत म्हटले आहे की,समाज कल्याण विभागात झालेल्या पेन्शन घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी आपण डीएमच्या कार्यालयात 13 जून रोजी गेलो होतो.त्यावेळी त्यांनी असभ्य वागणूक तर दिली पण लाज वाटेल अशा शब्दाचाही वापर केल्याचे संबंधित महिल ापत्रकाराचे म्ङणणे आहे.
22 जून 2014
इंडिया टीव्हीच्या महिला पत्रकार तनू शर्मा यांनी आज आत्महत्या कऱण्याचा प्रयत्न केला .ऑफिसमधील त्रासातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सुसाईट नोटमधून ध्वनित होते.
8 जुलै 2014
दिल्लीत वृध्द महिला पत्रकाराची हत्त्या
राजधानी दिल्लीतीन अनक इंग्रजी दैनिकामधून काम केलेल्या 80 वर्षीय महिला पत्रकार रेखा दुग्गल यांची अत्यंत निर्दयपणे हत्त्या केल्याचे समोर आले आहे.दिल्लीच्या ग्रेटर कैलास पार्ट-2 भागात काल रात्री हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.रेखा दुग्गल आपला नोकर निरज यांच्याबरोबर एकट्याच राहात होत्या.त्यानेच दुग्गल यांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
8 जुलै 2014
सरकारच्या विरोधा अपप्रचार केल्याच्या आरोपावरून इरानच्या मिहिला पत्रकार मर्जिए रसोली यांना पन्नास कोरडे मारण्याबरोबरच दोन वर्षाची कैदेची शिक्षा ठोठावण्यात आलीय.मज्रिएने 2012मध्ये एक सभा घेऊन या सभेत सरकार विरोधी भाषण केले होते.त्यावरून त्याना अटक केली गेली होती.
09 sept2014
टी व्ही -9 आणि एबीएन या वाहिन्या राज्याच्या विरोधात असल्याचे कारण देत या वाहिन्याचे प्रक्षेपण बंद करून त्यावरं बंदी घालणाऱ्या तेलगणा सरकारने ही बंदी उठवावी यामागणीसाठी आज सकाळी हैदराबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शांततेच्या मार्गाने निदर्शनं कऱणाऱ्या टीव्ही-9च्या पत्रकारांना राज्य सरकारच्या पोलिसांच्या अरेरावीला सामोरं जावं लागलं.पोलिसांनी टीव्ही-9ची वाहनं फोडली,महिला पत्रकारांना धक्काबुक्की केली,आणि थेट प्रक्षेपणही बंद पाडले.
25sept 2014
मुंबईतील एका 29 वर्षीय महिला पत्रकारास रेप करण्याची,तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकण्याची धमकी दिली गेल्याने खळबळ उडाली आहे.प्रकरण व्यक्तिगत स्वरूपाचे दिसत असले तरी मुबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुंबई से एक महिला पत्रकार से रेप और एसिड अटैक की धमकी मिलने की खबर है। दरअसल 29 वर्षीय एक महिला पत्रकार ने आरोप लगाया कि उसके साथ न सिर्फ छेड़खानी की गई, बल्कि उसे जान से मारने और उस पर ऐसिड अकैट कराने की धमकी भी दी गई है। आरोपियों ने महिला के साथ रेप करने और अपने दोस्तों से भी रेप करवाने की धमकी दी है।
29 सप्टेंबर 2014
मुंहतील एका चॅनलच्या महिला पत्रकाराची दोघा तरूणांनी छेड काढली.या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांना अटक केली पण नंतर त्या दोन तरूणांच्या घरच्या महिलांनी तेथे आलेलय पुरूष पत्रकारांवर तक्रार दाखल केली त्यानंतर पाच-सहा पत्रकारांना पोलिसांनी डांबून ठेवले.
7 nov 2014
पनवेल येथील कर्नाळा टीव्हीच्या महिला पत्रकार चेतना वावेकर यांयावर आज सकाळी पनवेल येथे काही गुंडांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात वावेकर यांना गंभीर दुखापत झाली असून एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या संबंधिची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतल्याचे समजते.हल्लयाचे कारण समजू शकले नाही.हल्लेखोर पनवेलनजिकच्या आकुर्ली गावचे आहेत.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच रायगड प्रेस क्लबने या हल्ल्याचा तीव्र शब्दा त धिक्कार केला आहे.
(पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या लेखी संमतीशिवाय या माहितीचे क ॉपीराईट कायद्यानुसार कोणालाही पुनर्प्रकाशन करता येणार नाही.)
————————————————————————
————————————————————————————————————————————————————————————————————
— पत्रकारितेतील अन्य महत्वाच्या घटना-घडामोडी
3 जानेवारी मजिठिया आयोगाच्या शिफारशीना विरोध कऱणारी मालकांची याचिका सर्वोच्च उच्च न्यायालयाने फेटाळून लावत मजिठिया आयोगाच्या शिफाऱशींची अमंलबजावणी कऱण्याचा आदेश दिला.
5 जानेवारी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या एका शिष्टमंडळाने राळेगण येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली.पत्रकारांच्या लढ्यास आणि 17 फेब्रुवारीच्या डीआयओ कार्यालयास घेराव आंदोलनास अण्णांनी पाठिंबा जाहीर केला.
5 जानेवारी – सासवड येथील साहित्य संमेलनात कुमार केतकर यांनी मोदीच्या उदयानंतर फॅसिस्टवृत्ती वाढल्या आणि नरेद्र दाभोळकर यांची हत्तया अशाच वृत्तींनी केली असे मत व्यक्त केले.त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेद्र फडणवीस यांनी एळाद्या संपादकास वेड लागल्यानंतर त्याला आम्ही इ ग्नोर करतो असे मत व्यक्त करीत केतकरांची तुलना प्राण्यांबरोबर केली.त्याचा सर्वत्र निषेध केला गेला. यचवर 6 जानेवारी रोजी आबीएन -लोकमतवर च र्चा
7 जानेवारी ( आत्महत्त्या ) – जय महाराष्ट्रमधून काढून टाकल्याने नैराश्येच्या गर्देत सापडलेल्या कॅमेरामन विकास चव्हाण यांचा ह्रद्यविकाराने मृत्यू झाला.ते अवघे 32 वर्षांचे होते.पत्नी आणि कुटुंबिय उघडयाव
8 jan. निधन – – भंडारा लोकमत कार्यालयातील ऍापरेटर अंकुश विनायकराव वानखेडे यांचे अपघाती निधन ते 26 वषार्ंचे होेते.
10 जानेवारी निवृत्त प्रशासकीय अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी मराठी माध्यमाना जातीयवादी ठरविले.दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत त्यांना आदर्श बद्दल विचारताच ते चिडले आणि मराठी मिडिया जातीयवादी असल्याचा आरोप केला.तसेच त्यांनी मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींशी मराठीत बोलायलाही नकार दिला.
30 जानेवारी वाभिमान संघठनेचे निलेश राणे यांचा गुंडांची दुसरी पिढी असा उल्लेख केल्याबद्दल निलेश राणे यांनी आय़बीएन-लोकमतचे निखिल वागळे यांच्यावर50 कोटी रूपयांचा अबु्रनुकासानीचा दावा दाखल केला आहे.
31 जानेवारी द्वारकापिढाचे शंकराचार्य सरस्वती यांनी जबलपूर येथील एका पत्रकाराच्या श्रीमुखात भडकाविली.नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील काय असा प्रश्न त्यानं विचारला होता.
03 – फेब्रुवारी – अ औरंगाबाद येथील पत्रकार बासिद मोहसिन यांचे ह्रदयविकाराने निधन ते 59 वर्षांचे होते.
5 फे ब्रुवारी ——– – पाकिस्तान आणि इंडियाचे कलाकार असलेल्या एका बॅन्ड पथकाचा कार्यक्रम काळा घोडा महोत्सवात होणार होता.त्यासंबंधीची पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लबमध्ये सुरू असताना शिवसेनेच्या कार्यकत्यार्ंनी तेथे गोंधळ घालून पत्रकार परिषद बंद पाडली.या घटनेचा प्रेस क्लबवर हल्ला म्हणत प्रेस क्लबने निषेध केला आहे.
04-04-2014- बलात्काऱ्यांना फाशीच…मुंबईतील शक्तीमील परिसरात 22 ऑगस्ट 2013 रोजी एका महिला फोटो जर्नालिस्टवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात तीनही आरोपींना आज जिल्हा न्यायालयानं फाशीची शिक्षा ठाठावली आहे.कासिम बंगाली,महंमद सलिम आणि विजय जाधव या तीनही सराईत आरोपींनी फोटो जर्नालिस्टवर बलात्कार कऱण्यापुर्वी एका ऑपरेटरवरही बलात्कार केला होता.त्या प्रखरणातही आरोपींना जन्मठेप झालेली आहे. नव्याने समाविष्ट कऱण्यात आलेल्या 376ई कलमान्तर्गतत ही शिक्षा ठाठावली गेली आहे.शिक्षाची सुनावणी सुरू असताना आरोपी हसत होते .
09 एप्रिल 2014 मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू कऱण्यास स्थगिती मिळावी यासाठी माध्यमांच्या मालकांनी सुप्रिम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका मुख्यन्यायाधीशांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.मालकांना हा मोठा दणका समजला जात असून आता सर्व मार्ग बंद झाले आहेत
10 एप्रिल 2014 लडके है गलती होती है,असे अकलेचे तारे तोडून मुबईच्या शक्तीमिल बलात्काराच्या प्रकरणातील दोषींची समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी पाठराखण केलीय.बलात्काराच्या खटल्यात दोषी असलेल्यांना फासावर लटकविण्याची गरज नाही असे वक्तव्यही मुलायमसिंग यांनी केले.
14 एप्रिल 2014 उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे विश्वंभरनाथ तिवारी यांची गोळ्या घालून हत्या केली गेली.जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचं सांगितलं जातयं.
05-05-2013 पेड न्यज प्रकरणी निणर्य घेण्याचा अधिकार निवडणूक आयाेगाला असल्याचा महत्वपूणर् निणर्य सुप्रिम कोटार्नं आज दिला.असा निणर्य घेण्याचा अधिकार आयोगाला नाही म्हणून अशोक चव्हाण यांनी सुप्रिम कोटार्त याचिका दाखल केली होती.उमेदवारांनी आपला निवडणूक काळातील हिशोब ३० दिवसांच्या आत दिला पाहिजे.अशोक चव्हाण यांनी तो दिला पण त्यात प्रतिज्ञापत्रावर खोटी माहिती दिली.असा आक्षेप घेत माधव किन्हाळकर यांनी आयोगाकडे तक्रार दिली होती.अायोगानं त्यासंबंधीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सुनावणी सुरू केली होती.मात्र त्याच वेळेस चव्हाण यांनी अगोदर हायकोटार्त धाव घेतली.तेथे याचिका फेटाळल्यावर ते सुप्रिम कोटार्त गेले.सुप्रिम कोटार्च्य निणर्यामुळं आता अशोक चव्हाण अडचणीत आलेत.त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते.कायद्यानं त्यांना तीन वषेर् निवडणूकही लढविता येणार नाही.
07-05-2014 अलिबागला छायाचित्रकार अमित शिंगरूतची आत्महत्या
13 मे 2014 मध्यप्रदेशातील बैतूल जिल्हयातील जनमत बैतूलचे संपादक प्रदीप उर्फ मोनू रैकवार यांना कामावरून काढून टाकल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आणि शेवटी अन्नान्नदशा झाली.याच अवस्थेत त्याचं निधन झालंंं.पत्रकारांची अवस्था देशभर कठिण होत आहे.गुरूनाथ नाईक,गृहलक्ष्मीच्या माजी संपादिका राऊत यांच्या संदर्भातल्या बातम्या आलेल्या आहेत.सातारा येथील पत्रकार बापू आफळे यांचेही बेकारी आणि गरिबीने काही दिवसांपूर्वी निधन झाले.
विघानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची बैठक विधान भवनात बोलाविली.बैठकीस आर,आर,पाटील उपस्थित होते,यावेळी बोलताना आर,आर.पाटील यांनी येणाऱ्या कॅबिनेटसमोर पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनचा विषय मांडून त्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
15 जून 2014
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने आज केंर्दीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांची पुण्यात भेट घेऊन केंद्राने पत्रकार संरक्षण कायदा त्वरित लागू करावा त्याच बरोबर पत्रकार पेन्शन योजनाही सुरू करावी अशी मागणी केली.त्यावर जावडेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
28 sept 2014
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिनांक 28 सप्टेंबर2014 रोजी न्यूयॉक मर्ध्ये धक्काबुक्की कऱण्यात आली.मोदी भक्तांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येते.
(कॉपी राईट- )
—————————————————————————————————————————————————————————————————————- 2013मधील पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना
पत्रकारांवरील हल्ल्याच्या 2012मधील प्रमुख घटनाः
राज्यात या वर्षात एकूण 59 पत्रकारांवर हल्ले झाले. त्यातील प्रमुख 43 घटनेत ज्या 51 पत्रकारांवर हल्ले झाले त्याची माहिती येथे दिली आहे.ज्या घटनांची नोंद पोलिसात झालेली नाही अशा काही —————————————————————————————————————————————————————————————– –आशिष धरत-उरण 1) दिनाक 1 जानेवारी- रायगड जिल्ह्यातील उरण येथील स्टार माझा चे पत्रकार आशिष धरत हे ओएनजीसी मध्ये लागलेल्या आगीचे चित्रिकरण करीत असताना तेथील सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीरपीएफच्या जवानांनी त्यांना धक्काबुक्की केली.अर्वाच्च शिविगाळ केली.कानशिलावर पिस्तूल ठेऊन जिवे मारण्याची धमकी दिली.पत्रकारांनी उरण पोलिसात तक्रार दिली.कारवाई काहीच झाली नाही. लोकमत ,जळगाव 2)दिनांक 17 जानेवारी ः जळगाव येथील लोकमतच्या कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला.एका घटस्फोटीत महिलेला तिच्या आईऩेच वेश्या व्यवसायाला लावले.अशा आशयाचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते.त्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे सांगितले गेले.पोलिसांत तक्रार दिली.कारवाई शून्य. महाराष्ट्र टाइम्स ,मुंबई 3) दिनांक 27 जानेवारीः मकाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई येथील कार्यालयावर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.आनंदराव अडसूळ राष्ट्रवादीत जाणार अशी बातमी प्रश्नार्थक चिन्ह टाकून मटाने छापली होती.बातमी तथ्यहिन असल्याचे कारण सांगत हा हल्ला झाल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे होते.हल्लेखोरांना अटक झाली पण मुख्य चिथावणीखोरांपर्यत पोलिस पोहचू शकली नाही. – प्रवीण गोरेगावकर, गोरेगाव -रायगड 4) दिनांक 25जानेवारीःरायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील पत्रकार प्रवीण गोरेगावकर यांना बेदम मारहाण केली गेली.त्यांनी एक व्यगात्मक लेख कोकणातील एका दैनिकात लिहिला होता.तो आपल्यालाच उद्ेशून लिहिल्याच्या समजातून त्यांच्यावर हल्ला झाला.गोरेगावकर हे अपंग आहेत.हल्लेखोर त्यांना मारहाण करीत असताना लंगड्या तुला बघून घेऊ अशा धमक्या देत होते.पोलिसात तक्रार.कारवाई नाही. – दोन पत्रकार, पुणे 5) दिनांक 30 जानेवारी ःपुण्यातील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी संभाजी पुलावर वाहतूक नियम मोडीत पोलिसांवर हल्ला केला.त्याचे चित्रांकण करणाऱ्या पत्रकाराांवरही लष्करातील हे भावी इंजिनिअर तुटून पडले.पोलिसात तक्रार दाखल पण कारवाई नाही विशालसिंग करकोटक,औरंगाबाद 6) दिनांक 11 फेबु्रवारी ः औरंगाबाद येथील इंडिया टीव्हीचे पत्रकार विशालसिंग करकोटक यांना पैठण येथील रेती माफियांनी जिवे मारण्याची धमकी दिली. वाहिनीवर बातमी दाखविल्याच्या रागातून ही धमकी दिली.आौरंगाबादच्या पत्रकारांनी दबाव आणल्यानंतर गुन्हा दाखल. हर्षद कशाळकर,िअ़लबाग 7) दिनांक 15फेब्रुवारीः जिल्हा परिषदेच्या मतदानाच्या वेळेस आमदार जयंत पाटील पोलिसांच्या अंगावर झावून गेले.त्याचे चित्रिकऱण करणाऱ्या इटीव्हीचे हर्षद कशाळकर आणि आयबीएन-लोकमतचे मोहन जाधव यांना जयंत पाटलांची दमदाटी.पाहून घेतोची धमकी.पोलिसात तक्रार नाही करण नवले,श्रीरामपूर 8) दिनाक 17 फेब्रुवारीः नक्षर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील गावकरीचे उपसंपादक करण नवले यांना पोलिसांनी जिल्हा परिषद निवडणूक मतदानाच्या वेळेस लाथा-बुक्यांनी मारहाण केली.या घटनेच्या विरोधात पत्रकारांनी आंदोलन केल्यानंतर दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.तिधे निलंबित केले.पोलिसांवर गुन्हेही दाखल केले गेले. सुरेश पाटील ,उदगीर 9) दिनांक 21 फेब्रुवारीः इा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ज्येष्ट पत्रकार सुरेश पाटील यांच्या डोळ्यात तिखटाची पूड टाकून त्यांचे अपहरण केले गेले.त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करू न त्यांना गावाबाहेर सोडले गेले.आरोपींमध्ये एक महिला होती.सुरेश पाटील जखमी अवस्थेत पोलिसात जाण्यापूर्वीच संबंधित महिला पोलिस ठाण्यात गेली.तिच्या तक्रारी वरून सुरेश पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.सुरेश पाटील यांची तक्रार दाखल करून घ्यायलाही पोलिसांचा नकार – अनिल कसबे ,नांदेड 10)दिनांक 24 फेब्रुवारी ः नांदेड येथील देशोन्नतीचे पत्रकार अनिल कसबे यांना शिवसेनेच्या खासदारांनी जिवे मारण्याची मोबाईलवरून धमकी.देशोन्नतीचे कार्यालय जाळण्याचीही धमकी.पोलिसांचा पत्रकारांशी असहकार.गृह मंत्र्यांनी बोलल्लयानंतर तक्रार दाखल पण नंतर प्रकरण दडपण आणून मिटविले गेले. – तीन पत्रकार,कर्जत (जिल्हा नगर) 11)दिनांक 26 फेब्रुवारीःनगर जिल्ह्यातील कर्जत येथील तीन पत्रकारांना वाळु माफियाकडून बेदम मारहाण. – पनवेल 12)दिनांक 27 फेब्रुवारी ःपनवेलनगरपालिकेच्या सभेतून स्थानिक पत्रकारांना अपमानास्पदरित्या बाहेर काढले गेलेेेे.पालिकेच्या सभेला पत्रकारांना बोलावण्याची पंरपरा असताना अशी घटना पालिकेच्या इतिहासात प्रथमच घडली.पनवेल पालिेकेत कॉग्रेसची सत्ता आहे. – राजेश टोळये,सोलापूर 13) दिनांक 28 फेब्रुवारीःसोलापूर येथील दैनिक सुराज्यच्या अंकात बळी तो कान पिळी या मथळ्याखाली एक लेख प्रसिध्द झाला होता.या लेखामुळं पोलिसांची बदनामी झाल्याचे कारण सांगत पोलिसांना संपादक राजेश टोळये यांच्यावर गुन्हा दाखल केला.कार्यालयात घुसून त्यांना अटक केली.रात्रभर त्यांना पोलिस कोठडीत डांबून ठेवण्यात आले.दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले गेले.तेथे त्यांना आठ दिवसाची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.पोलिसाच्या दाव्य़ात त़थ्य नसल्याने न्यायालयाने त्यांची मागणी धुडकावून लावत टोळे यांना जामिन मंजूर केला.टोळे यांना पोलिस कोठडीत ठेऊन अद्दल घडविण्याच ी पोलिसांची योजना होती. शैलेश पालकर , पोलादपूर 14) दिनांक 1मार्चः आयगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पत्रकार शैलेश पालकर यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्ला.गंभीर दुखापत झाली.पालकर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता तेच आरोपी आहेत अशा पध्दतीने त्यांनाच पोलिस ठाण्यात दिवसभर बसवून ठेवले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला पण त्याला अटक झाली नाही. – तिरूपती चितियाला,गडचिरोली 15) दिनांक 6 मार्चः गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यात टेकाळा ताला या परिक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर कॉपी सुरू होती.सिरोंजा येथील सकाळचे पत्रकार तिरूपती चितियाला हे फोटो काढण्यास गेले असता एका पोलिस उपनिरिक्षकाने त्यांच्यावर हल्ला केला.त्याच्याविरोधात कोणतीच कारवाई नाही.आर.आर.पाटील हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. — ठाणे 16)दिनांक 7मार्च ः ठाणे मनपात महपोर -उपमहापोर यांच्या निवडणुकीच्या वेळेस आयुक्त आर .ए.राजू यांनी पत्रकारांना प्रवेश नाकारला.पत्रकारांशी हुज्जत घातली.त्याच्य् ा निशेधार्थ पत्रकारांची आंदोलन केलं.पत्रकारांच्या अवमान प्रकरणाचा युतीने निषेध केला. – सातारा 17) दिनांक 11 मार्चः पतंगराव कदम यांच्या पत्रकार परिषदेत लोकमतचे पत्रकार मोहन म्हसकर आणि स्टार माझाचे राहूल तपासे या पत्रकारांनी पतंगराव अडचणीत येतील असे काही प्रश्न विचारले.त्यावरून पतंगराव भडकले आणि तू कोणत्या पेपरचा आहेस,तुझ्या मालकाला बोलतो,तुझा हिशोब करतो,तुझी नोकरी घालवितो असा दम देत पत्रकारांचा अवमान केला.पत्रकारंाशी एका मंत्र्याने केलेल्या या वर्तनाचा पत्रकारांनी निषेध केला.कदमांवर कायदेशीर कारवाई होण्याचा प्रश्नच नव्हता. – राजकुमार भगतचिरणेर, उरण 18) दिनांक 12 मार्चः उरण येथील सकाळचे बातमीदार राजकुमार भगत यांना ऱाऊत नावाच्या इस्टेट एजंटने मारहाण केली.त्या विरोधात पोलिसांत तक्रार.उरण पोलिसात गुन्हा दाखल. — सतीश मोहिते ,नांदेड 19) दिनाकं 19ः नांदड येथील सिडको भागातले डॉ.सूर्यकांत पठ्ठेवाड यांच्या चुकीच्या उपचारामुळे एका छोट्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी पत्रकार सतीश मोहिते यांनी स्थानिक चॅनेलवरून दिल्याने पठ्ठेवाड य़ांनी पोलिसात तक्रार.पोलिसांनी मोहिते यांच्यावर विविध गुन्हे दाखल करून त्यंाना त्रास दिला. – बळवंत ढगे ,वर्धा 20) दिनांक 23 मार्च ः क वर्धा येथील पत्रकार बळवंत ढगे यांनी तेथील शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही माहिती मागितली असता संस्था चालक राजेंद्र शर्मा यांनी ढगे यांना मारहाण केली.या संबंधात ढगे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. – राकेश कुटे, पुणे 21) दिनांक 31 मार्च ः णे पुण़े येथील केळकर रस्त्यावर दोन तरूण अन्य एका तरूणाला मारहाण करीत असल्याचे पाहिल्यानंतर सकाळचे छायाचित्रकार राकेश कुंटे यांनी पह्ल्यिानंतर त्यानी मारहाणीची दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपायला सुरूवात केली.ते पाहून संतापलेलया अजय खेडकर आणि कबीर मारवाडी यांनी कुंटे यांना मारहाण केली.त्यांच्या कॅमेऱ्याची मोडतोड केली.आणि ते पसार झाले.गुन्हा दाखल. — आनंद शर्मा,मंबई 22)दिनाक 12 एप्रिल ः म मुंबई येथील दादर भागात एक अनाधिकृत होॅटेल चालविले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नवभारतचे पत्रकार आनंद मिश्रा याच्यावर हॉटेल मालकाकडून निघृण हल्ला झाला.त्यात मिश्र गंभीर जखमी झाले.दुसऱ्या दिवशी ़आऱ.आर.पाटील यांनी दादर भागाला भेट देऊन अनाधिकृत बांधकामे हटविली. – दीपक बारकुल,येरमाळा-उस्मानाबाद 23) दिनांक 23 एप्रिल ः उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील लोकमतचे पत्रकार दीपक बारकुल यांना एका हॉटेल व्यावसायिकाक डून मारहाण.आरोपीचे नाव अनिल माधवराव बारकुल असे आहे.पत्रकाराने हॉटेलचे फोटो काढल्याच्या रागातून ही घटना घडली.आरोपीवर कारवाई नाही. – शिवपूर -खेड 24) दिनांक 30 एप्रिलः़खेड येथील एका टोलनाक्याची मोडतोड आमदार संजय पाटील यांचे समर्थख करीत होते.त्याचे छायांकन करणाऱ्या आयबीएन लोकमत वाहिनीच्या पत्रकारास मारहाण.आरोपीवर कोणतीच कारवाई नाही. — चाणक्य,बीड 25) दिनांक 2 मे ः ब बीड येथील चाणक्य दैनिकाचे संपादकांवर धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.एका वेबसाईटवर हिंदु देव-देवतांची बदनामी होईल अशी छायाचित्रं होती.ती वेबसाईट बंद करावी अशी मागणी एका नागरिकाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली होती.त्यासंबंधिची बातमी चाणक्यने छापल्याने वेबसाईटवर कोणताही गुन्हा न दाखल करता पोलिसांनी चा़णक्यच्या ंसपादाकांवरच गुन्हा दाखल केला. – चेतम भैराम, भंडारा 26) दिनांक 3 मेः भंडारा येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार चेतन भैराम यांना शिक्षण सम्राटाकडून जिवे मारण्याच्या धमक्या.शिक्षण संस्थेतील गैरकारभाराच्या विरोधात भैराम यांनी लेख माला लिहिली होती.त्यामुळे संतापलेल्या शिक्षण सम्रटाने हा प्रकार केला. – राजू भगत ,उरण जिल्हा रायगड 27) दिनांक 20 मेः उऱण तालुक्यातील चिरणेर येथील पत्रकार राजू भगत यांच्यावर शेकापच्या गुडंाचा प्राणघातक हल्ला.शेकापच्या विरोधात बातम्या दिल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला.पोलिसांत तक्रार. – अच्छाड 28) दिनांक 22 मे ः गुजरातच्या सीमेवर असलेल्या अच्छाड येथील सीमा तपासणी नाक्यावर भ्रष्टाचाराचे बिंग फोडण्यासाठी गेलेल्या सकाळच्या प्रतिनिधीला एस.सी.शुक्ला या आरटीओ इन्स्पेक्टरने गाडीत डांबून ठेवले.धक्काबुक्की केली.जीवे मारण्याची धमकीही दिली. – प्रवीण गायकवाड.जऴगाव 29)दिनांक 27 मेः जळगाव येथे कोळी समाजाच्या आंदोलनाचे चित्रिकरण कऱणाऱ्या भास्करचे प्रतिनिधी प्रवीण गायकवाड आणि दिव्य मराठीचे आबा मकासरे यांना मारहाण.कॅमेऱा तोडण्याचे प्रयत्न.तक्रार दाखल – अनिल महाजन,पाचोरा 30) दिनांक 11 जूनः छाचोरा येथील पत्रकार अनिल बाबूलाल महाजन यांनी वाळू ठेकेदाराच्या विरोधात बातम्या दिल्याने संबंधित ठेकेदाराचा वाळू ठेका रद्द झाला.त्यामुळे संतापलल्या रेती माफियाचा महाजन यांच्यावर हल्ला .महाजन गंभीर जखमी. – अस्लम पोपटे वाशिम 31) दिनांक 15 जून ः ऊा वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील लोकमत समाचारचे पत्रकार अस्लम पोपटे यांच्यावर पोलिस कॉन्स्टेबल तायडे यांनी हल्ला केला.पोपटच्या कानाला चावा घेतला.उलट पोपटवर गुन्हा दाखल केला.रस्त्यात गाडी उभी केल्याच्या कारणावरू न ही मारहाण झाली. – धनंजय पार्टे,माणगाव जिल्हा रायग़ड 32) दिनांक 25 जून ः रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील लोकमतचे पत्रकार धनंजय पार्टे यांच्यावर खुनी हल्ला.शेकापचे पाच-पन्नास कार्यकर्तेपार्टे याच्या कार्यालयात घुसले त्यांना मारहाण केली.या जमावात काही महिला होत्या.महिलांनी पार्टे यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली.अंजली पवार यांनी ही तक्रार दिली.जिल्हा पऱिषदेचे सदस्य ज्ञानदेव पवार यांच्या विरोधात पार्टे यांनी तक्रार दाखल केली.गुन्हा दाखल झाला पण पवार यांना अटक नाही.बामणोली येथील शाळेचे बांधकाम केवळ 25 टकक्के पूर्ण झालेले असताना ते शंभर टक्के झाल्याचे दाखवून त्याचे बिल उालले गेले.याची माहिती पार्टे यांनी माहितीच्या अधिकारात काढून त्याची बातमी छापली होती.त्या रागातून हा हल्ला झाला.पार्टे यांच्यावर अलिबागच्या रूग्णालयात उपचार कऱण्यात आले. – जीवन केणी,उरण 33) दिनांक 1जुलैः उरण येथील पत्रकार जीवऩ केणी यांच्यावर शेकापच्या गुंडाकडून हल्ला.बातमी देतोस काय म्हणत हा हल्ला झाला.जीवन गावंड,सुरेश राऊत,सुरेश पाटील यांनी हा हल्ला केल्याची तक्रार पोलिसात दाखल चार छायाचित्रकार, मुंबई 34) दिनांक 12 ऑगस्टः ट्टयानमार आणि आसाममधील घटनांच्या निषेधार्थ रझा अकादमीच्यावतीनं मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळेस काही समाजकंटकांनी एबीपी माझा,न्यूज 24 तासआणि टीव्ही-9च्या तीन ओबी व्हॅन जाळल्या.तसेच छायाचित्रकारांवर हल्ले केले गेले.त्यात टाइम्सचे श्रीराम वेर्णेकर,द हिंदूचे विवेक बेंद्रे,मीड-डेचे अतूल कांबळे सकाळ टाइम्सचे प्रसांत सावंत जखमी झाले.माध्यमांचं कोट्यवधींचं नुकसान झालं.कारवाईच्या नावानं बोंब – मधुकर ठाकूर,उरण जिल्हा रायगड 35) दिनांक 23 सप्टेंबर ः उऱण येथील पत्रकार मधुकर ठाकूर यांना घारापुरी येथील गुंडांकडून मारहाण.वृत्तसंकलनासाठी जाताना मोटार साईकल अडवून ही मारहाण झाली.उरण ठाण्यात तक्रार दाखल – अरविंद जाधव,उदगीर ्र36)दिनांक 24 सप्टेंबर ःउदगीर येथील पत्रकार अऱविंद जाधव यांनी पोलिसांच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱणयात आला.त्यानंतर त्यांना कोठडीत डांबण्यात आले.पत्रकारांतर्फे निषेध. – संजय मालानी,बीड 37)दिनांक 25सप्टेंबरः बीड येथील सुराज्य दैनिकाचे वृत्तसंपादक संजय मालानी यांच्यावर प्राणघातक हल्ला.हल्लेखोर तोंडाला काळे रूमाल बांधून आले होते.मालानी यांचा ओढ फुटला.पोय मोडला…27 टाके पडले.पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली.ते महिना भर तुरूंगात होते.एस.एम,देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. – भंडारा 38) दिनांक 28 सप्टेंबर ःदेशोन्नतीच्या भंडारा येथील कार्यालयावर समाजकंटकांचा हल्ला.दसऱ्याच्या मिरवणुकीच्या संदर्भात दिलेल्या बातमीच्या कारणावरून हा हल्ला झाला.पोलिसांची भूमिका बघ्याची.पोलिसांनी दिली पत्रकाराला आत घालण्याची धमकी – संतोष जाधव ,वर्धन जिल्हा रायगड 39) दिनांक 29 सप्टेंबर ः आयगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील पत्रकार संतोष जाधव यांच्यावर पोलिसांसमोरच गुंडांचा हल्ला.वरती जाधव यांच्यावरच गुन्हा दाखल.जिल्हा पत्रकार संघाने घेतली एसपींची भेट. – ग़डचिरोली 40)दिनांक 8 ऑक्टोबर ः भचजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी पत्रकार पैसे घेऊन बातम्या देतात असा आरोप केला.पत्रकार संघाने यााचा निषेध करीत गडकरीच्या राजीनाम्याची मागणी केली. – नाशिरखान,नसिम शेख.बुलढाणा 41) दिनांक 11 ऑक्टोबरः बथलढाणा येथील पत्रकार नासिरखान आणि नसिम शेख यांच्यावर निलंबित पोलिस शिपाई शशी पवार आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला.पवार असे नाव दिसेल अशी फॅन्सी नेम प्लेट असलेल्या ऍक्टिव्हावरून दोन महिला पोलिस जात असताना त्याचे छायाचित्र पाठीमागुन कोणी तरी काढले आणि ते फेसबुकवर अपडेट केले.हे नासिरशेख आणि नसिम खानचे काम असल्याच्या संशयावरून ही मारहाण झाली.पोलिसात तक्रार झाली पण आरोपी शशी पवार पोलिस ठाण्यातून फरार झाला. – विवेक केरूरकर,देगलूर 42)दिनांक 26 ऑक्टोबरः देगलूर येथील पत्रकार विवेक क ेरूरकर यांनी दसरा मिरवणुकीच्या संदर्भात दिलेल्या बातम्यांवरू त्यांच्या कार्यालयास आग लावण्यात आली.दसरा मिरवणुकीच्या वेळेस देगलूरला दंगल झाली होती त्याच्या बातम्या दिल्याच्या कारणावरून हा हल्ला झाला.केरूरकर यांचे मोठे नुकसान झाले. – पी.रामदास,मुंबई 43) दिनांक 31 ऑक्टोबरः टी व्ही-9चे रिपोर्टर पी.रामदास आणि कॅमेरामन सचिन चिंदरकर हे कलर्स वाहिनीच्या कार्यालयासमोर आऱपीआयचे आंदोलन कव्हर करीत असतानाच दगडफेक सुरू झाली तिाा कटा पी रामदास यांनी आखल्याचा आरोपावरून टीव्ही-9च्या दोन पत्रकारांच्या विरोधात भादंवि 120 बी अंतर्गत कारवाई.गुन्हा दाखल.गुन्हा मागे घेण्याचे गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरीही तशी कारवाई नाही. पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भातली वरील सारी माहिती वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या किंवा जिल्हा पत्रकार संघांकडून उपलब्ध माहितीच्या आधारे जमा केली गेलेली आहे.मला पूर्ण कल्पना आहे की,ही माहिती परिपूर्ण नाही राज्यात पत्रकारांवर यापेक्षा जास्त हल्ले झालेले आहेत .वरील घटनांखेरीज पत्रकारांवरील हल्लयाच्या अन्य काही घटनांची माहिती आपणाकडे असेल किंवा आपण स्वतःशिकार झाला असाल तर अशी माहिती कृपया मला फोनवर किंवा इमेलवर कळवावी. पत्रकार संऱक्षण कायदा कऱण्याच्यादृष्टीने ही माहिती अत्यंत महत्वाची ठरणार आहे.अशी कोणतीही माहिती सरकारी यंत्रणेकडे नाही ही माहिती केवळ आपल्याकडंच आहे. माहिती देण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक 9423377700असा आहे. – 1 एस.एम.देशमुख, निमंत्रक पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती (माझ्या ब्लॉगवरील पत्रकार हल्ल्याच्या संदर्भातली माहिती अन्यत्र वापरताना एस.एम.देशमुख यांच्या ब्लॉगवरून असा उल्लेख करणे कॉपी राईट कायद्यान्वये अनिवार्य आहे.) —————————————————————————————————————————————————————————–
2008 नंतर देशात 15 प्रमुख पत्रकारांच्या हत्त्या झाल्या.चर्चेत आलेली ही प्रकरणंआहेत.वास्तवात यापेक्षा जास्त पत्रकारांचे बळी गेलेले आहेत.हिंदुस्थान टाइम्सनंकालच्या(25-06-2015) अंकात ही माहिती दिलीय.
1 एप्रिल 2008 महंमद मुस्लिमुद्दीन आसाम
11 मे 2008 अशोक सोधी जम्मू-काश्मीर
13 ऑगस्ट 2008 जावेद अहमद चॅनल -9 श्रीनगर
25 नोव्हेंबर 2008 विकास रंजन,हिंदुस्थान,बिहार
20 जुलै 2010 विजय प्रतापसिंग इंडियन एक्स्प्रेस ,अलहाबाद युपी
11 जून 2011 जेडे मिड डे मुंबई,महाराष्ट्र
1मार्च 2012 राजेश मिश्रा,मिडिया राज,मध्यप्रदेश
23 डिसेंबर 2012 द्वाजामणीसिंग प्राईमन्यूज मनिपूर
20 ऑगस्ट 2013 नरेंद्र दाभोळकर,साधना पुणे महाराष्ट्र
7 सप्टेंबर 2013 राजेश वर्मा,आबीएन -7,युपी
6 डिसेंबर 2013 साई रेड्डी,देशबंधू छत्तीसगढ
27 मे 2014 तरूण कुमार,आचार्य कनक टीव्ही ओरिसा
26 नोव्हेंबर 2104 एमव्हीएन शंकर.आध्रप्रभा आंध्रप्रदेश,
8 जून 2015 जगेंद्रसिंग फ्रिलान्स,शहाजहांपूर युपी
20 जून 2015 संदीप कोठारी,फ्रिलान्स मध्यप्रदेश
महाराष्ट्रात 1985 मध्ये तरूण भारतचे पांचगणीच्या वार्ताहराची हत्त्या झाली होती त्या घटनेनं त्याकाळात मोठीच खळबळ उडाली होती.1985 नंतर महाराष्ट्रात 19 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या.मात्र या घटनांतील फारच थोडे आरोपी सापडले आणि त्यांना शिक्षा झाली. महाराष्ट्रात 2013 पासूनच आजपर्यत 195 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.तर गेल्या 10वर्षातील ही संख्या 800 वर आहे.