घना 11 फेब्रुवारीची आहे.त्या दिवशी आम्ही अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्तानं रत्नागिरीतच होतो.परिषदेचीही बैठक होती.दुपारी 11 च्या सुमारास रत्नागिरी येथील झी-24 तासचे प्रतिनिधी प्रणव पोळेकरांशी आमची भेटही ठरली होती.मात्र सकाळी गणपतीपुळेला जात असतानाच आमचे जिल्हाध्यक्ष हेमंत वणजूंचा फोन आला..प्रणव पोळेकरच्या पत्नी ज्ञानता याचं  निधन झालंय.असे त्यांनी सांगितलं . प्रचंड धक्का बसला.
प्रसुतीसाठी त्यांना रत्नागिरीतील एका खासगी रूग्णालात दाखल करण्यात आलं होतं.मुलगी झाली होती. सारं कुटुंबं आनंदात होतं. त्यानंतर अचानक त्यांना त्रास सुरू झाला आणि त्यातच ज्ञानदा पोळेकर याचं निधन झालं.एका तरूण पत्रकारावर डोंगर कोसळला .सारं काही सुरळीत सुरू असताना अचानक नियतीनं घाला घातला.सारं होत्याचं नव्हतं झालं .मी ,किरण नाईक,हेमंत वणजू,जान्हवी पाटील आदिंसह आम्ही भेटायला गेलो.प्रणवचं सात्वन कसं आणि कोणत्या शब्दात करावं कळत नव्हतं ?.झालेला आघात शाव्दिक सात्वनानं भरून येणारा नव्हता.सारेच निःशब्द बसून होतो.पाच दिवसाचं बाळ पाठीमागं ठेऊन ज्ञानता पोळेकर निघून गेल्या.केवळ आणि केवळ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळंच हे घडलंय.या विरोधात रत्नागिरीतील पत्रकार संपप्त आहेत.पैश्याच्या मागं लागलेल्या डॉक्टारांना चांगली अद्यल घडावी असी कारवाई त्यांच्यावर व्हावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या रत्नागिरी शाखेनं केली आहे.जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना निवेदनं दिली गेलीत.परिषद मुख्यमंत्र्यांकडं हा विषय घेऊन जात आहे.
मात्र विषय इथंच संपलेला नाही..हे प्रकरण मिटवावं म्हणून निर्लज्जपणे फोन केले जात आहेत.प्रसंगी धमक्याही दिल्या जात आहेत.एका पत्रकाराच्या बाबतीत सुरू असलेल्या हा प्रकार संतापजनक आहे.एवढंच नव्हे तर गेल्या चार दिवसात किमान सहा माता खासगी हॉस्पिटलमध्ये अश्याच पध्दतीनं मृत्यूमुखी पडल्या आहेत.आता डॉक्टरांनी डिलेव्हरीसाठी आलेल्या  मातांना थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवायला सुरूवात केली आहे.काल एकाच दिवशी सिव्हिलमध्ये 22 महिलांची प्रसूती झाली.काय चालवलंय रत्नागिरीत डॉक्टरांनी ? या प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार डॉक्टर दाम्पत्यास कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.
(रत्नागिरीच्या खबरदार न्यूज अ‍ॅपनं दिलेली या घटनेची बातमी जशीच्या तशी येथे देत आहोत.)
चौकशी होईपर्यंत पावसकर हॉस्पिटलचा परवाना रद्द
 
 रत्नागिरी : शहरातील शिवाजी नगर येथील पावसकर रूग्णालयचा परवाना चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. देवकर यांनी घेतला आहे. पावसकर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झी चोवीस तासचे रत्नागिरी प्रतिनीधी प्रणव पोळेकर यांच्या पत्नी ज्ञानदा पोळेकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या घटनेनंतर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. देवकर यांनी रूग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी रूग्णालयात जबाबदार वैद्यकिय अधिकारी उपस्थित नसताना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले. यानंतर डॉ. देवकर यांनी पावसकर रूग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पत्रकार प्रणव पोळेकर यांच्या पत्नी ज्ञानदा पोळेकर या प्रसुतीसाठी पावसकर रूग्णालयात अ‍ॅडमिट झाल्या होत्या. प्रसुती दरम्यान त्यांनी मुलीला जन्म दिला. सिझरद्वारे प्रसुती झाल्यानंतरही अवघ्या चौथ्या दिवशी ज्ञानदा पोळेकर यांना घरी सोडण्याचा निर्णय रूग्णालय प्रशासनाने घेतला. रूग्णालयातुन घरी सोडल्याचा दुसऱ्याच दिवशी ज्ञानदा पोळेकर यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांना शनिवारी सायंकाळी पुन्हा पावसकर रूग्णालयात दाखल करण्यात आले.

शनिवारी डॉ. पावसकर पुणे येथे गेले असताना आणि रूग्णालयात जबाबदार वैद्यकिय अधिकारी नसताना ज्ञानदा पोळेकर यांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले. रूग्णालयातील कामचलाऊ महिला कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून सुचना देऊन पावसकर यांनी ज्ञानदा पोळेकर यांच्यावर उपचार केले. परंतु, उपचारा दरम्यान रविवारी सकाळी सहा वाजता पोळेकर यांची प्रकृती खालावली. यामुळे पोळेकर यांना पावसकर रूग्णालयातुन परकार हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय पावसकर रूग्णालय प्रशासनाने घेतला. परंतु, परकार हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत झालेला उशिर ज्ञानदा पोळेकर यांच्या जिवावर बेतला आणि रविवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे परकार हॉस्पिटलमधील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रणव पोळेकर यांच्या पत्नीच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व पत्रकार आणि आमदार उदय सामंत यांच्यासह आमदार राजन साळवी यांनी धाव घेतली. झालेल्या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पावसकर हॉस्पिटलवर धडक देण्यात आली. यावेळी पावसकर रूग्णालयात एकही जबाबदार वैद्यकिय अधिकारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. केवळ कामचलाऊ महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातुन उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले. आमदार सामंत आणि आमदार साळवी यांनी पोळेकर यांच्यावर झालेल्या उपचाराची माहिती विचारली असता समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. अखेर जिल्हा शल्य चिकीत्सक यांची भेट घेण्यात आली. पत्रकार आणि आमदार यांच्या भेटीनंतर जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी तत्काळ पावसकर रूग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी चौकशी होईपर्यंत पावसकर रूग्णालयाचा परवाना निलंबित करण्याचे आदेश डॉ. देवकर यांनी दिले आहेत.

 

रत्नागिरी १४ : पत्रकार प्रणव पोळेकर यांच्या पत्नीचा मृत्यू रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे झाला असून या प्रकरणी योग्य ती कडक कारवाई शासन पातळीवर करण्यात यावी व दोषींना कडक शासन करावे जेणेकरून अशा घटना पुन्हा रत्नागिरीत घडणार नाहीत या आशयाचे निवेदन मराठी पत्रकार परिषद, जिल्हा रत्नागिरीच्या वतीने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना बुधवारी देण्यात आले. योग्य कायदेशीर प्रक्रियेतून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी उपस्थित पत्रकारांना दिले.

ज्ञानदा पोळेकर यांचा मृत्यू हा केवळ हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे झाला असून याला केवळ डॉ दीपा पावसकर आणि डॉ. संजीव पावसकर या प्रकरणाला पूर्णतः जाबाबदार असून यातून ते सुटू नयेत असा संताप जनतेतून व्यक्त होत असून या प्रकरणाची पारदर्शकपणे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेकडून करण्यात आली आहे. योग्यवेळी कारवाई न झाल्यास पत्रकार संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्र घेणार असल्याचे यावेळी पत्रकारांकडून सांगण्यात आले. दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here