16 च्या आंदोलनाबाबत महत्वाच्या सूचना

0
1366

16 नोव्हेंबर 2017 रोजी होणार्‍या पत्रकार धरणे आंदोलनाबाबत महत्वाच्या सूचना
1)आंदोलन नेहमीप्रमाणे शांततेच्या मार्गानेच होईल,त्यामुळं पोलीस आणि अन्य यंत्रणेच्या आवश्यक त्या रितसर परवानग्या सर्व जिल्हयांनी काढाव्यात
2)आंदोलन काळात हाताला किंवा तोंडाला काळ्या पट्टया बांधून सरकारी दिरंगाईचा निषेध करावा.
3) आंदोलन स्थळावरील बॅनरचा नमुना तसेच घोषणांचं डिझाईन व्हायरल झालेलं आहे.गरज असल्यास आवश्यकतेनुसार त्यात बदल करता येईल.
4)आंदोलनाचे नेतृत्व मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करीत असली तरी अन्य संघटनांनाही आंदोलन सहभागी करून घ्यावे.
5)एस.एम.देशमुख हे बीडमधील आंदोलनाचं नेतृत्व करतील.किरण नाईक मुंबईत असतील,परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा अकोल्यात,परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन नाईक सिंधुदुर्गात तर सरचिटणीस अनिल महाजन बीडमधील लढ्याचं नेतृत्व करतील.अन्य ठिकाणी परिषदेचे विभागीय सचिव तसेच जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल.
6) राष्ट्रीय पत्रकार दिनाचे कोणतेही सरकारी कार्यक्रम यंदा होत नाहीत असे दिसते,मात्र ऐनवेळी असे कार्यक्रम घेण्याचे ठरले तरी आपण या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे.कोणीही या सरकारी कार्यक्रमांना जावू नये.
7)16 तारखेला सकाळपासून आपण मुख्यमंत्री आणि माहिती महासंचालकांना एस.एम.एम.पाठविणार आहोत.किमान 10,000 एसएमएस गेले पाहिजेत यादृष्टीनं सर्व जिल्हयांनी प्रयत्न करावेत. एसएमएसचा मजकूर आणि फोन नंबर्स लवकरच व्हायरल केले जातील.
8)स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या धरणे आंदोलन स्थळास भेट द्यावी आणि आपणास पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न व्हावेत.
9) आंदोलनापुर्वी आणि आंंदोलनाचं कव्हरेज मिडियात येईल यासाठी प्रयत्न करावेत.सोशल मिडियाचाही पुरेपूर वापर करून सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचतील याची काळजी घ्यावी.
10) आंदोलनाबाबतची अधिक माहिती सिध्दार्थ शर्मा (9423129691) अनिल महाजन(9922999671) यांच्याशी संपर्क साधून घेता येईल.
11) 16 तारखेला आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री गावात असतील तर त्यांची भेट घेऊन त्याना निवेदन द्यावे.
12) मुख्यमंत्रयांसाठी आपण कलेक्टर यांना जे निवेदन देणार आहोत त्याचा नमुना व्हायरल केला गेला आहे.तो कोणाला मिळाला नसेल तर अनिल महाजन यांच्याकडून तो मागवून घेता येईल.
13) आपल्या फेसबुक वॉलवर आंदोलनाचे पोस्टर्स असावेत,आपला व्हॉटसअ‍ॅप डीपी तसेच ट्टिटरवरही आंदोलनाचे बॅनर असावेत,वातावरण निर्मितीसाठी हे आवश्यक आहे.
14) पत्रकारांच्या प्रश्‍नांकडं सरकार सातत्यानं दुर्लक्ष करीत आलेलं आहे,त्यामुळं पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवून देणं आणि आंदोलन यशस्वी कऱणं ही राज्यातील प्रत्येक पत्रकाराची जबाबदारी आङे.
आपलं सर्वाचं सहकार्य मिळेल ही अपेक्षा
मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच सर्व पत्रकार महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here