16 तारखेचं आंंदोलन यशस्वी करा- एसेम

0
806

पुणे जिल्हा पत्रकार संघानं निवडणुकांचा पुणे पॅटर्न निर्माण केला आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या निवडणुका ऑनलाईन पध्दतीनं झालेल्या आहेत.देशातील एखादया पत्रकार संघटनेनं अशा प्रकारे निवडणुका घेण्याची ही पहिलीच वेळ होती.निवडणुकीत 485 मतदार होते.वेगवेगळ्या भागातले होते.त्यामुळं काही तांत्रिक अडचणी जरी आल्या असल्या तरी निवडणुका व्यवस्थित पार पडल्या.या निवडणुकांत जे उमेदवार विजयी झाले त्यांचा तसेच पुणे महानगर पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍याचा सत्कार आज चिंचवड येथे एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.कौटुंबिक कार्यक्रमात बोलताना एस.एम.देशमुख यांनी परिषदेचे उद्ेश स्पष्ट करून येत्या 16 नोव्हेंबरचे धरणे आंदोलन यशस्वी कऱण्याचे आवाहन केले.छोटया वृत्तपत्रांचे प्रश्‍न त्यांनी मांडले आणि पेन्शन आम्ही का मागतोय त्याचा खुलासाही विस्तारानं यावेळी केला.पुणे जिल्हयात पत्रकारांचे मजबूत,सशक्त संघटन उभे राहण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.प्रारंभी पिंपरी-चिंचवड महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्ष सायली कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले.कार्यक्रमास परिषदेचे विभागीय सचिव शरद पाबळे,जिल्हयाचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल,कार्याध्यक्ष सुनील लोणकर,उपाध्यक्ष एम.जी .शेलार,सरचिटणीस दत्ता म्हसकर,कोषाध्यक्ष गणेश सातव,माजी अध्यक्ष बापूसाहेब गोरे,माजी सरचिटणीस प्रभाकर क्षीरसागर,शहर अध्यक्ष मनोज गायकवाड,उपाध्यक्ष श्रीमती चव्हाण,तसेच विविध तालुका अध्यक्ष आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here