108 क्रमांकाचा सुखद अनुभव…

0
906

30 तारखेची घटना आहे.जंजिरा मुक्ती दिनाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आम्ही अलिबागमार्गे मुरूडला जात होतो.रेवदंड्या जवळच्या चौल नाक्यावर एक 20-22 वर्षाचा तरूण मुलगा आमच्या गाडीच्या मागून मोटर साईकलवरून सुसाट आला.आमच्या समोरच्या स्पीड ब्रेकरची पर्वा न करता पुढे जोरात गेला.त्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला समोरून येणाऱ्या मॅटॅडोरवर तो जोरात आदळला.मोटर साईकलचा तर पुरता चुराडाच झाला पण तो तरूण देखील उभा आडवा फाटला गेला.बघे जमले.तेवढ्यात आम्ही मागावून येत घटनास्थळी पोहोचलो.गाडीतून उतरून पाहतो तर आम्हाला ओव्हरटेक करून गेलेलाच मुलगा.त्याची अवस्था पाहून मलाच चक्कर येण्यासाऱखी स्थिती.काय करावे सूचत नव्हते.त्याला तातडीने रूग्णालयात हलविणे आवश्यक होते.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी 108 क्रमाकाची आठवण करून दिली.मी लगेच तो नंबर डायल केला.रेवदंड्यापासून पंधरा-वीस किलो मिटरवर असलेल्या बोर्ली मांडला येथे ऍम्ब्युलन्स तयार होती.ती पंधरा मिनिटात घटनास्थळावर पोहोचली.तेथून त्या मुलाला अलिबागला हलविण्यात आले.रेवदंडा ते अलिबाग हे अंतर कापायला जवळपास 25 मिनिटे लागतात.ऍब्युलन्स येण्यासाठीचे पंधरा मिनिटे लागली.नंतर तातडीने उपचार सुरू झाले.नंतरच्या पंचवीस मिनिटात जखमी अलिबागच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला.काल मुरूडहून परत येताना सहज चौकशी केली,तर जखमी मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे समजले.संतोष पवार,सुनील वाळूंज,विजय पवार या माझ्या पत्रकार मित्रांसह मला नक्कीच समाधान मिळालं.कारण पहिला अर्धातास क्रिटीकल असतो.त्यावेळेत उपचार मिळाले तर रूग्ण हाती लागू शकतो.काल तेच झाले.सरकारने 108 ची व्यवस्था केलीय त्याचा सुखद अनुभव आला.एका मुलाचे त्यामुळे प्राण वाचले.
काल फिडबॅकसाठी 108 वरून फोन आला.त्यांचेही मी आभार मानले.फक्त एकच गोष्ट करावी लागेल.अपघात झाला किंवा कोणतीही इमरजन्सी असेल तेव्हा 108नंबरवर फोन केला की,व्यवस्था होऊ शकते याची माहिती लोकांना नाही ती होण्यासाठी त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल.त्यातून अनेकांचे प्राण वाचू शकतील.रेवदंड्या सारख्या रिमोट एरियात जर ऍबम्युलन्स पंधरा मिनिटात घटनास्थळावर पोहचू शकत असेल तर ही व्यवस्था नक्कीच स्वागतार्ह आहे.उपयुक्त आहे असं म्हणावं लागेल.सरकारी यंत्रणेचा पहिल्यांदाच एवढा सुखद अनुभव आला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here