महाराष्ट्रात दर दिवसाला दीड पत्रकाराचा मृत्यू

सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले

मुंबई बई दि. 18: महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात तब्बल 100 पत्रकारांचे मृत्यू झाले असून 1500 पेक्षा जास्त पत्रकार कोरोनानं बाधित झाले आहेत .. दुसरया लाटेत हा मृत्यूदर चिंता वाटावी एवढा वाढला.. 1 एप्रिल ते 17 एप्रिल या 17 दिवसात राज्यात तब्बल 29 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ही माहिती एका प़सिध्द पत्रकाव्दारे दिली आहे..महाराष्ट्रात दर दिवसाला सरासरी दीड पत्रकाराचे बळी कोरोनानं जात असल्याची धक्कादायक आकडेवारी देखील एस.एम.देशमुख यांनी दिली आहे..
मराठी पत्रकार परिषदेने 1 ऑगस्ट 2020 पासून पत्रकारांबददलची माहिती संकलित केली आहे.. ऑगस्ट 2020 ते 15 फेब़ुवारी 2021 या साडेसहा महिन्याच्या काळात जवळपास पन्नास पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले.. मात्र फेब्रुवारी नंतर आलेल्या दुसरया लाटेत बाधित पत्रकारांची संख्या जशी वाढली तद्वतच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले.. मराठी पत्रकार परिषदेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार 16 फेब्रुवारी 2021 ते 17 एप्रिल 2021 या दोन महिन्यात तब्बल 54 पत्रकारांचे मृत्यू झाले.. त्यातही एप़िल हा महिना पत्रकारांसाठी अधिक तापदायक ठरला.. कारण 1 एप़िल ते 17 एप्रिल या 17 दिवसात राज्यात तब्बल 29 पत्रकारांचे निधन झाले आणि दोन पत्रकारांनी आत्महत्या केल्या.. आणि राहुरीतील एका पत्रकाराची याच कालावधीत हत्या देखील झाली.. 15 एप़िल हा दिवस तर अधिक वाईट ठरला.. या दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागात तब्बल 5 पत्रकारांचे एकाच दिवशी मृत्यू झाले..एप़िल मधील 17 दिवसांचा विचार केला तर राज्यात दर दिवशी सरासरी दीड पत्रकाराचा मृत्यू झाला असे म्हणता येईल..ही आकडेवारी धक्कादायक असली तरी प्रत्यक्षात यापेक्षा जास्त पत्रकारांचे मृत्यू झालेले असू शकतात कारण काही आकडे परिषदे पर्यत पोहचू शकलेले नाहीत.
तरूण पत्रकारांची संख्या जास्त
पहिल्या लाटेत ज्या पत्रकारांचे मृत्यू झाले त्यातील बहुसंख्य पत्रकार 55 ते 65 या वयोगटातील होते.. मात्र दुसरया लाटेत मृत्युमुखी पडलेले बहुसंख्य पत्रकार 35 ते 50 वयोगटातील आहे.. काल मृत्युमुखी पडलेल्या नागपूरच्या अंकित डा चं वय केवळ 31 वर्षांचं होतं.. बाधित होणारया पत्रकारांमध्ये देखील तरूण पत्रकार अधिक असल्याने सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने इ-मेल पाठवा आंदोलन केले होते मात्र उध्दव ठाकरे यांना या आंदोलनाची दखल घ्यावी असे वाटले नाही.. आपल्या कामासाठी तरूण पत्रकारांना सतत बाहेर भटकावे लागते, लोकांना भेटावे लागते त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते..आणि म्हणूनच या वयोगटातील पत्रकारांना प्राधांन्याने लस द्यावी असा मराठी पत्रकार परिषदेचा आग़ह आहे..
दोन पत्रकारांच्या आत्महत्या
कोरोनामुळे अनेक पत्रकारांच्या नोकरया गेल्या, त्यामुळे पत्रकार आर्थिक विवंचनेत अडकले.. त्यातच जे पत्रकार किंवा त्यांचे कुटुंबिय बाधित झाले त्यांच्या दुख:ला सीमा राहिली नाही.. सोलापूरचे तरूण पत्रकार प्रकाश जाधव यांचे वडिल कोरोनानं गेले, आई आणि भाऊ पॉझिटिव्ह, स्वतःघरीच क्वारंटाइन अशा स्थितीत आर्थिक चणचण आणि औषधंही मिळत नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून प़काश जाधव यांनी आत्महत्या केली..
परभणीचे अरूण हिस्वणकर हे देखील आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.. या दोन्ही घटना माध्यमातील अस्वस्थतः दरशविणारया आहेत
सरकारचे पत्रकारांकडे दुर्लक्ष
मयत पत्रकारांच्या नातेवाईकांना 50 लाख रूपयांची मदत करण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेली घोषणा हवेतच विरली.. 50 लाख राहू द्या, केद़ाच्या धर्तीवर किमान 5 लाख रूपये तरी द्या या मागणीवर ही मुख्यमंत्री मौन घरून आहेत.. सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्या, पत्रकारांसाठी एक बेड राखीव ठेवा या आवश्यक मागण्यांकडे देखील सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे..माथेरानचे पत्रकार संतोष पवार आणि पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू शासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे झाला होता.. या दोन्ही घटनांच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले होते पण एक वर्ष होत आले तरी ना चौकषीचे निष्कर्ष समोर आले ना मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर काही कारवाई झाली त्याबद्दलही पत्रकारांमध्ये मोठी नाराजी आहे..
थोडक्यात सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले आहे, सरकार पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सोडवत नसल्याबद्दल महाराष्ट्रातील माध्यम जगतात मोठा संताप आणि असंतोष आहे..

गेल्य 17 दिवसात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांची नावे

रफियोद्दीन रफिक औरंगाबाद, जी. डी. शर्मा पुणे, गणेश जळगावकर जालना, विजय दिघे नागपूर, राजेंद्र सरग डीआयओ पुणे, सबाजी पालकर मुंबई, रमेश गंगासागरे उमरी, रमेश महामुनी सोलापूर, हरिश्चंद्र संभा धावरे उस्मानाबाद, विवेक देशपांडे पुणे, बजरंग राजीवडे पिंपरी, प्रदीप धोंडिबा पाटील नायगाव, भगतसिंग परदेशी पारोळा, परशुराम बोंडे भुसावळ, वासुदेव ढवळे सावनेर, पद्माकर विसपुते उल्हासनगर, अतुल पाटील उरण, संदीप रोकडे नाशिक, आसिफ नाशिक, ़उदयसिंह राजपूत पंढरपूर, कैलास देढे राहुरी, गणपत खोबरे चिमूर, नागवाथ निडवदे उदगीर, प़काश देसाई सांगली, अंकित डा,नागपूर, बंडू लांजेवार गडचिरोली आदि..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here