मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांची दोन दिवसीय कार्यशाळा सावंतवाडी येथे २१ आणि  २२ डिसेम्बर रोजी  पार पडली.परिषदेच्या इतिहासात असा प्रयोग प्रथमच झाला आणि गजानन नाईक गणेश जेठे आणि टीमच्या अथक प्रयत्नातून तो यशस्वीही झाला.सिंधुदुर्गच्या पत्रकारांनी आलेल्या पदाधिकार्‍यांची उत्तम व्यवस्था ठेवली होती.निवास,भोजण व्यवस्था चोख होती.नियोजन चोख होतं.कुठंही गडबड,गोंधळ,विस्कळीतपणा नव्हता.वेळेत आणि ठरलेले सारे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले.त्याबद्दल गजानन नाईक,गणेश जेठे आणि सिंधुदुर्गमधील तमाम पत्रकारांना मनापासून धन्यवाद.भोसले नॉलेज सिटीचे अच्युत भोसले,माजी मंत्री दीपक केसरकर आणि या कार्यशाळेस मदत करणार्‍या सर्वांचे मनापासून आभार..

कार्यशाळा शंभर टक्के यशस्वी झाली कारण बाळशास्त्री जांभेकर स्मारकाला भेट देता आली…गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून गोव्यात पत्रकार संरक्षण कायद्याचं आश्‍वासन मिळवता आलं.दीपक केसरकर यांची भेट घेऊन मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर याचं नाव देण्याबाबतचा आग्रह त्यांच्याकडं धरता आला,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची भेट घेऊन जिल्हा बॅकेचे उत्तम काम कसे सुरू आहे ते समजून घेता आलं.कोकणात दर्जेदार शिक्षणाची आबाळ आहे.मात्र भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून अच्युत भोसले यांनी तळ कोकणात केवळ सहा वर्षात दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कशी उभी केली हे समजून घेता आलं..आलेल्या प्रतिनिधी  चांगला संवाद साधता आला.विविध जिल्हयांमध्ये परिषदेला अपेक्षित असलेले उपक्रम अत्यंत छान पध्दतीनं सुरू असल्याचे दिसून आलं..प्रतिनिधीनी आपले उपक्रम टाळ्यांच्या गजरात सादर केले..परिषदेकडून त्यांच्या अपेक्षा आणि परिषदेला जिल्हा संघाकडून काय अपेक्षित आहे याचीही चांगली चर्चा झाली..मुख्य म्हणजे कधी काळी सातत्यानं व्यक्त होणारा परिषद काय करतेय हा सूर दिसून आला नाही..परिषदेच्या कामाबद्दल सर्वच जिल्हयातील प्रतिनिधींनी समाधान आणि आनंद व्यक्त केला ही मोठीच गोष्ट समजावी लागेल.पुढील काळात परिषदेची वाटचाल कशी असेल यावर पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केलं.सारं कसं खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं.परिषदेच्या इतिहासात सावंतवाडी मेळावा ऐतिहासिक

ठरला यात शंकाच नाही..सावंतवाडी समेटमुळं परिषदेला अधिक बळकटी आली यात शंकाच नाही..

राज्यातून 24 जिल्हयातील प्रतिनिधी कार्यशाळेला उपस्थित होते.नागपूर,गडचिरोली सारख्या दुरच्या भागातूनही प्रतिनिधी आले होते..दोन-दोन दिवसांचा प्रवास करून परिषदेवरील पे्रमापोटी आलेल्या सर्वच प्रतिनिधींचे आभार 

 औरंगाबाद,अकोला,अहमदनगर,पालघर,सांगली,वाशिम,सातारा,जळगाव आदि जिल्हयातून एकही प्रतिनिधी आला नाही खरं म्हणजे वर उल्लेख केलेले सर्व जिल्हे परिषदेचे बालेकिल्ले आहेत..या जिल्हयातील मित्रांना आम्ही नक्की ‘मीस’ केलं आणि त्यांनीही एक अविस्मरणीय सोहळा ‘मीस’ केला..

एस.एम.देशमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here