शंकर साळुंके आणि आपण सारे…

0
719
शंकर साळुंकेची पोस्ट काल टाकल्यापासून मानवी स्वभावाचे विविध कंगोरे मला बघायला मिळाले.पोस्ट वाचताच काही संवेदनशील मित्रांनी मला लगेच फोन करून अकाऊंट नंबर द्या,मदत करायची आहे असे सांगितले. काही मित्रांनी थेट व्हॉटसअ‍ॅपवर आपल्या ऐपतीप्रमाणे मदत जाहीर केली ,काहींनी शंकरला मदत झाली पाहिजे असा नुसताच हितोपदेश केला,काहींनी ही पोस्ट वाचून त्याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलं,काहींनी त्या पोस्टखाली लगोलग अभिनंदन,शुभच्छाच्या निरर्थक पोस्ट टाकायला सुरूवात केली.काहीनी थेट शंकरच्या मानसिक दुर्बलबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत शंकरलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं. आणि हात झटकले,काहींनी माझे फोन घेणंही बंद केलं, तर काहींनी माझ्या हेतूबद्दलच शंका व्यक्त करीत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.असे अनुभव मला शिवाजी क्षीरसागर,राम ,कल्पक हातवळेणे आणि इतरांना मदत करतानाही आले. मी कोणाला काय वाटते याची पर्वा केली नाही.मी हाती घेतलेले काम निष्ठेने करीत राहिलो.यावेळेसही तीच भूमिका आहे.जे नेहमीच माझ्याबरोबर असतात त्याना बरोबर घेऊन शंकरला या संकटातून बाहेर आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.पण मला सारखं वाटत आलंय की,कोणत्याही पत्रकाराला कोणासमोर हात पसरण्याची वेळ आली नाही पाहिजे.ना सरकार समोर ना समाजासमोर.असं झालं तरच तो ताठ मानेनं पत्रकारिता करू शकेल.त्यासाठी माझ्याकडं एक योजना आहे.ती प्रत्यक्षात आणण्याचा पुढील काळात आम्ही सारे मित्र प्रयत्न करणार आहोत.
ज्या मित्रानी संवेदनशीलता दाखवत मदत देऊ केली त्याचा मी आभारी आहे.ज्यानी वेगवेगळ्या सबबी सांगितल्या त्यांच्याबद्दलही काही राग नाही.मात्र वेळ सांगून येत नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.आयएएस होण्याची स्वप्न पाहणारा तरूण मानसिकदृष्टया दुर्बल आहे हे ज्यांना गरिबी काय असते हे माहिती नाही तेच बोलू शकतात.शंकर हा परिस्थिती आणि व्यवस्थेचा बळी आहे हे माझं ठाम मत आहे आणि म्हणूनच आमच्या परीनं आम्ही त्याच्यासाठी जे करता येईल ते करीत राहणार आहोत.माझ्याबरोबर माझ्या विचारांचे माझ्या चळवळीवर विश्‍वास ठेवणारे शेकडो पत्रकार आहेत त्यांच्या मदतीनं आम्ही नक्कीच शंकरला या परिस्थितीतून बाहेर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शंकर आज येरवड्याच्या रूग्णालायत येणार होता.परंतू काही कागदपत्रांची पुर्तता व्हायची असल्याने तो आज येऊ शकलेला नाही.उद्या किंवा परवा येईल.काल त्याच्या बंधुशी बोललो पाराजी साळुंके यांचं एक खात वडवणीच्या बॅकेत आहे.मराठवाडा ग्रामीण बॅक वडवणी येथे हे खातं आहे.खात्याची माहिती पुढं दिली आहे.ज्यांना आपला एक सहकारी पुन्हा बरा व्हावा असं वाटतं त्यांनी मदत करायला हरकत नाही.
नावः पाराजी शेषराव साळुंके
खाते क्रमांक ः 54520034742
शाखा ः वडवणी जिल्हा बीड
आयएफएससी कोडः MAHBO RRBMGB

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here