.

‘लोकराज्य’ हे राज्य सरकारचे मासिक लवकरच अॅमेझॉन किंडलवर उपलब्ध होणार आहे. तसेच, हे मासिक ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठीचेही प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. अशा प्रकारे सरकारी मासिक ई-माध्यमांवर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय, विविध तज्ज्ञांची मते, मंत्र्यांच्या मुलाखती, विविध विभागांची माहिती, सरकारी उपक्रम आणि योजनांची माहिती अशा विविध लेखांचा समावेश ‘लोकराज्य’ मासिकात असतो. हे मासिक दरमहा राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयातर्फे प्रकाशित केले जाते आणि सुमारे साडेचार लाख प्रतींचे वितरण केले जाते. मासिकाचा सर्वाधिक वापर हा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो. सरकारचे निर्णय, त्यामागची भूमिका व अभ्यास या सर्वांचा त्यात समावेश असतो. यामुळे या विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान, राज्यातील प्रशासकीय घडामोडींचे ज्ञान अवगत होण्याचा हा सोपा मार्ग आहे. बदलत्या काळानुसार हे मासिक अॅमेझॉन किंडलवर उपलब्ध होणार आहे. या संदर्भातील बोलणी अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहिती माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.

महाराषट़ टाइम्स वरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here