माजलगावचे पत्रकार रस्त्यावर

0
1492
उपोषणाचा चौथ्या दिवस

माजलगांव / रविकांत उघडे

प्रस्तावित अंबाजोगाई जिल्हयात  माजलगांव तालुक्याचा अंबाजोगाई जिल्हयात समावेश करु नये तो बीड मध्येच कायम ठेवावा ही जनतेची मागणी आहे ही मागणी मान्य करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांनी दिला.

माजलगांव पत्रकार संघाच्या वतीने  सोमवार दि. 12 मार्च पासुन येथील सुरु करण्यात आलेल्या पत्रकाराच्या साखळी उपोषनाच्या चौथ्या दिवशी शिवसेनेने अप्पासाहेब जाधव यांचे नेत्रत्वाखाली शिवसैनिकांनी उपोषण करून पाठिंबा दिला,यावेळी मोरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी माजी आमदार सुनील धांडे, चंद्रकांत नवले,जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,बाळासाहेब अंभोरे,नारायण काशीद,संजय महाद्वार,नितीन धांडे, यांची उपस्थिती होती. याचबरोबर  बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे,दयानंद स्वामी ,अच्युत लाटे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन  आंदोलनात सहभाग नोंदवुन पाठिंबा दिला.

सोमवार दि.१२ पासून सुरु करण्यात आलेल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील आंदोलनास   जनतेतुन मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे,शेकडो राजकीय,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नेते,पदाधिकारी , विविध पक्षांचे कार्यकर्ते ,व्यापारी यांनी या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा देत आहेत.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी शिवसेनेच्या उपोषणात अप्पासाहेब जाधव,शहरप्रमुख अशोक आळणे,तुकाराम येवले,नितीन मुंदडा,अमोल डाके,अतुल उगले,विश्वनाथ नंदीकोल्हे,सोखदेव मुळे, मच्छिद्र काळे,राजेश शहाणे,रामेश्वर काशीद,आकाश खामकर,उदय नरवडे,सुरज ऐखंडे,गौतम वैराळे,संदीप ढिसले आदी सहभागी झाले होते. प स उपसभापती सुशील सोळंके,बाजार समिती उपसभापती नीलकंठ भोसले, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान कदम,बबनराव सोळंके, नागरसेवक विनायक रत्नपारखी,प्रशांत पाटील,पवन मोगरेकर,दत्ता महाजन, रिपाई आठवले गटाचे गणेश लांडगे,संपादक प्रभाकर कुलथे,मल्हार सेनेचे अशोक डोने, जय संघर्ष वाहनचालक संघटनेचे विकास झेटे,राजेंद्र टाकणंखार,उत्तम जोगदंड,सचिन सोळंके,सरपंच प्रकाश शिंदे,सरपंच अविनाश गोंडे,मंगलनाथ मल्टीस्टेटचे रवींद्र कानडे,आधार चे सुनील सौन्दरमल,बबनराव सोळंके,चंद्रशेखर देशमुख,संभाजी शेजुळ,भाई महादेव उजगरे,श्रीकृष्ण सोळंके,विभागीय अधिृस्वीकृती समिती चे सदस्य व सा.डोंगराचा राजा चे संपादक अनिल वाघमारे,नगरसेवक तालेब चाऊस, इनायतखान,अशोक नवघरे, मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रा प्रेम राठोड,खुर्शीद नाईक,नवाब पटेल,दिलीप जावळे,शशिकांत खडके,बाळासाहेब शिंदे,देवानंद शिंदे,दीपक शिंदे,सरपंच संजय नरवडे,किशोर दळवी,राजाभाऊ शेळके,सर्जेराव काशीद,शकील कुरेशी, संपत हाराळ, सुरेश सोळंके,संजय सोळंके,जीवन जगताप,अंकुश शिंदे,पिंटू मेहता,नारायण टाकट, अंकुश चव्हाण,महेश ठोंबरे,बाब्रुवाहन इत्यापे, पुरुषोत्तम जाधव,उत्तम पवार,माणिकराव काजाळे यांनी उपोषणस्थळी भेटी देऊन पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here