दिलीप कांबळेंचे प्रकरण ताजं असताना आज दोन-तीन घटना पुन्हा संताप आणणार्‍या घडल्या.पुणे जिल्हयातील आंबेगाव नजिक असलेल्या घोडेगाव येथे एक मृतदेह आढळला असताना तिथे घटनास्थळी जावून व्हिडीओ घेतला जात असताना पोलीस उपनिरीक्षक के.के,भालेकर यांनी पत्रकारांना घटनास्थळ खाली करा असा आदेश दिला.शिवाय तुम्ही मृतदेह उचलता का असा प्रश्‍न विचारला.पत्रकाराना अरेरावीची भाषा वापरली एवढेच नव्हे तर आयबीएन लोकमतचे पत्रकार रायचंद शिंदे यांना मारहाण करीत गाडीत टाकून तुमच्यावर गुन्हे दाखल करतो अशा भाषा वापरत पोलिसी अरेरावी केली.इतर पत्रकारांनाही अशीच वागणूक दिली गेली.पत्रकार संरक्षण कायदा झाल्यानंतरची ही अवस्था आहे. दुसरा प्रकार निलंग्यातला.मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टरला अपघात झाला.अपघात होत असताना सारे पोलीस पळाले मात्र इरफान धावून आला असी बातमी लोकमतने दिली आहे.बातमी खोटी आणि पोलीस खात्याची बदनामी करणारी असल्याची तक्रार एका पोलिस कर्मचार्‍यानं दिल्यानंतर निलंगा येथील लोकमतचे प्रतिनिधी गोविंद इंगळे यांच्याविरोधात निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भादवि 500 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल आहे.या राज्यात पोलीस बेबंदपणे कसे वागतात हे दोन्ही घटनावरून दाखवून दिले गेले आहे.विरोधात बोललं की,हल्ले करायचे किंवा खोटे गुन्हे दाखल करायचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे.याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती धिक्कार करीत आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here