पालघर जिल्ह्यातील पत्रकारांनी आज पालघर पोलीस स्टेशनला भेट देऊन ” आम्ही पत्रकार आहोत. आम्हाला आयपीसीच्या कलम 353 खाली अटक करा ” असे आव्हान दिले. अलिकडेच वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या 2 पत्रकारांवर पोलीसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद, पालघर जिल्हा पत्रकार संघ, प्रेस क्लब ऑफ वसई विरार, वसई विरार महापालिका पत्रकार संघ, क्राईम रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन अशा ५ संघटनांनी आज पोलीसांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. या आक्रोशाची दखल घेत पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांनी पत्रकारांची भेट घेतली आणि यापुढे योग्य ती दक्षता घेतली जाईल अशी खात्री दिली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त श्री किरण नाईक व विभागीय सचिव श्री संतोष पेरणे यांनी उपस्थिती नोंदविली. श्रमजीवी संघटनेचे श्री विवेक पंडित यांनी देखील उपस्थित राहून पत्रकारांना बळ दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here