साथी हात बढाना …..
शेवटी पत्रकारच पत्रकाराच्या मदतीला……

ग्रामीण भागातील पत्रकार अल्ताफ कुरेशी
याना पत्रकार कल्याण निधीतून आर्थिक मदत
बीड-
पत्रकार आयुष्यभर इतरांना न्याय देण्याचे काम करतो अनेक नेते पुढारी याना साथ देतो पण जेव्हा पत्रकारालाच अडचण येते तेव्हा अनेकजण नाक मुरगळतात पण बीड जिल्ह्यातील पत्रकाराच्या आरोग्य विषयक अडचणी सोडवून मदतीचा हात देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या बीड जिल्हा पत्रकार कल्याण निधी मधून तलवाडा येथील पत्रकार अल्ताफ कुरेशी याना आर्थिक मदतीचा धनादेश मान्यवर पत्रकार सम्पादकाच्या हस्ते सोमवार (दि १५) रोजी देण्यात आला .
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकार कल्याण निधी नावाने कोष तयार केला असून जिल्ह्यातील सदस्य असलेल्या पत्रकार बांधवाना आरोग्य संदर्भात अडचणी आल्यातर इतरांकडे हात पसरण्याची वेळ येउ नये या उद्देशाने त्याला तातडीची मदत मिळावी म्हणून पत्रकार परिषदेचे नेते विश्व्स्त एस एम देशमुख यांच्या संकल्पनेतून व राज्य सरचिटणीस अनिल महाजन यांच्या सहकार्याने पत्रकार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली होती आतापर्यंत अनेक पत्रकारांना या निधीतून आर्थिक मदत करण्यात आली असून आज ग्रामीण भागातील पत्रकार अल्ताफ कुरेशी यांची आर्थिक परस्थिती नाजूक असल्याने रुग्णालयातील खर्च त्यानं भागवणे शक्य नाही त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून बीड जिल्हा मराठी पत्रकार संघ त्यांच्या मदतीला धावून आला आज त्यानं आर्थिक मदतीचा धनादेश संपादक सर्वोत्तम गावरस्कर राजेंद्र आगवान दिलीप खिस्ती राजेंद्र होळकर नरेंद्र कांकरिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे सरचिटणीस विलास डोळसे विशाल साळुंके मंगेश निटूरकर लक्ष्मण नरनाळे डॉ संजय तांदळे आदींच्या हस्ते देण्यात आला यावेळी औरंगाबाद येथील दिवंगत पत्रकार सुंदर लटपटे याना आदरांजली अर्पण करण्यात आली.
मदत आयुष्यभर विसरणार नाही -अल्ताफ
कधी कधी असं वाटायचं कि शहरी आणि डर्मी भागातील पत्रकारात काही वेगळे पण आहे आज माझी आर्थिक परस्थिती हलाखीची असल्याने आरोग्याचा भर मी उचलू शकत नाही पण माणुसकीची जाणं बीड जिल्हा मराठी पत्रकार संघात दिसून आली माझी अडचण त्यांना सांगितल्या नंतर मला लागलीच मदत केली नेते अन पुढारी केवळ अम्हासारख्या पत्रकाराचा बातम्यांसाठी वापर करून घेतात पण मदत करत नाही पण पत्रकार परिषदेने केलेली मदत मी आयुष्यभर विसरणार नाही अशी प्रतिक्रिया अल्ताफ कुरेशी यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here