पत्रकारांच्या एकीचा एल्गार,

0
694

पत्रकारांच्या एकीचा एल्गार,
हम सब एक है चा नारा सर्वत्र घुमतोय,
बघा ही बातमी

पत्रकारांवर होत असलेले हल्ले आणि खोटे गुन्हे दाखल करून त्यांना आयुष्यातून उठविण्याचे होत असलेले प्रयत्न या मुळे व्यतिथ झालेल्या पत्रकारांना आता आपली एकजूट दाखविल्याशिवाय पर्याय नाही याची ाजणीव झाली असून एका आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत समान उद्दिष्टांसाठी आता राज्यातील पत्रकार आणि पत्रकार संघटना पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बॅनरखाली एक6 येतानाचे अत्यंत आशादायक चित्र महाराष्ट्रात दिसायला लागले आहेत.नांदेड येथून आलेली खालील बातमी नक्कीच दिलासा देणारी आणि राज्यकर्त्यांना धडकी भरायला लावणारी आहे.नांदेड जिल्हयातील पत्रकारांच्या सर्व संघटना एकत्रितपणे पत्रकार संरक्षण काय्दयाच्या मागणीसाठी 2 ऑक्टोबर रोजी एकत्र येत आहेत.नांदेडमधील सर्व पत्रकार,पत्रकार संघटनाचे पदाधिकारी आणि सदस्यांचे तसेच सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कऱणार्‍या प्रकाश कांबळे यांचे मनापासून अभिनंदन.अन्य जिल्हयातही अशाच पध्दतीने पत्रकारांनी एकत्र यावे अशी विनंती आहे.–
पत्रकार हल्ला विरोधी
कृती समितीच्या वतीने
दि.२ आँक्टोबर रोजी राज्यभर निर्धार मोर्चा आयोजित केला आहे.
नांदेड येथे देखील मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,
प्रेस फोरम,
मायनाँरिटीज प्रेस असोसिएशन,
मायनाँरिटीज प्रेस मिशन,बहुभाषिक पत्रकार संघ,डिटीपी आँपरेटर संघटना,जर्नालिझम महाविद्यालयातील विद्यार्थी देखील सहभागी होणार आहेत.

या संदर्भात मी स्वतः सर्व संघटना यांचे प्रमुख यांच्या सोबत चर्चा केली आहे.सर्वांनी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
जर्नालिझम महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सहभागाबाबत मी काही प्राचार्य यांच्याशी बोललो आहे.
त्यांनी चांगला प्रतिसाद
दिला आहे.

या मोर्चाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक दि.२५ सप्टेंबर रोजी
सकाळी ११ वाजता
शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती. या बैठकी नंतर लगेच नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यकारिणी, सर्व तालुका अध्यक्ष व सरचिटणीस यांची बैठक होणार आहे.या बैठकीस सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.
*प्रकाश कांबळे*
संयोजक
पत्रकार हल्ला विरोधी
कृती समिती नांदेड.
अध्यक्ष
नांदेड जि. म. पत्रकार संघ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here