मित्रांनो,पत्रकार दिन म्हणजे सहा जानेवारी जवळ येत आहे.या बाबत काही गोष्टींची माहिती ठेवली पाहिजे असे वाटते.पहिली गोष्ट अनेकांना असे वाटते की,सहा जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आहे म्हणून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.गेल्या वर्षी अशा पोस्ट व्हॉटस् अॅपवर फिरत होत्या.तसे नाही. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरू केले.त्याची आठवण म्हणून आपण पत्रकार दिन साजरा करतो.हे आपण लक्षात ठेवावे
दुसरा महत्वाचा मुद्दा बाळशास्त्रींच्या फोटोबाबत.बाळशास्त्रींचे चार-पाच फोटो पत्रकार दिनी प्रसिध्द होतात.सरकारही एक छायाचित्र वापरते.ते चुकीचे आहे.कारण बाळाशास्त्रींचे निधन वयाच्या 32 व्या वर्षी झाले.आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी विद्वतेचं तेज चेहर्यावर दिसत होतं.जो सरकारी फोटो प्रसिध्द केला जातो त्यात बाळशास्त्री साठ वर्षांचे वाटतात.तेवढा काळ ते जगलेच नाहीत.मुकुंद बहुलेकर या चित्रकाराने काढलेल्या चित्राचे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात प्रकाशन झाले होते.त्या प्रसंगी बाळासाहेबांनी हेच खरे बाळशास्त्री असे म्हटले होते.त्यामुळे फोटोबाबतचा संभ्रम या पत्रकार दिनी तरी आपण दूर करून खाली दिलेले छायाचित्रच 6 जानेवारीला वापरावे अशी विनंती आहे