हायपरलोकलला मीडियात कितपत भवितव्य ?*

0
954

*एकीकडे आपली माध्यमे हायपरलोकल बनत चाललीहेत किंवा लोकल न्यूजवर भर देऊ लागली आहेत. दुसरीकडे, जगभर माध्यमे अधिकाधिक ग्लोबल होत चालली आहेत. लोकल की ग्लोबल, हायपरलोकल की सुपरग्लोबल …. अशी द्विधा मन:स्थिती सध्या सर्वच माध्यमांमध्ये दिसतेय. परवा न्यूयॉर्क शहराशी ऋणानुबंध असलेली, त्या शहराची स्वत:ची दोन प्रकाशने बंद पडली. DNAinfo आणि Gothamist ही न्यूयॉर्क शहरकेंद्रीत, स्थानिक विषयांना वाहिलेली पत्रकारिता करणारी नियतकालिके वाचकांच्या प्रतिसादाअभावी बंद करावी लागली. याविषयी वरिष्ठ पत्रकार ग्रेग डेव्हिड यांनी ‘लिंक्डइन’वर लिहिलेले “DNAinfo’s demise another blow to NY journalism. Is there any hope?” हे आर्टीकल विचार करायला लावणारे आहे. यापूर्वी याच विषयावर “The Daily Beast”चे ज्येष्ठ पत्रकार पॉल मोसेस यांनी याच विषयावर दोन आर्तीकाल लिहिले होते. “In New York City, Local Coverage Declines—and Takes Accountability With It” आणि “The New York Times Turns Its Sights Away From New York City.” या दोन्ही लेखात माध्यमांचा फोकस लोकल नव्हे तर ग्लोबल होत चालल्याचे म्हटले होते. आश्चर्य म्हणजे, गुन्हेगारी व नकारात्मक बातम्यांना वाचक विटले आहेत. 23 लाख लोकसंखेच्या क्वीन्स शहरात वर्षाला 35 हजार मेजर क्राईम व एकून दोन लाख केसेस होतात. तरीही वाचकांचा गुन्हेगारी बातम्यांना प्रतिसाद नसल्याने, माध्यमातील त्याचे कव्हरेज घटत असल्याने क्वीन्स कोर्टातील प्रेसरूममध्ये कुणीही वार्ताहर फिरकताना दिसत नाहीये. ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने आपले कव्हरेज धोरण बदलण्याचे मुख्य कारण आहे, “Its readership and priorities are now global, not local.” ‘वाल स्ट्रीट जर्नल’सारख्या वृत्तपत्राने गेल्या वर्षी ‘ग्रेटर न्यू यॉर्क सिटी’ पुरवणी बंद केली.

अशाही स्थितीत आशेचा किरण आहे. “Politico New York” हे तुलनेने नवे प्रकाशन पे वाल वर महागडे असूनही लोकप्रिय होतेय. त्याचे मुख्य कारण आक्रमक पत्रकारिता! राजकारण, सरकारी धोरणाबाबत लोकांना हवे असलेले सडेतोड लिखाण. याशिवाय रिअल इस्टेट व आरोग्य यावर त्यांचा भर आहे. “Texas Tribune” हे दैनिक अत्यंत काटकसरीने अवघ्या 50 जणांच्या स्टाफवर टेक्सास प्रांताचे मुखपत्र म्हणून लोकप्रिय ठरलेय. अनावश्यक खर्चाला कात्री, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कोणत्याही विषयावर सखोल, विश्लेषणात्मक, परिपूर्ण आणि आक्रमक शैलीत लिखाण हे या दैनिकाच्या लोकप्रियतेत भर घालते. राजकीय लिखाण व राजकारण्यांचा, सरकारी धोरणांचा समाचार यामुळे हे दैनिक इतर प्रतिस्पर्धी मिळमिळीत दैनिकांपेक्षा वाचकांना आजही भावतेय. न्यू यॉर्क सारख्या श्रीमंत शहरातच आता त्या शहराच्या समस्या मांडणाऱ्या माध्यमांना स्थान उरलेले नाही. वाचकांच्या मानसिकतेनुसार, पत्रकारिता जगभर बदलत चाललीय. त्यात समस्यांना स्थान उरलेले नाही. “आक्रमक लिखाण” आणि “स्पष्ट, सडेतोड भूमिका” आजही स्पर्धेत तुम्हाला इतरांपासून वेगळे उभे करून उंचीवर नेते. जगभरात पत्रकारितेचा फोकस लोकल नव्हे ग्लोबल होत असताना आम्ही नेमके कुठल्या मार्गावर जावे?

वरिष्ठ पत्रकार विक्रांत पाटील यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.

http://bit.ly/DNAInfoNY

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here