नवी दिल्लीः देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती असून माध्यमांची गळचेपी केली जात आहे असे आरोप विरोधी पक्ष आणि पत्रकार संघटना करीत असल्या तरी अरूण जेटली यांना मात्र हे मान्य नाही.ते म्हणतात,सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात इलेक्टॉनिक माध्यमं आहेत,त्याचबरोबर प्रिंन्ट आणि डिजिटल माध्यमं देखील आहेत.म्हणजे तांत्रिकदृष्टया आपल्याकडं अनेक माध्यमं आहेत.अशा स्थितीत माध्यमांवर सेन्सॉरशीप लादणं तर शक्यच नाही माध्यमांवर दबाव आणणं देखील अशक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात जेटली बोलत होते.माध्यमांची मुस्कटदाबी होतेय हा आरोप देखील त्यांनी फेटाळून लावला.

LEAVE A REPLY