सांगली जिल्हा परिषद ,राज्यातील पत्रकारांबरोबर..

0
670

सांगली जिल्हा परिषद ,राज्यातील पत्रकारांबरोबर..

सांगली जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा लगेच करावा आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन दिली जावी अशी राज्य सरकारला विनंती करणारा ठराव संमत झाला आहे.सदस्या आशाताई खरमाटे यांनी हा ठराव मांडला.त्यास अध्यक्षा स्नेहल पाटील आणि उपाध्यक्ष ऱणजित पाटील यांनी पाठिंबा दर्शवत तो ठराव एकमताने संमत केला गेला.पत्रकारांच्या प्रश्‍नाची दखल घेत अशा पध्दतीचा ठराव करणारी सांगली जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद आहे.हा ठराव मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न कऱणारे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद.समाज आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची सहानुभूती पत्रकारांना मिळत आहे असा मेसेज या ठरावातून जाऊ शकतो आणि सरकारवर दबाव वाढू शकतो.राज्यातील अन्य जिल्हा संघांनी आपआप्लय क्षेत्रातील जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमधून असे ठराव संमत व्हावेत यासाठी प्रयत्न कऱण्याची गरज आहे.पत्रकारांच्या हक्काची ही लढाई सर्व पातळ्यांवरून लढावी लागेल.उद्या मी सांगलीत आहे.आता निवडणुका आहेत,कोणीही विरोध करू शकणार नाही.असे ठराव झाले तर आपल्या चळवळीला अधिक बळ मिळू शकेल.शिवाय उद्या कोर्टात जायची वेळ आली तर ते आपल्याला सपोर्टींग होऊ शकेल.मी सांगलीकर पत्रकारांना धन्यवाद देणार आहेच.सांगली जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि ठराव एकमुखाने संमत करण्यासाठी मदत करणार्‍या सर्व सदस्यांचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मनापासून आभार.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here