सिने अभिनेता सलमान खानवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मुंबईतील छायाचित्रकारांनी घेतला आहे.गेल्या शुक्रवारी सलमान खानच्या एका प्रमोशनच्या वेळेस त्याच्या सुरक्षा रक्षकांनी फोटोग्राफर्स बरोबर अरेरावी केली होती.आता छाया चित्रकारांचं म्हणणं आहे की,सलमान खानने माफी मागावी.असं झालं नाही तर 25 तारखेला रिलीज होणाऱ्या त्याच्या कीक च्या प्रदर्शनाच्या वेळेसही सलमानचा एकही फोटो आम्ही काढणार नाही.सोमवारी आमच्या संघटनेने हा निर्णय घेतल्याचे छायाचित्रकारांचे म्हणणे आहे.
फोटो ग्राफर्सना पाठिंबा
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नेहमीच छायाचित्रकारांच्या बरोबर राहिलेली आहे.त्यांच्या सलमान विरोधातल्या आंदोलनातही समिती फोटोग्राफर्स बरोबर आहे.छायाचित्रकार आणि पत्रकारांशी वारंवार अरेरावी करणा़ऱ्या सलमानवरील बहिष्काराचे समिती समर्थन करीत आहे.