सर्वपक्षीयांनी पत्रकारांना टाळले…

0
765

 विधानसभेसाठी तिकिटाचे वाटप करताना एखादया तरी पक्षाला पत्रकाराची आठवण येते का याची उत्सुकता होती मात्र अपेक्षे प्रमाणं कोणत्याही पक्षाला राज्यातील कोणत्याही पत्रकाराची आठवण झालेली नाही हे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून आले.

लोकसभा निवडणुकीत टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे अनेक लोकप्रिय चेहरे निवडणुकीच्या मैदानात दिसले होते.त्यातील बहुसंख्य पत्रकारांना आपने उमेदवारी देण्याची हिंमत दाखविली होती.मात्र महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षानं एकाही पत्रकाराला उमेदवारी दिल्याचे दिसत नाही.हरियाणात अपवाद फक्त जगदीश यादव यांचा आहे.हरियाणा लोकहित पार्टीने यादव यांना उमेदवारी दिली आहे.प्रामाणिक आणि निःपक्ष पत्रकार अशी प्रतिमा असलेल्या यादव यांनी आपला प्रचार देखील सुरू केलाय.त्याचं काय होतंय ते निकालाच्या वेळेस कळेलच.महाराष्ट्रात मात्र अपवाद म्हणून देखील एकाही पक्षानं पत्रकाराला उमेदवारी दिलेली नाही.,पत्रकारांना लोकांचे प्रश समजत नाहीत असं राजकीय पक्षाना वाटतं की,पत्रकारानी विधानसभेत सदस्य म्हणून येताच कामा नये यावर सर्वपक्षीय एकमत झालेलं आहे कळायला मार्ग नाही पण पत्रकारांना मात्र सर्वच पक्षांनी कटाक्षानं टाळलेलं आहे.सर्व़पक्षीय उमेदवारांची यादी बघता त्यात डॉक्टर आहेत,इंजिनिअर आहेत,माजी सनदी अधिकारी आहेत मात्र अपवाद म्हणून देखील एकही पत्रकार दिसत नाही.पूर्वी विधानसभेत किंवा परिषदेत एखादा पत्रकार तरी असायचा मात्र अलिकडे बऱ्याच दिवसात अनेकादा पत्रकारांना चॉकलेट देऊनही त्यांना आमदार केलं गेलेलं नाहीय, मध्यंतरी औरंगाबाद येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात पत्रकारांसाठी विधान परिषदेवर जाता यावे यासाठी वेगळा मतदार संघ ठेवण्याचा एक ठराव काही पत्रकार मित्रांनी आणला होता त्याला मी विरोध केला कारण असं झालं तर तिथं पत्रकार दिसणार नाहीत तर न लिहिणारे मालकच तो मतदार संघ काबिज करून बसतील हे नक्की.नंतर हा ठराव बारगळला. मात्र सभागृहात विविध क्षत्रातील अभ्यासूंचं प्रतिनिधीत्व असावं अशी घटनाकारांची अपेक्षा होती ती भाईभतीजावाद आणि आपल्या भानगडी बाहेर येऊ नयेत याची काळजी घेणाऱ्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी फोल ठरविली आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here