“सकाळ’चे पाठक यांच्यावर हल्ला

0
780

“सकाळ’चे पाठक यांच्यावर हल्ला
शिवीगाळ करीत बेदम मारहाण
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. 22 : दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. प्रशांत सुभाष पवार (वय 26, रा. 660, दक्षिण कसबा, चौपाड, सोलापूर) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात उभे केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

श्री. पाठक शुक्रवारी रात्री 11.45 वाजता रोजच्याप्रमाणे कार्यालयीन काम संपवून घरी जात होते. चौपाड येथील बागेवाडीकर हॉस्पिटलसमोर रस्त्यावरील कुत्री भुंकत असल्याने त्यांना हुसकावून लावत असताना तेथे कट्ट्यावर बसलेल्या प्रशांत पवार याने विनाकारण श्री. पाठक यांची गाडी अडविली. त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच धमकी देत बेदम मारहाणही केली. यामध्ये त्यांच्या नाकावर, गळ्यावर जखम झाली आहे. याबाबत त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक डी. एच. करंडे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here