कोल्हापूर- महाराष्ट्रातील पत्रकारावर सातत्यानं होत असलेले हल्ले,देण्यात येणाऱ्या धमक्यांना पायबंद घालण्यासाठी राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर करावा अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबने केली आहे.
कोल्हापूरमधील तीन पत्रकारांना पर्ल्स कंपनीच्या एजंटांनी नुकतीच धमकी दिली आहे.पर्ल्सच्या विरोधात बातम्या द्याल तर याद राखा असे पर्ल्सच्या एजंटांचे म्हणणे होते.या धमकीच्या विरोधात पत्रकारांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.काल कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले असून त्यात पत्रकार संरक्षण कायदा करावा अशीही मागणी केली गेली आहे.राज्यातील सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती संमिती कायदा करावा यामागणीसाठी लढा देत आहे.