दैनिक जागरण डॉट कॉमचे संपादक शेखर त्रिपाठी यांना अटक केली गेलीय.गाजियाबाद पोलिसांनी ही कारवाई केली.युपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर जागरणने एक्झीट पोल दिले होते.त्यामुळं आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने प्रबंध संपादक,संपादक आणि एक्झीट पोल करणारी संस्था रिसोर्स डेव्हलपमेंट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात गुन्हे दाखल कऱण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार गुन्हे दाखल झाले आणि पहिली अटक संपादक शेखर त्रिपाठी यांना झाली.हा एक्झीट पोल बिजेपीच्या बाजुनं होता.असं बोललं जातं की,मालकानं बीजेपीशी हातमिळवणी करून हा उद्योग केला.बळी संपादकाचा गेला.नेहमी जे होतं तसंच इथंही झालं.

11 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्पयातील मतदान झालं.73 जागांवर हे मतदान झालं.याच जागांचे एक्झीट पोल जागरणनं आपल्या वेबसाईटवर टाकले होते.प्रकरण अंगलट आल्यावर जागरणनं खुलासा केला.एक्झीट पोल वृत्तपत्रात दिला नव्हता.एक्झीट पोलशी संबंधित एक बातमी इंग्रजी वेबसाईटवर चुकून पेस्ट झाली.चूक लक्षात येताच ती दुरूस्त केली गेली.त्यानंतर संबंधित रिपोर्टरलाही कामावरून काढून टाकले.जागरणचा हा खुलासा पटत नाही हे उघडंय.निवडणूक आयोगालाही तो पटला नाही.त्यामुळं 15 जिल्हयात जागरण आणि एक्झीट पोल घेणार्‍या संस्थेच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.निवडणुकांचे सारे टप्पे पूर्ण होईस्तोवर एक्झीट पोल छापने किंवा दाखविणे आयोगाच्या आदर्श आचारसंहितेच्या विरोधातले कृत्य आहे.जनप्रतिनिधीत्व कायदा 1951च्या कलम 126 ए नुसार युपीतील निवडणुकांवर कोणतीही संस्था 4 फेब्रुवारी ते 8 मार्चच्या सायंकाळी साढेपाच वाजेपर्यंत एक्झीट पोल दाखवू शकत नाहीत.याकडं दुर्लक्ष करणार्यांना दोन वर्षांची कैद आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here