पत्रकारांवर कधी शारीरिक हल्ले करून ,कधी नोकर्यांवर गदा आणून ,तर कधी खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा सातत्यानं राज्यात प्रयत्न होत असतो. चंद्रपूर जिल्हयातील श्रमिक एल्गारच्या संस्थापिका परोमिता गोस्वामी यांचं कृत्य अशाच स्वरूपाचे आहे.”परोमिता मॅडम,कुठे आहेत तुमचे 25 हजार कार्यकर्ते?” या स मथळ्याखाली एका दैनिकात बातमी आल्यानंतर संतापलेल्या पारोमिता गोस्वामी यांनी सावली येथील पत्रकाराच्या विरोधात एकाच वेळी मुल,सावली,सिंदेवाही,जिवती,पाथरी,नागभीड अशा सहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पत्रकाराचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आहे .तो निषेधार्ह आहे .एवढे दिवस राजकारणी पत्रकारांना अशा प्रकारे त्रास देत आता स्वतःला सामाजिक संघटना सजणार्या संघटनांचे पदाधिकारी तो मार्ग अवलंबत आहेत.म्हणजे वस्तुस्थिती मांडणारी बातमी ना राजकारण्यांना चालते,ना अधिकार्यांना ना स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणार्यांना.या अरेरावीचा सर्वांनी निषेध केला पाहिजे.यात एकआनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट अशी की,चंद्रपूरमधील पत्रकारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत श्रमिक एल्गारच्या परोमिती गोस्वामी यांच्या दमननीताचा निषेध केला आहे.तसेच गोस्वामी यांच्या बातम्यांवर आणि त्यांच्या कार्यक्रमावर सर्व पत्रकार संघटनांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.या शि वाय उद्या चंद्रपुरात पत्रकार मुक मोर्चा काढून या अरेरावीचा निषेध कऱणार आहेत.या लढ्यात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती चंद्रपूरच्या पत्रकारांच्या सोबत असून ज्या पध्दतीनं पत्रकारांना त्रास दिला जात आहे त्याचा निषेध करीत आहे.सामाजिक संघटनांना त्या त्या विभागातील पत्रकार नेहमीच मदत करीत असतात.अनेकदा वृत्तपत्रांमधील बातम्यांवरच अनेक संघटनांचे अस्तित्व अवलंबून असते असे असताना श्रमिकांच्या नावाने चालणार्या संघटनेने पत्रकाराच्या विरोधात हल्ला बोल करावा ही घटना दुर्दैवी आहे.