शेतकरयांचा सन्मान.. त्यांच्या बांधावर
अलिबाग : रायगड प्रेस क्लबचा एक छान आणि अभिनंदनीय, अनुकरणीय उपक्रम आहे.. बांधावर जाऊन शेतकरयांचा सन्मान करण्याचा.. रायगड मुंबईच्या जवळ आहे.. शहरीकरणाचा वेग अतिप्रचंड आहे.. शेतीचे दर आकाशाला भिडले असल्याने अनेकांनी आपली शेती विकून कुठे तरी नोकरी पत्करली.. मात्र आजही रायगडमध्ये असे असंख्य शेतकरी आहेत की, अत्यंत निधाॅराने ते शेतीत नव नवे प्रयोग करून भाताचे कोठार असलेल्या रायगडचे कोठार भरण्याचा प्रयत्न करीत आहेत.. त्यांना बळ देणं, त्यांना प्रोत्साहन देणं रायगड प़ेस क्लबला आपले कर्तव्य वाटते.. त्यामुळे गेली आठ वर्षे रायगड प्रेस क्लबच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील दोन आदर्श शेतकरयांची निवड करून त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांचा मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला जातो.. या काय॓क़मास मी चार वषे॓ॅ उपस्थित होतो. जिव्हाळा, प्रेम, आपलेपणानानं ओतप्रोत भरलेला हा काय॓क़म असतो.. मी याचा अनुभव घेतला आहे.. एक समिती तयार करून तालुका शाखेकडून नावं मागितली जातात.. त्यामुळं नावाबाबत अजून तरी वाद झाला नाही.. 2019 चा हा कायॅक़म आज जिल्हयातील पंधरा तालुक्यात एकाच वेळी संपन्न झाला.. तालुका शाखेचे पदाधिकारी बांधावर जाऊन सपत्निक शेतकरयांचा सत्कार करतात..
मला भावलेला हा सवाॅत छान उपक्रम आहे.. आम्ही सामाजिक बांधिलकी जपतो हे रायगडचे पत्रकार दाखवून देत असतात.. दोन वर्षांनी पदाधिकारी बदलतात मात्र या उपक्रमात खंड कधी पडला नाही.. एका उपेक्षित, वंचित घटकाचं पत्रकारांकडून होणारं कौतूक नक्कीच महत्वाचं आहे..राज्यात अशा उपक्रम कोठेच होत नाही हे विशेष.. रायगड प्रेस क्लबचं अभिनंदन तसंच ज्या शेतकरयांना पुरस्कार मिळाला त्या शेतकरयाचं देखील अभिनंदन आणि शुभेच्छा..
एस. एम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here