शिरूर पत्रकार संघाची 16 ला ऑनलाईन निवडणूक: देशातील पत्रकार संघटनेचा पहिलाच प्रयोग
शिरूरकर पत्रकार मित्रांनो,
असे करा ऑन लाईन पध्दतीनं मतदान...
शिरूर तालुका पत्रकार संघाची निवडणूक 16 तारखेला होत आहे.निवडणूक ऑनलाईन पध्दतीनं केली जात आहे.म्हणजे आपण घरी बसून,मोबाईलवरून आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करू शकणार आहात. एखादया पत्रकार संघाच्या निवडणुकीत ऑनलाईन पध्दतीनं मतदान घेण्याचा देशातला पहिला प्रयोग म्हणून शिरूरच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.त्यामुळे शिरूरमध्ये याबाबत कमालीची उत्सुकता आहे. निवडणुकीत कशा पध्दतीनं मतदान केलं पाहिजे याच्या काही टीप्स खाली दिलेल्या आहेत.त्यानुसार आपल्या नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरून हे मतदान करता येईल.तत्पुर्वी सर्व सदस्यांना प्रक्रिया माहिती व्हावी म्हणून 15 तारखेला चाचणी मतदान घेतले जाणार आहे.याची सर्वांनी नोंद द्यावी.
मतदान करताना पत्रकार सदस्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
1) ऑनलाईन मतदान करण्यासाठी सर्वात प्रथम आपले नाव आणि फोन नंबर मतदार यादीत नोंदविणे अनिवार्य आहे.
2) आपले नाव रजिस्टर करावे लागेल त्यासाठी लॉग इन या टॅबवर क्लीक करा
3) त्यानंतर नवीन नाव नोंदणी येथे क्लीक करा
4)नवीन नाव नोंदणीसाठी सर्व माहिती व्यवस्थित भरून जतन करा या बटनावर क्लीक करा
5) नवीन नाव नोंदणी झाल्यानंतर आपण लॉगइन करू शकता.मतदान कऱण्यासाठी आपण लॉग इन करणे आवश्यक आहे.
6) लॉग इन केल्यानंतर आपण वेगवेगळ्या पदांसाठी मतदान करू शकता.एखादया सदस्याला एखादया पदासाठी मतदान करायचे नसेल तर तो पुढे जावू शकतो.उदा.अध्यक्षपदासाठीचे उमेदवार येथे क्लीक केल्यानंतर तेथील सर्व उमेदवार दिसतील.त्यातील आपल्यास योग्य वाटेल अशा उमेदवाराच्या समोरील मतदान करा या बटनावर क्लीक करा.लक्षात ठेवा ,एकदा बटनावर क्लीक केल्यानंतर ते बटन लॉक होईल.म्हणजे पुन्हा मतदान करता येणार नाही.त्यामुळे विचारपूर्वकच बटन क्लीक करा.अशा पध्दतीन एका पदासाठीचे मतदान संपन्न होईल.
7) अशा पध्दतीनं आपणास वेगवेगळ्या पदांसाठी मतदान करता येईल.
8) जो मोबाईल क्रमांक आपण निवडणूक यंत्रणेकडे नोंदविला आहे त्याच क्रमांकावरून मतदान होऊ शकेल.एका मोबाईलवरून एका पदासाठी एकदाच मतदान करता येईल.
9) आपले मतदान पूर्णपणे गुप्त राहिल याची काळजी घेतली गेली आहे.
10) या मतदान पध्दतीबद्दल काही शंका असतील तर पंधरा तारखेला चाचणी मतदानाच्या वेळेस आपण शंका विचारू शकता.त्याचे निरसन सबंधित तज्ज्ञ करतील.
11) संपूर्ण देशात पत्रकार संघाची निवडणूक ऑनलाईन घेण्याचा बहुमान शिरूरला मिळत आहे.याचा आपणासर्वांना अभिमान आहे.याची परिषदेच्या इतिहासात नोंद होणार आहे.
निवडणूक यंत्रणा पुणे जिल्हा पत्रकार संघ,पुणे