विरोधात बातम्या छापल्याचा राग मनात धरून पैठणचे नगराध्यक्ष दत्ता गोडे यांच्या आदेशावरून नगरपालिका कर्मचार्यांनी चक्क पैठण तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयासच कुलुप ठोकले आहे.विशेष म्हणजे मुख्याधिकारी राहूल सूर्यवंशी यांना अंधारात ठेऊन ही कारवाई कऱण्यात आल्याने पैठणचे पत्रकार संतप्त झाले आहेत.पैठण येथील शिवाजी चौकातील संत एकनाथ सार्वजनिक वाचनाल्यात नगरपालिकेने पत्रकारांना कार्यालयासाठी जागा दिली होती.दहा वर्षापासून ही जागा पत्रकार संघाच्या ताब्यात होती.मात्र 19 तारखेला या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
पैठण शहरातील रस्ते,दूषित पाणी पुरवठा,ठिकठिकाणी सांचलेला कचरा,घाण,चिखल याबाबतच्या बातम्या विविध वर्तमानपत्रात सातत्यानं येत आहेत.शहरातील चिखलाचे ,घाणीचे सामा्रज्य दूर करण्याऐवजी नगराध्यक्षांनी थेट पत्रकारांचाया कार्यालयासच कुलुप लावले आहे.मुख्याधिकार्यांनी या संबंधात कानावर हात ठेवले असून मला या कारवाईची माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.या घटनेचा औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे.माध्यामांचा आवाज बंद करण्याचा या कृत्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनेही निषेध केला आहे.विरोधात बातमी आली की,कधी हल्ले करून,कधी नोकर्यांवर गदा आणून तर कधी कार्यालयांना कुलुपं ठोकून बदला घेतला जात आहे.याचा निषेध केला पाहिजे.