फ्रान्सचा टेनिसपटू मॅक्सिम हैमू याच्यावर सध्या जोरदारा टीका होत आहे. कारण चालू कार्यक्रमादरम्यान त्याने एका महिला पत्रकाराचे तिच्या इच्छेविरोधात चुंबन घेतले. तसंच तिला जवळ ओढत तिच्याशी असभ्य वर्तन करण्याचादेखील प्रयत्न केला. तेव्हा महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याचं निलंबन करण्यात आलं असून त्याला फ्रेंच ओपनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

सोमवारी झालेल्या सामन्यात मॅक्सिमचा पराभव झाला होता. त्यानंतर युरोस्पोर्टची पत्रकार मेली थॉमस मॅक्सिमची मुलाखत घेण्यासाठी गेली होती. या मुलाखती दरम्यान चालू कार्यक्रमातच त्याने मेलीशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम सुरू असल्याने मेली अक्षरश: हतबल होती. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला असतानाही मॅक्सिमने तिचं जबरदस्ती चुंबन घेतलं, तसंच तिला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. मॅक्सिमचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनीही त्याच्यावर कडाडून टीका केलीय. आपल्यासोबत मॅक्सिमने जे काही केलं ते अत्यंत वाईट होतं, जर कार्यक्रम लाइव्ह नसता तर मी नक्कीच त्याला चांगलाच धडा शिकवला असता अशी प्रतिक्रिया मेलीने दिली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर फ्रेंच ओपनचे आयोजक रोनाल्ड गॅरोस यांनी मॅक्सिमला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती दिली आहे.

लोकसत्तावरून साभार 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here