पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पत्रकारामंध्ये संरक्षण कायद्याच्या बाबतीत सर्वदूर जागृती निर्माण झालेली असून अनेक संघटना आता पुढे येत आपआपल्या परीनं हा लढा पुढं नेत आहेत.आज काही संघटना राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत तर काही संघनटांनी आज आझाद मैदानावर बनेन आंदोलन सुरू केलं आहे.सर्वांचा उद्देश पत्रकाराना संरक्षण देणारा कायदा व्हावा हाच असल्याने आम्ही या सर्व संघटनांच्या प्रयत्नांचे स्वागत करीत असून या संघटनांच्या आंदोलनासही पाठिंबा देत आहोत.सर्व ठिकाणाहून वेगवेगळ्या पध्दतीनं प्रयत्न होत राहिले पाहिजेत अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे.वसई-विरार प्रेस क्लबच्या अनोख्या आंदोलनाचंही आम्ही समर्थन करीत आहोत.