उपक्रमशीलता रायगड प्रेस क्लबचा स्थायीभाव आहे.सातत्यानं नव-नवे उपक्रम या संस्थेच्यावतीने राबविले जातात.सध्या रायगड प्रेस क्लबच्यावतीने संवाद अभियान आयोजित केलं गेलंय.या अभियानांतर्गत प्रेस क्लबचे पदाधिकारी जिल्हयातील वेगवेगळ्या तालुक्यांना भेटी देऊन तेथील सदस्यांशी संवाद साधत आहेत,त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत,काही समज-गैरसमज असतील तर त्याच्यावर चर्चा करीत आहेत.प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष विजय मोकल यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आणि उत्तर रायगडात हे अभियान राबविले जात आहे.रायगड प्रेस क्लबच्यावतीने येत्या 31 जानेवारी रोजी मुरूड जंजिरा मुक्ती दिन साजरा केला जात आहे.तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात क्रिकेट सामने होणार आहेत.त्याची देखील तयारी केली जात आहे.मार्चमध्ये प्रेस क्लबचा वर्धापन दिन दणक्यात साजरा केला जातो त्याची तयारीही सध्या या अभियानाच्यानिमित्तानं केली जात आहे.

संवाद अभियाना अंतर्गत जिल्हा अध्यक्ष तथा पेण तालुका दै. सागर कार्यालय प्रमुख विजयजी मोकल , कार्याध्यक्ष तथा उपसंपादक दै. कृषिवल भारत रांजणकर , सहचिटणिस तथा IBN लोकमत वृत्तवाहिनी चे रायगड जिल्हाप्रतिनिधि मोहन जाधव यांचे आज रोहयात आगमन झाले.यावेळी त्यांचे स्वागत करताना जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव व जिल्हा सहचिटणिस शशिकांत मोरे सोबत ज्येष्ठ पत्रकार अरुण करंबे , मिलिंद अष्टिवकर, जितेंद्र जोशी , रामनरेश कुशवाह , अल्ताफ चोरढेकर, महेश बामुगड़े , सचिन शेडगे , विषु लुमण , नंदकुमार मरवड़े , उदय मोरे आदि…

रोहयात संवाद अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला , यावेळी प्रेस क्लब पदाधिकारी व सदस्यांशी सुसंवाद साधला गेला. अनेक विषयांवर विचार- विनिमया बरोबर आगामी कार्यक्रमांबाबत चर्चा ही करण्यात आली.

*विश्वजीत लुमण यांचा सन्मान*

रायगड जिल्हा पत्रकार संघाचा यंदाचा बेस्ट फोटोग्राफर पुरस्कार नुकताच अलिबाग येथिल पत्रकार दिन कार्यक्रमात विश्वजीत लुमण यांना मिळाल्याने प्रेस क्लब जिल्हा कमिटी कडून विश्वजीत लुमण यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here