सुनील तटकरे बिनधास्त

0
789

रायगड हा कॉग्रेसचा परंपरागत मत दार संघ.इ थं नेहमीच कॉग्रेस विरूध्द शेकाप अशी लढत झालेली आहे.इतिहासात डोकावले असता आपणास दिसेल की, रायगडच्या मत दारांनी19 52 ते1984 या काळात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत एकदा कॉग्रेसला आणि एकदा शेकापला संधी दिलेली आहे.1989मध्ये अ.र.अंतुले यांनी ही परंपरा खंडित करीत सलग तीन निवडणुकीत म्हणेज 89,91 आ़िण 1996 मध्ये रायगडवर वर्चस्व प्रस्थापित केले.1998आणि 1999मध्ये पुन्हा शेकापच्या रामशेठ ठाकूर यांनी रायगडमधून विजय संपादन केला.त्यानंतर 2004मध्ये कॉंग्रेसचे अंतुले पुन्हा विजयी झाले.2009मध्ये मात्र शिवसेनेच्या अनंत गीते यांनी अंतुलेंचा पराभव करीत रायगडावर भगवा फडकविला.हा सारा इतिहास पाहता बदल हा रायगडच्या मत दारांचा स्थायीभाव आहे हे आपणास दिसेल.हा निकष लावला तर यंदाही बदल अपेक्षित आहे.केवळ इतिहासाचाच दाखला देण्यात अ र्थ नाही तर बदलाची इ तरही काही कारणं आहेत.गेल्या वेळेस अनंत गीतेंच्या विजयाला शेकापच्या सहकार्याची मोठी किनार होती.रायगड लोकसभा मत दार संघात जिल्हयातील जे चार विधानसभा मत दार संघ आहेत त्यातील पेण आणि अलिबाग हे विधानसभा मत दार संघ आज शेकापकडे आहेत.श्रीवर्धन राष्ट्रवादीकडे तर महाड शिवसेनेकडे आहे.रत्नागिरीमधील गुहागर राष्ट्रवादीकडे आणि दापोली शिवसेनेकडे आहे.म्हणजे शेकाप,सेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाकडे रायगड लोकसभा मत दार संघातील प्रत्येकी दोन विधानसभा मत दार संघ आहेत.2009मध्ये शेकाप आणि शिवसेना मिळून चार विधानसभा मत दार संघ होते.याचा फटका कॉग्रेसला बसला.अनंत गीत ेयांनी 53.89 टक्के म्हणजे 1 लाख 46 हजार 521 मतांनी अंतुलेंवर मात केली होती.2009मघ्ये शेकापचा उमेदवार नव्हता.पण त्याअगोदर 2004मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यात शेकापला अडिच लाखांच्यावर मते मिळाली होती.तेव्हा गुहागर आणि दापोली रायगडला जोडला गेलेला नव्हता आणि पनवेल -उरणही रायगडात होता त्यामुळं शेकापला जास्त मतं पडली असा त र्क लढवला गेली तरी पेण आणि पनवेलमध्ये शेकापची हक्काची पन्नास साठ हजार मतं आहेत.श्रीवर्धनमध्ये पंधरा ते वीस हजार मतं आणि महाडमध्ये दहा बारा हजारमतं धरली तरी ही सारी मतं दीड लाखांच्या घरात जातात.यावेळेस म्हणजे 2014मध्ये शेकापचा युतीला पाठिंबा नसल्याने ही सारी विजयी मतं अनंत गीते यांना मिळणार नाहीत.म्हणजे अनंत गीते यांचं तेवढं मताधिक्य कमी होणार आहे.अनंत गीते यांची दीड लाख मतं जर कमी झाली तर ते धोक्यात आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही.शिवसेनेतील अंतर्गत वादाचा फटकाही अनंत गीते यांना बसणार आहे.

– शेकाप यावेळेस युतीबरोबर जात नाही हे लक्षात आल्यानंतर सुनील तटकरे यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली हे स्पष्ट आहे.वस्तुतःप्रारंभी सुनील तटकरे निवडणूक लढवायला फारशे उत्सुक नव्हते पण मत दार संघातील बदलती राजकीय समीकरणं पाहून त्यांनी निवडणूक लढविण्यास होकार दिला. – शिवसेना आणि शेकाप एकत्र नसतील तर मत विभाजनात फायदा आपलाच आहे हे तटकरे ओळखून आहेत.त्यामुळं त्यांनी हे धाडस केलं आहे.ते करताना त्यांनी कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांशीही जुळवून घेतलेलं दिसतंय.माणिक जगताप आणि सुनील तटकरे यांचा छत्तीसचा आकडा आहे.महाडमध्ये झालेल्या पराभवात तटकरे यांचा मोठा वाटा असल्याचा आरोप माणिकराव करीत असतात.परंतू यावेळेस परिस्थितीच अशी आहे की,माणिकराव प्रामाणिकपणे सुनील तटकरे यांना मदत करतील असे म्हणायला वाव आहे.कारण तटकरे यांच्यावरील प्रेमापेक्षा त्यात त्यांना आपला स्वार्थ दिसतो आहे.सुनील तटकरे जर दिल्लीत गेले तर आपला जिल्हयातील एक प्रबळ प्रतिस्पर्धी दूर होईल आणि पाच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणे शक्य होईल असे माणिकरावांना वाटते.विधानसभेत सुनील तटकरे यांनी माणिक जगताप यांना मदत करावी असेही ठरलेले असू शकते.तिकडे अलिबाग आणि पेणमध्येही अनुक्रमे मधु ठाकूर आणि रवी पाटील यांनाही असाच शब्द दिलेला असू शकतो.त्यामुळे ही कॉग्रेसची नेते मंडळी सुनील तटकरे यांना मदत करील असेच आजचे चित्र आहे.कॉग्रेसला तिकीट न मिळाल्याने जे तथाकथित नाराज आहेत त्यांना राजी कसं करायचं हे तटकरे यांन ा बरोबर माहिती असल्याने त्याबाबत तटकरे बिनधास्त आहेत.सुनील तटकरे यांच्यासाठी आणखी एक जमेची बाजू अशी आहे की, कॉग्रेसचे वरील तीन नेते असोत की,शेकापचे जयंत पाटील यांना सुनील तटकरे दिल्लीत गेलेलेच हवे आहेत.कारण गेली जवळपास एक तप राज्यात सत्तेवर असलेल्या सुनील तटकरेंची जिल्हयात घट्ट पकड आहे.कॉग्रेस असेल किंवा शेकाप यांना तटकरे यांनी कोठेही डोकेवर काढू दिलेले नाही.सुनील तटकरेंच्या जिल्हयावरील या एकछत्री अंमलामुळे कॉग्रेस आणि शेकापची अनेक राजकीय गणितं सतत कोलमडून पडत असतात. िएवाय या साऱ्यांचीच तटकरेंशी सामना करताना दमछाक होते हे अनेक प्रसंगात दिसून आले आहे.अशा स्थितीत पालकमंत्रीपदावरून तटकरे दूर झाले आणि ते दिल्लीत गेले तर त्यांची जिल्हयावरील पकड अपोआप ढिली होईल आणि आपली राजकीय स्वप्नं पूर्ण करायला संधी मिळेल हे मनसुबे शेकाप आणि कॉग्रेसच्या तसेच राष्ट्रवादीच्याही नेत्यांचे आहेत.रायगडात तर च र्चा अशीही आहे की,आपला स्वतंत्र उमेदवार उभा
– करण्यामागं सुनील तटकरेंची पिडा दिल्लीला जावी अशीच जयंत पाटील यांची रणनीती असल्याचे सांगितले जाते.अन्यथा शिवसेनेला शेकापनं सोडचिठ्ठी देण्याचं कोणतंच कारण दिसत नाही.शेकाप आणि शिवसेना यांची जिल्हा परिषदेत आजही संयुक्त सत्ता आहे.या सत्तेवर पाणी सोडायला ज्या अ र्थी जयंत पाटील तयार झालेत त्या अ र्थी सुनील तटकरे दिल्लीत जावेत ही त्यांची सुप्त इच्छा आहे हे नक्की दिसते.राज ठाकरे यांच्याशी सलगी कऱण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्नही त्याचाच एक भाग होता. वस्तुतः – राज ठाकरे यांच्या मनसेचा रायगडात फारसा प्रभाव नाही हे जयंत पाटील यांना माहित होते म्हणजे राज ठाकरेंना बरोबर घेतल्याने रायगडात जयंत पाटलांचा पक्ष जिकणार होता असे नाही.राज ठाकरें यांनाही जयंत पाटलांची ताकद माहिती आहे.पण जयंत पाटलांना शिवसेनेपासून बाजुला करायचे होते म्हणून राज ठाकरे यांनी जयंतरावांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला.अन्यथा ज्या शेकापला 2009च्या निवडणुकीत 1.11 टक्केच मतं मिळाली त्यांच्याबरोबर फरफट करून घेण्याएवढे राज ठाकरे अपरिपक्व राजकारणी नक्कीच नाहीत.घडलेही राज ठाकरेंना हवे असलेलेच.जयंत पाटील सेनेपासून दूर गेले.हे दूर जाणे राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडले.नव्हे तेवढ्यासाठीच केला होता अट्टाहास असे म्हणण्यासारखी स्थिती आहे.रायगडात सवतासुभा उभा कऱणे आणि मावळमध्ये लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा देणे याचे कारण राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष मदत करणे हेच आहे.कारण लक्ष्मण जगताप जरी अपक्ष असले तरी ते अजित पवारांचे उमेदवार आहेत हे लपून राहिलेले नाही.चर्चा अशीही आहे की,अजित पवारांच्या सूचनेवरूनच जयंत पाटील यांनी लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.अन्यथा शेकापचा लक्ष्मण पाटलांशी काय संबंध?म्ङणजे मावळ असो किंवा रायगड असो या ना त्या कारणांनी शेकापची मदत राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. .या सगळ्या राजकारणात जयंत पाटील यांचा कोणता राजकीय लाभ झाला याचं उत्तर त्यांच्याशिवाय अन्य कोणी देऊ शकणार नाही.विवेक पाटीलही नाही.याचं कारण निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पनवेल,उरणमध्ये वाढणार आहे आणि रायगडात रत्नागिरीचा उमेदवार दिला जाणार असल्याने पक्षाला जिल्हयात त्याचा फार फायदा होणार नाही.रत्नागिरीचा उमेदवार दिल्याने रत्नागिरीत पक्ष वाढेल असे कोणालाच वाटत नाही.कारण तिकडे शेकापला कोणी विचारत नाही. या दोन्ही भूमिकांमुळे शेकापची मतं वाया जाण्याशिवाय काहीच घडणार नाही. जयंत पाटील यांची अशीच इच्छा असेल तर त्यात ते यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.
– रायगडात आपनेही आपला उमेदवार उभा केला आहे.डॉ.संजय अपरांती यांना आपने शोधून काढले आहे.खाकी वर्दीतला माणूस कितीही सोशल असला तरी त्याच्याबद्दलची भिती कायम सामांन्य माणसाच्या मनात असते.डॉ.अपरांती यांच्याबद्दलही असेच आहे.ते काही काळ डीवायएसपी म्हणून रायगडात होते.पण नंतर त्यांना रायगडकर विसरेलीही होते.ते आता आपच्या तिकिटावर उभे आहेत.जिल्हयातील काही एनजीओंनी त्यांना पाठिंबा दिला आहे.एनजीओंची हजार दोन हजार मतं आणि आपवर विश्वास असलेल्या मध्यमवर्गींची काही मतं गृहित धरली तरी अपरांती फार मजल मारू शकणार नाहीत.त्यांच्या उमेदवारीचा तोटा सुनील तटकरेंना होईल असे कोणी बोलत असेल तर असे बोलणारे राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहेत असेच समजावे.
– रायगडातील ही सारी राजकीय स्थिती सुनील तटकरेंना अनुकूल असल्यानेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा नि र्णय घेतला.तटकरे दिल्लीत रमणार नाहीत.ते आज ना उद्या राज्यात येणारच पण त्यासाठी लोकसभा जिंकणेही आवश्यक आहे हे ते ओळखून आहेत.कोणताही पराभव राजकारण दहा वेर्षे मागे घेऊन जातो हा अनुभव विजयसिंह मोहिते पाटलांसह अनेकांना असल्याने सुनील तटकरे सावध होते.गेला महिनाभर त्यांनी सारी चाचपणी केल्यानंतर आणि सारे डाव आपल्याला अनुकूल पडत आहेत असे लक्षात आल्यावर सुनील तटकरेंनी पक्षश्रेष्ठींना होकार कळविला आणि आता त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.निवडणुका लढविण्याचा त्यांचा अनुभव लक्षात घेता ते कधीच गाफिल राहात नाहीत.यावेळेसही त्यांना त्यांच्या राजकीय कौशल्याचा लाभ होणार हे नक्की.राहिला प्रश्न त्यांच्यावरील सिंचन घोटाळ्यातील आरोपांचा.त्याचा जिल्हयातल्या मत दारांवर काही फरक पडेल असे वाटत नाही.शिवाय त्यांच्यावर झालेल्या आरोपांची उजळणी ना शेकाप करेल,ना आप.त्यामुळे ते आरोपही कळीचा मुद्दा ठरतील असा कोणाचा त र्क असेल तर तो देखील खोटा ठरण्याचीच शक्यता आहे.म्हणजे सुनील तटकरेंचे पारडे नक्कीच जड असणार हे स्पष्टय.
एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here