रायगड जिल्हयात 1 जून नंतर गेल्या 24 दिवसात सरासरी 823.70 मिली मिटर पाऊस झाला आहे. पावसानं जून महिन्यातील सरासरी ओलांडली आहे.वेळेत आणि भरपूर पाऊस झाल्यानं शेतक र्याने पेरणीची कामे पूर्ण केली असून भाताची रोपे सर्वत्र डोलताना दिसायला लागली आहेत.या वर्षी जिल्हयात 1 लाख 15 हजार 98 हेक्टरवर भाताची लागवड झाली असून 5 हजार 68 हेक्टरवर नाचणीची लागवड झालेली आहे.पावसामुळं पिकं चांगली असल्यानं शेतकरी वर्ग आनंदीत आहे.गत वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस झाल्याने जिल्हायतील सावित्री,कुंडलिका,आंबा,पाताळगंगा,गाढी,उल्हास या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून दोन दिवसांपुर्वी गांधारीला आलेल्या पुलामुळे रायगड किल्याकडे जाणार्या नाते सह अन्य गावांचा संपर्क तुटला होता.सतत कोसळणार्या पावसामुळे अलिबागमध्ये एक इमारत खचली असून नेरळमध्ये एका घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाज जणांना ठार झाले आहेत.पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळास भेट देऊन मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना एकूण 20 लाखांची मदत दिली आहे.रायगड जिल्हयात दरडी कोसळण्याचा धोका असलेली 84 गावं असूून या गावांमधील जनतेने सावध राहण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.जिल्हयात नदीच्या काठावर 257 गाव आहेत,समुद्राच्या काठावर 53 आणि खाडीच्या मुखावर 72 गावं असून या धोकाप्रवण गावातील जनतेनंही सावध राहावं अशी सूचना प्रशासनाच्यावतीं कऱण्यात आली आहे.संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हयात आपत्ती नियंत्रण व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून कोणत्याही अधिकार्याने वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे.