अमळनेर ः कोरानानं बळी गेलेल्या पत्रकारांची राज्यातील संख्या आता 68 झाली आहे.अमळनेर येथील पत्रकार संजय मरसाळ यांचा कोरोनानं बळी घेतल्याची बातमी हाती आली आङे.कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर संजय मरसाळ यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होेते.मात्र तेथे त्यांची कोरोनाशी झुंज अयशस्वी ठरली.त्यांचं निधन झालं.सामाजिक बांधिलकी जपत लिखाण करणार्‍या संजय मरसाळ याचं निधन सर्वांसाठीच धक्का देणारं ठरलं.शासनाने या कोरोना योध्दयाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक पत्रकार तसेच मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.कोरोनानं बळी जाणार्‍या पत्रकारांची संख्या दररोज वाढत असताना सरकार कसलीच भूमिका घेत नसल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.मयत पत्रकारांच्या नातेवाईकांना तातडीने किमान पाच लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here