महाराष्ट्रात आज दोन पत्रकारांचे अकाली निधन झाले. परभणी येथील झी -24 तासच्या जिल्हा प्रतिनिधी कल्पना मुंदडा यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.दुसरी घटना रायगड जिल्हयातील रसायनीची.येथील तरूण पत्रकार चंद्रकांत जाधव यांचे एका अपघातात निधन झाले आहे.
कल्पना मुंदडा यांचं वय अवघ 37 वर्षाचं होतं.ह्रदयविकारासाठी आता वयाचं बंधन राहिलं नाही हे जरी खरंंंंं असलं तरी पत्रकारांच्या आयुष्यातील धावपळ,दगदग,कामाचा ताण,वेगवेगळे तणाव आणि अवेळी जेवण आणि प्रकृत्तीकडे होणारे दुर्लक्ष यासाऱ्या प्रकारामुळे विविध व्याधी पत्रकारांना कमी वयातच जडल्या जातात.त्यातून अशा घटना घडताना दिसत आहेत .या घटना आता अपवादात्मक राहिलेल्या नाहीत तर नित्याच्या होताना दिसतात.पत्रकारांच्या कामाच्या व्यापात प्रकृतीकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेऊन मध्यंतरी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आम्ही महाराष्ट्रात पत्रकार आरोगय तपासणी शिबिरांचे विविध ठिकाणी आय़ोजन केलं होतं.ज्या ठिकाणी ही शिबिरं झाली नाहीत अशा ठिकाणी ती तातडीने घ्यावित अशी माझी जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना विनंती आहे. आपली कामं महत्वाची असतातच पण काम कितीही महत्वाचे असले तरी तब्यत त्यापेक्षा महत्वाची आहे आणि आपण साऱ्यांनीच त्याची काळजी घेतली पाहिजे.काही दिवसांपुर्वी लोणावळ्यातील एक तरूण पत्रकार देखील असाच अकाली गेला होता.अशा बातम्या आता सातत्यानं येत आहेत,हे चिंताजनक आहे.सरकारनेही आता पत्रकारांच्या आरोग्याच्यादृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. कल्पना मुंदडा आणि चंद्रकांत जाधव यांना भावपूर्ण श्रध्दांतली.( एस.एम.)