सौदी अरेबियातील वॉशिग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या गायब होण्यावरून आंतरराष्ट्रीय संबंध पुन्हा ताणले गेल्याचे चित्र आहे.खाशोगी 2 ऑक्टोबरपासून उस्तंबूलमधून गायब झाले आहेत.हा विषय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गांभीर्यानं घेतला आहे.एका निवेदनात ते म्हणाले,खाशोगी गायब होण्यामागं किंवा त्यांची हत्त्या झाली असल्यास सौदीला मोठी किंमत मोजावी लागेल.संयुक्त राष्ट्र खाशोगी यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाच्या तळाशी जाईल.त्याच्या हत्येचा आदेश दिलेला असल्यास किंवा त्यांचे बरेवाईट झाले असल्यास सौदी अरेबियाला मोठ्या शिक्षेला सामोरे जावे लागेल.

LEAVE A REPLY