मुंबई-गोवा महामार्गावर टॅफिक जॅम

    0
    922

    अलिबाग – नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्यानं मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळपासूनच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.पेणनजिकच्या रामवाडी ते डोलवी गावापर्यत दुतर्फा वाहनांच्या लांबच लांग रांगा लागलेल्या दिसत आहेत.वाहतूक पोलिस वाहतूक सुरळीत कऱण्याचा प्रय़त्न करीत असले तरी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकऱणाचं काम बंद असल्यानं डायव्हर्शन्स,रस्तायवर पडलेला राडारोडा आणि रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहतूक फारच धिम्या गतीनं सुरू असल्याचे दिसून येत आहे.डोलवी ते रामवाडी हे जेमतेम 10 किलो मिटरचे अंतर कापायलाही वाहनांना तास-दिड तास लागत आहे.त्यामुळं पर्यटक त्रस्त झाले आहेत.
    दरम्यान आजचा ख्रिसमस आणि नंतर सलग दोन दिवस सुट्या असल्यानं अलिबाग,किहिम,आक्षी आदि समुद्र किनारे पर्यटकांनी भरले आहेत.शहरातील हॉटेल्सही हाऊसफुल्ल झाले आहेत.आजच अलिबाग महोत्सवाचे उद्धघाटन होत असल्यानं पेण-अलिबाग रस्त्यावरील वाहणांची वर्दळ वाढली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here