माथेरान – अद्ययावत तारांगण उभे रहातेय

    0
    886

    खगोल अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार

    मुलभूत नागरी सुविधा पुरविणे हे नगर परिषदेचे मुख्य काम पण जर माथेरान सारखी पर्यटन नगर परिषद असेल तर निच्छितच नागरिक आणी पर्यटकांच्या अपेक्षा वाढतात . गेल्या साडेतीन वर्षात कम्युनिटी सेंटर , तबेला , प्राथमिक शाळेची इमारत, कोतवाल रोड आणी रिगल नाका येथील रस्ते , प्रेक्षणीय स्थळांकडे जाणार्या रस्त्यांची दुरुस्ती , स्मशान भूमीचे सुशोभीकरण , डीझेल शव दाहीनीची उभारणी अशी अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत . अजूनही खूप कामे बाकी आहेत . मात्र आज अवकाश निरीक्षण केंद्राचे काम पहिले आणी समाधान वाटले . कोणतेही काम करताना करणार्यांना समाधान वाटणे आवश्यक आहे . खगोल शास्त्राचे गाढे अभ्यासक अशी सोमण साहेबांची ओळख आहे . तत्कालीन जिल्हाधिकारी जावळे साहेब यांचे सहकार्य आणी सोमण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे अवकाश निरीक्षण केंद्र उभे रहात आहे . जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे . मात्र कोणतेही काम अपूर्ण राहू नये याची काळजी घेतली जात आहे . जनरेटर , स्वच्छता गृह , संरक्षक कठडे अशी कामे बाकी आहेत . रात्री आकाश दर्शनासाठी दुर्बिणीसाठी डोम बनविण्याचे काम राजस्थान मध्ये सुरु आहे . आक्टोबर १५ पर्यंत डोम आणी अन्य कामे पूर्ण होतील . या अवकाश निरीक्षण केंद्राचे पुढील व्यवस्थापना बाबतचा निर्णय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतला जाईल आणी एक वैशिष्ट्य पुंर्ण उपक्रम पर्यटकांसाठी खुला होईल . माथेरानच्या पेमास्तर पार्क येथे हे अद्ययावत अवकाश निरीक्षण केंद्र उभे राहत आहे . येथे ग्रह तारे यांची माहिती देणारे एक प्रदर्शन कायम स्वरूपी असेल , तसेच एकाच वेळी पन्नास जणांना रात्री आकाश निरीक्षण करता येईल अशी व्यवस्था असेल . याशिवाय ३५ जन बसू शकतील असे वातानुकुलीत अद्ययावत थ्री डी थीएटर उभारण्यात आले आहे . या ठिकाणी पर्यटकांना सशुल्क अवकाशाची आणी ग्रहताऱ्यांची माहिती देणारे शॉर्ट फिल्म दाखविल्या जातील . पर्यटकांसाठी हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम ठरणार असून या मुळे माथेरानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. हे काम करणारे श्री . संसारे आणी नगरपरिषदेच कनिष्ठ अभियंता देवेद्र मोरखंडीकर यांचे देखील मनापासून अभिनंदन .

    ” पर्यटन स्थळी उभारलेले देशातील पहिले अवकाश निरीक्षण केंद्र –
    खगोल अभ्यासाचे आणी माहिती देणारे केंद्र सुरु करणारी माथेरान नगरपरिषद हि महाराष्ट्रातील पहिली नगर पालिका असून देशात आज पर्यंत कोणत्याही पर्यटन स्थळी असे अद्ययावत केंद्र नाही . त्यामुळे माथेरान या पुढे पर्यटनाबरोबर खगोल अभ्यासाचे केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण करेल . हा प्रकल्प इतर अनेक नगर परिषदांसाठी मार्गदर्शक आहे ” .
    -दा कृ सोमण

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here