टाइम्सच्या बातमीनं खळबळ

0
986

पत्रकारिता,शिक्षण,न्यायव्यवस्था,आणि वैद्यकीय क्षेत्र अशी आहेत की,या क्षेत्रात कायर्रत असलेल्यांकडून समाजाच्या आजही काही अपेक्षा आहेत.या क्षेत्रातील मंडळींकडून समाज उच्च नैतिकता आणि शुध्द चारित्र्याची अपेक्षा करीत असतो.समाजाच्या अपेक्षा चुकीच्या आहेत असं मलाही वाटत नाही.मात्र या क्षेत्रांच्या पावित्र्यालाच कलंक लावणारी काही मंडळी यासवर्च क्षेत्रात आलेली असल्यानं ही क्षेत्रंही हल्ली चचे्चा विषय होताना दिसत आहे.या पवित्र क्षेत्रातून येणाऱ्या बातम्या या क्षेत्राची जनमानसातील प्रतिमा नक्कीच मलिन करणाऱ्या आहेत.आम्ही पत्रकारांच्या हिताची भाषा करीत असलो तरी पत्रकारांबद्दल हल्ली कोणीच चांगले बोलत नाही हे वास्तव आहे.वैद्यकीय व्यवसायातल्या लोकांनी या क्षेत्राला धद्याचं स्वरूप आणलं आहे.शिक्षण क्षेत्राची तर पुरतीच वाट लागलीय.न्याय व्यवस्थेबद्दल आता आदर बाळगावा अशी स्थितीही उरलेली नाही.काही दिवसांपुवीर् उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या बढत्यासाठी काय काय चालते हे न्या.माकर्न्डेय काटजू यांनी जगासमोर आणंलं.अनैतिक मागार्ंनी ज्या न्यायाधीशांनी बढत्या मिळविलेल्या आहेत त्यांच्याकडून निःपक्ष न्यायदानाची अपेक्षा सवर्था चुकीचीच ठरेल.आजच्या टाइम्स आॅफ इंडियानं ग्वालेरच्या हायकोटर् जेज्जनं अ्रडिशनल डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट असलेल्या एका महिला न्यायाधीशाशी कशा पध्दतीनं लगट करण्याचा प्रयत्न केला याची सविस्तर हकिकत दिली आहे.ती न्यायव्यवस्थेबद्दलच्ाय आदराला तिलांजली देणारी आहे. महिला न्यायाधीशाने भारताच्मुया ख्य न्यायमूतीर्ंना पाठविलेल्या तक्रारीत उच्च न्यायालयातील एका न्यायमूतीर्ंना आपल्या घरच्या काय्रक्रमात अॅटम साऍंगवर डान्स करावा असा आग्रह धरला होता असं म्हटलं आहे.तसेच महिला न्यायाधीशानं एकटीनं आपल्या घरी यावं असं वारंवार सांगितलं गेलं होतं.हे एवढंच नव्हे तर हे मान्य न केल्यास तुमच्या करियरची मी वाट लावू शकतो अशी धमकीही महिला न्मूतीर्ला दिली गेली होती. महिला न्यायाधीशानं त्यानंतरही उच्च न्यायालयातील या न्यायमूतीर्च्या मागणीला दाद न दिल्यानं त्यांची बदली दूर रिमोटमध्ये केली गेली.मुलंाच्या शाळा सुरू असल्यानं अशी बदली करता येणार नाही असं सांगूनही ही बदली केली गेली.त्यामुळं या सव त्रासाला कंटाळून आता संबंधित महिला न्यायमूतीर्ंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.शिवाय चीफ जस्टीस आॅफ इंडियाला पाठविलेल्या पत्रात त्यांनी ही सारी माहिती दिली आहे.गंमत अशी की,या महिला न्यायमूतीर् जिल्हा विशाखा समितीच्या अध्यक्षा आहेत.ही समिती महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी काम करते.आता सीजे यावर काय भूमिका घेतात हे पहायचे.मात्र ही बातमी न्यायव्यवस्थेचं शुध्दीकरण करण्याची गरज दाखवून देणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here