मुंबईः शिवसेनेने संजय राऊत यांना खासदार केले,कॉग्रेसने आता कुमार केतकर यांना खासदार केले आता भाजपही राज्यातील एका पत्रकाराला खासदार करणार असल्याची बातमी आहे.यासाठी अनेक इच्छुक पत्रकारांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे बोलले जाते.
पत्रकारांमध्ये भाजपच्या विरोधात मोठी लॉबी कार्यरत असल्याची चर्चा आहे.त्यामुळं या वर्गाला शांत करण्यासाठी आणि विरोधाची धार कमी कऱण्यासाठी कॉग्रेस प्रमाणेच भाजपने एक मराठी पत्रकार राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील सर्वात कडव्या विरोधक पत्रकाराचा आवाज त्याला खासदारकी देऊन बंद कऱण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.त्यासाठी चॅनलच्या एका माजी संपादकाचे नाव आघाडीवर आहे.सरकार पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करीत नाहीत,पेन्शचा प्रश्‍न सोडवत नाही,मजिठिया आणि छोटया पत्रांच्या प्रश्‍नावरही सरकार गप्प आहे त्यामुळं पत्रकारांमध्ये सरकारबद्दल मोठी नाराजी आहे अशा स्थितीत एका ज्येष्ठ पत्रकाराला खासदार करून पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याचा सरकार प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.
एका पत्रकाराला खासदार करून भाजप सार्‍या मिडिया मिंधे करू शकत नसल्याची प्रतिक्रिया पत्रकार चळवळीतील एका कार्यकर्त्यानं व्यक्त केली आहे.राज्यसभेची लॉटरी कोणत्या पत्रकाराला लागते ते लवकरच कळणार आहे.(Af)
 
 
 

LEAVE A REPLY