मराठी पत्रकार परिषदेच्या लढ्याला आणखी एक यश

1
877

मराठी पत्रकार परिषदेच्या लढ्याला आणखी एक यश 

महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी योजनेत पत्रकार,

आणि त्याच्या कुटुंबियांचा समावेश,काल जीआर निघाला

त्रकारांच्या हक्कासाठी लढणार्‍या मराठी पत्रकार परिषदेच्या आणखी एका लढ्यास यश आलं आहे.महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत आता अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा लाभार्थी म्हणून समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंबधीचा जीआर (( रागांको-2016/प्र.क्र.64/आरोगय -6 दिनांक 8 जुलै 2016 ) सरकारने काल काढला आहे.त्यामुळे जवळपास 1100 आजारांवर आणि बहुतेक मान्यताप्राप्त रूग्णालयात,राज्यातील जवळपास 2400  अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आता 2  लाखां पर्यंत मोफत आरोग्य सेवा मिळणार आहे ज्या पत्रकारांकडे अधिस्वीकृतीपत्रिका नाही मात्र जे पत्रकार अधिस्वीकृतीपत्रिक ा मिळविण्यासाठी पात्र आहेत अशा पत्रकारांचा या योजनेत समावेश करावा अशी परिषदेची मागणी होती.ती मान्य झाली नसली तरी सर्वच पत्रकारांचा या योजनेत समावेश करावा यासाठी परिषद यापुढेही आग्रही असणार आहे.तुर्तास अधिस्वीकृतीधारकांसाठी का होईना योजना सुरू झालीय त्याचं स्वागत केलं पाहिजे.या योजनेतील लाभार्थ्यांना आता विमा संरक्षण देखील मिळणार आहे.(सविस्तर माहितीसाठी कृपया सरकारी जीआर पहावा )सततचा पाठपुरावा आणि सरकारी यंत्रणेवरील दबाव यामुळे गेल्या दीड वर्षात मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांचे सोळा प्रश्‍न मार्गी लावलेले आहेत.

राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना आघाडी सरकारच्या राजवटीत सुरू झाली.त्याचा लाभ दारिद्रय रेषेखालील लोकांना देण्याचे नक्की करण्यात आले.मात्र भाजप सरकारने आता ही योजना नव्या स्वरूपात आणि नव्या नावासह राबविण्याचे ठरविले आहे.या योजनेचे नाव आता महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य जीवनदायी योजना असे कऱण्यात आले असून या योजनेची अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 2016 पासून करण्यात येणार आहे.दार्रिदय रेषेखालील आणि दारिदय रेषेवरील कुटुंबांना गंभीर आणि खर्चिक आजारावरील मोफत उपचार करण्यासाठी ही योजना आहे.यामध्ये दारिद्रय रेषेखालील पिवळे,अंत्योदय अन्न योजना,अन्नपुर्णा योजना,दारिद्रय रेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक ( शासकीय कर्मचारी,निमशासकीय कर्मचारी किंवा आयकर दाते वगळून ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपर्यंत आहे असे ) तसेच आत्महत्याग्रस्त 14 जिल्हयातील शेतकरी कुटुंब नव्या योजेनेत लाभार्थी असतील.या शिवाय ज्या घटकांचा या योजनेत नव्याने समावेश केला गेला आहे त्यामध्ये शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी,महिला आश्रम शाळेतील महिला,अनाथालय,वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिक,आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश केला गेला आहे.अनेकांना असा प्रश्‍न पडू शकतो की,जी योजना सामांन्य नागरिकांसाठी आहे त्यात पत्रकारांचा समावेश करून सरकारने वेगळे काय केले आहे.वेगळेपण असे आहे की,पत्रकार लाभार्थ्याला उत्पन्नाची कोणतीही मर्यादा टाकलेली नाही.म्हणजे सर्व थरातील अधिस्वीकृतीधारक पत्रकार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.शिवाय हा लाभ अधिस्वीकृतीधारक पत्रकाराच्या कुटुंबाला देखील मिळणार आहे.त्यामुळे गरजू पत्रकारांनी शासनाच्या वेबसाईटवर जाऊन जीआरची प्रत काढून घ्यावी ,त्याचा जीआर नंबर वर दिलेला आहे.ही योजना जास्तीत जास्तात जास्त पत्रकारांपर्यत पोहोचेल यासाठी जिल्हा पत्रकार संघांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत.

पत्रकार परिषदेने अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर राज्यात शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी  सुरू केली गेली.पुर्वी या योजनेत एक लाख रूपयांपर्यंत मदत मिळत असे मात्र आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ती तीन लाख रपयांपर्यत मदत मिळते.मात्र अधिकार्‍यांचा नकारात्मक दृष्टीकोन आणि आपण पत्रकारांवर मोठा उपकार करतो आहोत अशी भावना यामुळे गेल्या पाच -सात वर्षात या योजनेत केवळ शंभर-सव्वाशे पत्रकारांनाच लाभ झालेला आहे.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे निकषही पत्रकारांना मदत मिळणार नाही असे आहेत.शिवाय या योजनेत केवळ 22 आजारांचाच समावेश केला गेलेला असल्याने या योजनेत भरपूर पैसे असतानाही जेवढ्या प्रमाणात पत्रकारांना त्याचा लाभ मिळायला हवा होता तेवढ्या प्रमाणात तो मिळताना दिसत नाही.समितीवर परिषदेच्यावतीने किरण नाईक सदस्य आहेत.त्यांनी निकष बलदण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत मात्र त्याला अद्याप यश आलेले नसल्याने हा विषय देखील परत एकदा मुख्यमंत्र्यांकडे नेल्याशिवाय पर्याय नाही..

मराठी पत्रकार परिषदेने स्वतःचा पत्रकार आरोग्य सेवा कक्ष 6 जानेवारी 2016 रोजी स्थापन केला असून त्यामार्फत तुटपुंज्या साधनसामुग्रीच्या बळावर पत्रकारांना मदत केली जात आहे.आतापर्यत 13 गरजू पत्रकारांना परिषदेने मदत केली असून नगरचे कल्पक हातवळणे आणि वडवणीचे पत्रकार शंकर साळुंके ही दोन अलिकडची उदाहरणे आहेत.मात्र सरकारनेच पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा परिषदेचा आग्रह आहे.महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य जीवनदायी योजनेतून अनेक गरजू पत्रकारांना आता लाभ मिळू शकेल हे नक्की ( एस.एम.) 

खालील लिंकवर जाऊन या लेखाची कॉपी करता येईल.

http://smdeshmukh.blogspot.in/2016/07/blog-post_8.html

1 COMMENT

  1. मराठी पत्रकार परिषदेचे सुंंदर काम… अभिनंंद.. यामुळे प्रामुख्याने ग्रामीण पत्रकारांंना दिलासा मिळेल.
    —>विजय सरवदे
    औरंंगाबाद
    9850304257

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here