मनापासून आभार 

0
1578

मनापासून आभार

राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेच्या कोट्यातून माझी निवड झाल्यानंतर  माझ्या असंख्य मित्रांनी ,हितचिंतकांनी मेसेज पाठवून,व्हॉटस् अ‍ॅपवरून,फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून  माझे अभिनंदन केले,शुभेच्छा दिल्या.मी सर्वाचा मनापासून आभारी आहे.आपल्या शुभेच्छा मला पुढील कार्यासाठी बळ देणा़र्‍या ठऱणार आहेत.

पत्रकारांचे प्रश्‍न घेऊन,पत्रकारांच्या हक्कासाठी गेली पंचवीस वर्षे मी सातत्यानं लढतो आहे.पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन हे विषय घेऊन आपली लढाई चालू आहे.ही लढाई पुढे नेण्यासाठी अधिस्वीकृती समिती हे एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे असं मला वाटतं.

अधिस्वीकृतीच्या संदर्भात पत्रकारांच्या अनेक तक्रारी आहेत,काही नियम बदलावे लागणार आहेत,अधिस्वीकृती देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ कऱण्यासाठी देखील काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील .मुळात अधिस्वीकृती समिती ही पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी असते कार्ड नाकारण्यासाठी नसते हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊनच परिषदेचे सर्व प्रतिनिधी काम करणार असल्याने अधिकाधिक पत्रकारांना आम्ही अधिस्वीकृतीच्या संदर्भात न्याय देऊ शकू असा आम्हाला विश्‍वास आहे.

22 जुलै रोजी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा प्रामुख्यानं तीन मागण्या केल्या होत्या.पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार निवृत्ती वेतन आणि अधिस्वीकृती समिती या त्या तीन मागण्या होत्या.अधिस्वीकृती समिती पंधरा दिवसात जाहीर होईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं,त्यांनी तो शब्द पाळला.त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत.कायदा आणि पन्शनचा विषय एक महिन्यात मार्गी लागेल असंही त्यांनी सांगितलं होतं.आम्हाला खात्रीय की ते दोन्ही विषय आता मार्गी लागतील यात शंका नाही .आपल्या सर्वांच्या सदिच्छा, वेळोवेळी  केलेल्या  आंदोलनातील सक्रीय सहभाग आणि मार्गदर्शन यामुळंच हे शक्य होतंय.दीर्घकाळ चाललेली एक चळवळ आता यशस्वी होताना दिसतेय.याचं सारं श्रेय अर्थातच राज्यातील सर्व पत्रकारांचे आहे.मी केवळ निमित्तमात्र आहे,याची नम्र जाणीव मला आहे.आपल्या सर्वाचे पुनश्‍च आभार. हेच प्रेम कायम राहावे एवढीच विनंती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here