मध्यप्रदेशातही पत्रकार सुरक्षा कायदा होणार?

0
827

महाराष्ट्रा पाठोपाठ आता मध्यप्रदेशमध्ये देखील पत्रकार सुरक्षा कायदा करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.मध्य प्रदेशमध्ये अलिकडेच दोन पत्रकारांच हत्त्या झाल्याने पत्रकार आणि पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत.याची दखल घेत सरकारने कायद्याचा मसुदा तयार करण्याच्य कामास आरंभ केला आहे.सरकारच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की,कायदा कऱण्याच्या दृष्टीने पत्रकार आणि पत्रकार संघटनांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.राज्याचे जनसंपर्क आयुक्त अनुपम राजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,काही घटना समोर आल्या नंतर राज्य सरकार पत्रकारांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आङे.त्याच वेळेस राज्यातील पत्रकारांनी पत्रकार सुरक्षा कायद्याची मागणीही केलेली आहे.या विषयावर आता गंभीरपणे विचार केला जात आहे.पत्रकार सुरक्षा कायद्यात नेमक्या कोणत्या तरतुदी असाव्यात यासंबधीच्या सूचना पत्रकारांकडून मागविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या विषयाबाबत काही सकारात्मक निर्णय होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.पत्रकारांना देण्यात येणारी अधिस्वीकृतीबाबतही त्यानी काही प्रश्‍नांना उत्तरे दिली.- महाराष्ट्राप्रमाणेच मध्यप्रदेशातही पत्रकार सुरक्षा कायद्याच मसुदा तयार होतोय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here